Author: अनंत पांगारकर
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची प्रशंसा होईल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक घडामोडी घडतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयमाने काम घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. शक्य असल्यास आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आहे. मित्रांच्या सहकार्याने एखादे अवघड काम सहज पूर्ण होईल. व्यापारात…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांसाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ (राज्य विमा प्रतिष्ठान) सेवा दवाखाना मंजूर झाला असून, या निर्णयावरून आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी काढलेल्या या आदेशाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी हा दवाखाना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केल्याने नक्की कामाचा धनी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ज्या दिवशी दवाखाना कृतीत येईल तो संगमनेरकरांसाठी सुदिन असेल. आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण…
अहिल्यानगर – श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. हिंगणी येथील मंदिरात चोरी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे ही चोरी सराईत गुन्हेगार भास्कर पथवे याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या राहत्या परिसरात सलग चार दिवस शोध घेतला, मात्र…
संगमनेर, प्रतिनिधी – आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (ESIC) अंतर्गत बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा संगमनेर तालुक्यातील सुमारे १०,००० विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी होणार आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ यांनी कामगार रुग्णालयाबाबत शब्द दिला होता. हा शब्द पाळत त्यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे ठोस मांडणी केली होती. या प्रयत्नांना यश आले असून, नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ च्या आदेशानुसार संगमनेरमध्ये सेवा दवाखाने सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरासह परिसरात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून महिलांचे मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सध्या सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दागिने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या हिंदू समाजातील महिलांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू असून वाण खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत बस स्टँड, अशोक चौक, बाजारपेठ मेनरोड, नवीन नगर रोड, नाशिक रोड, इंदिरानगर आणि मालदाड रोड यांसारख्या वर्दळीच्या भागात दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेऊ लागले आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…
विशेष लेख | प्रणित सहाणे अहमदनगर जिल्ह्याच्या, विशेषतः संगमनेर तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात ‘कॉम्रेड’ ही पदवी केवळ नावासमोर लावण्यासाठी नसून ती कृतीतून सिद्ध करणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड पंढरीनाथ बाबुराव सहाणे, ज्यांना अवघा जिल्हा ‘सहाणे मास्तर’ म्हणून मोठ्या आदराने ओळखतो. आज त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांनी कष्टकरी, शेतमजूर आणि शोषितांसाठी दिलेला लढा पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहतो. मास्तरांचा जीवनप्रवास हा निव्वळ राजकारण नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध पुकारलेला एक अखंड एल्गार होता. संघर्षाची मुळे आणि वैचारिक जडणघडण- १२ जानेवारी १९२९ रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ऐतिहासिक गावात मास्तरांचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत…
संगमनेर, प्रतिनिधी – गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळात १०७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी वास्तू कारखान्याच्या ‘अग्निझुंज’ या अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या विधायक उपक्रमामुळे शाळेने आता कात टाकली असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेत राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राजापूर येथील ही जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील धूळ, पटांगणातील पालापाचोळा आणि जुन्या इमारतीवर साचलेली धूळ…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील कामगार आणि मध्यमवर्गीय विमाधारकांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सुविधेच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून, नागपूर विभागातील बंद पडलेले ‘सेवा दवाखाने’ आता संगमनेरमध्ये स्थलांतरित करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार तांबे यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे तालुक्यातील १० हजार कुटुंबांना हक्काची आरोग्य सेवा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या (महा-राकावि) नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. या निर्णयानुसार, नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ‘महाल’ आणि ‘न्यू सेक्टर’ या भागांतील…
दैनिक राशीभविष्य: मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची दखल घेतली जाईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली, तरी नियोजनाने तुम्ही त्यावर मात कराल. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे पथ्य पाळावे. मिथुन- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी…
संगमनेर | प्रतिनिधी तालुक्यातील वडगाव पान येथील जमीन अतिक्रमण प्रकरणात सक्षम महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप गणेश रासने यांनी केला आहे. शासकीय मोजणी, पोलीस बंदोबस्त आणि पंचनामे होऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे ताबा मिळत नसल्याने, येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सहकार महर्षी क्रीडा संकुल समोर कुटुंबीयांसह उपोषणास बसण्याचा इशारा रासने यांनी दिला आहे. या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गणेश रासने यांनी म्हटले आहे की, वडगाव पान येथील स.नं. १३/१ (क्षेत्र ०.६१ आर) ही त्यांची मालकीची मिळकत असून, शासकीय मोजणीत या जमिनीच्या पूर्वेकडील सुमारे १७ आर क्षेत्रावर जनार्दन सहादू गायकवाड व इतरांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न…
