Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला आहे. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, परंतु घरातील कामांमुळे थोडा ताण येऊ शकतो. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापार करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि एखादा शुभ समारंभ ठरण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. मिथुन: दिवसाची सुरुवात थोडी धावपळीची होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आज सकारात्मक बातमी मिळू शकते.…
‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर छापा; बोगस डॉक्टर तन्वीर देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहुरी: बनावट पदव्यांच्या आधारे अधिकृत नोंदणी नसताना रुग्णसेवा देऊन लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राहुरीतील एका बोगस डॉक्टरवर मंगळवारी पोलिसांनी कारवाई केली. राहुरी येथील ‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर प्रशासनाने छापा टाकून तन्वीर हारुन देशमुख याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण रुग्णालय राहुरीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून प्राप्त झालेल्या गोपनीय आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोग्य विभागाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले समाजात ‘गुरुजी’ या पदाला अत्यंत आदराचे स्थान आहे, मात्र अकोले तालुक्यातील एका घटनेने या पदाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. आपल्या अल्पवयीन मुलाला कार चालवायला देऊन आणि स्वतः मद्याच्या नशेत धुंद राहून एका शिक्षकाने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित शिक्षकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (३ मे) अकोले तालुक्यातील गुरवझाप पीरसाईनगर येथील शिक्षक रामदास भांगरे हे त्यांच्या कुटुंबासह स्विफ्ट कारने (क्रमांक MH 02 BJ 9347) प्रवास करत होते. यावेळी शिक्षक भांगरे हे स्वतः मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी कारचे नियंत्रण स्वतःकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या कायापालटासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीमधील विविध कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असून, या प्रस्तावाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचे औचित साधित त्यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदार खताळ यांनी वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि पथदिवे यांसारख्या गंभीर समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. वसाहतीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्याने उद्योजक व…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य व्यंगचित्र स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे व जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वात वर्षभर चालणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही स्पर्धा येत्या रविवारी, (१७ मे २०२६) सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत संगमनेर बस स्थानकाजवळील…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन कामाची संधी चालून येईल, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. अनावश्यक खर्च टाळल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक क्षेत्रात काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या संयमामुळे तुम्ही त्यावर मात कराल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि जुन्या वादांवर पडदा पडेल. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल, पण सहकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा दृढ विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या समारोप प्रसंगी ते उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत होते. डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात युवकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. ते म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होणे ही काळाची गरज आहे. समाजातील आर्थिक विषमता जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, मात्र घाईघाईने कोणताही मोठा गुंतवणूक निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांततेची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्यामुळे थोडा ताण येऊ शकतो, परंतु नियोजित पद्धतीने काम केल्यास यश नक्की मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. मिथुन: तुमच्या संवादकौशल्यामुळे आज…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दलाच्या तातडीच्या हालचालीमुळे हा प्रकार लगेच समोर आला असून पुढील तपासाला मदत झाली आहे. दि. 9 मे रोजी रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित राऊंडवर होती. त्यावेळी नगरपालिका गेटसमोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एक संशयित व्यक्ती असल्याचा कॉल रक्षक दलाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे एटीएमची लाईट बंद असल्याची शंका वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रकार संशयास्पद वाटताच रक्षक दलाने…
