Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच शंभर टक्के मुक्तता होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आणि मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष केंद्राचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी…

Read More

अनंत पांगारकर- कचऱ्याचे साम्राज्य, जागोजागी पडलेले ढीग आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकलेल्या एखाद्या शहराचे रूप पालटून त्याला राज्यातील एक प्रगतशील, स्वच्छ आणि ‘झाडांचे शहर’ बनवणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असते. मात्र, जेव्हा एखादी महिला आपल्या शहराला केवळ एक भौगोलिक क्षेत्र न मानता स्वतःचे मोठे घर मानते, तेव्हा तिथे परिवर्तनाची एक नवी आणि सोनेरी पहाट उजाडते. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नेमका हाच अद्भूत चमत्कार संगमनेर शहरात करून दाखवला आहे. म्हणूनच, ‘कचऱ्यात हरवलेली बाई’ अशी स्वतःची प्रांजळ आणि सार्थ ओळख करून घेत, त्यांनी कचरा निर्मूलनाचा आणि शहर सौंदर्यीकरणाचा जो वसा घेतला, तो आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – या राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले गेल्याने भविष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आज तुमची काही कठीण कामे सुलभ होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ – आज आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उत्तम दिवस असून जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेले प्रकल्प गतीने पुढे सरकतील. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी कानावर आल्याने घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि विठूनामाच्या जयघोषात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसह आगमन झाले. यावेळी वारकरी संप्रदायाचे पाईक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत करून दर्शन व पूजन केले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह अनेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन रविवारी (दिनांक १२ जुलै) संगमनेर-लोणी रोडवरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स येथे होणार असल्याची माहिती पत्रकार गौतम गायकवाड यांनी दिली. सन २०११ पासून प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी या सामाजिक उपक्रमाचे सातत्याने व विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे. डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आला आहे. यापूर्वी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कालकथित प्रेमानंद रूपवते, कालकथित स्नेहाजाताई रुपवते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे,…

Read More

प्रिय डीजी सदानंद दाते साहेब, अत्यंत सचोटीचे पोलीस अधिकारी म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, कठोर अशा असंख्य उपाध्या आपल्या नावामागे आहेत. देशात जबाबदारी पेलताना आपण महाराष्ट्रात आल्यानंतर पोलीस दलात सारं काही अलबेल होईल, आपल्यासारखा प्रामाणिक कारभार करण्याचा प्रयत्न आपल्या हाताखालचे अधिकारी व कर्मचारी करतील, अशी धारणा होती. एखाद्या संस्थेचा कारभार त्या संस्थेच्या प्रमुखाच्या नावाने ओळखला जातो. संस्थेतील यशापयश प्रमुखाच्याच खात्यावर नोंदवले जाते. यामुळे आपल्यासारखा कारभार इतरांनीही करावा, ही अपेक्षा गैर नाही. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सक्षम नेतृत्व असूनही महाराष्ट्राच्या पोलिसांना झालंय काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती माधव जामदार…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज सार्वजनिक कार्यक्रमात मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज काही कारणांमुळे मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. खर्चात विनाकारण वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. वृषभ – आजचा दिवस नवीन कामाच्या नियोजनासाठी अत्यंत अनुकूल आहे. मनात आशेचे नवीन किरण निर्माण होतील. आर्थिक बाबतीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. लांबचा प्रवास आज टाळावा. व्यापारात प्रगती होईल आणि नवीन दिशा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. मिथुन – व्यवसायाच्या बाबतीत आज अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने मन थोडे निराश होऊ शकते, परंतु संयम ठेवावा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने परिसरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकूण १२१ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रतिबंधक कारवाईची विशेष मोहीम आणि समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्म्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेअंतर्गत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी हजर होते, यामध्ये सर्वाधिक ३५ आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तर १७ आरोपी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील होते. या सर्व गुन्हेगारांचे प्रथम गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित इंट्रोगेशन फॉर्म भरून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर खुर्दमधील प्रसिद्ध ‘हॉटेल रंगीला पंजाब’वर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या हॉटेलचा मद्यविक्रीचा परवाना (एफएल-३ परवाना क्रमांक ११५६) ३० दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले असून, प्रशासनाने हे हॉटेल तातडीने बंद केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर-१ विभागाच्या दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने या हॉटेलची अचानक आणि सविस्तर तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या. यामध्ये प्रामुख्याने विहित नमुन्यातील मद्यविक्रीच्या नोंदवह्या वेळेवर अद्ययावत न ठेवणे, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे अधिकृत नोकरनामे व माहिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ठाणे: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, विधीमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यांना व्हायरल फिव्हर आणि अतिताणाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने देखरेख ठेवून असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांत राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी आणि सततच्या धावपळीमुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमनाच्या नावाखाली सातत्याने अनियमित आणि खंडित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून शहरासह ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी शुक्रवारी संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. हे आंदोलन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा,…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आज तुमच्या घरातले वातावरण अतिशय सकारात्मक राहील. एखादी आनंदाची बातमी समजल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकेल. मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या भविष्याविषयी असणाऱ्या चिंता परस्पर संवाद आणि समजुतीतून दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. निर्णय घेताना मात्र अहंकाराला मध्ये येऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत आज थोडी काळजी घेणे फायदेशीर ठरेल. वृषभ – नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी आज रोजगाराची नवीन संधी चालून येऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम राखणे ही आज तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणे आज अजिबात शहाणपणाचे ठरणार नाही. सासरच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई: विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरू शकणाऱ्या ‘स्टिंग’सारख्या उच्च कॅफिनयुक्त ऊर्जा पेयांच्या विक्रीवर शाळांच्या ५०० मीटर परिसरात बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात घेण्यात आला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी विधानपरिषदेत ठाम भूमिका घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या संपूर्ण मुद्द्यावर बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी वारंवार विधानपरिषदेत स्पष्टपणे मांडले की शाळा परिसरात अशा प्रकारच्या ‘हाय कॅफिन’ आणि आकर्षक पॅकेजिंग असलेल्या पेयांची सहज उपलब्धता ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. “शालेय वयातील मुलांमध्ये अशा पेयांचे वाढते सेवन चिंताजनक असून, यावर तातडीने निर्बंध आवश्यक आहेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा मोठे पद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात घेतलेले छोटे निर्णय देखील भविष्यात मोठा नफा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणांमध्ये धावपळ होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. वृषभ- तुमचे नम्र वागणे आणि गोड बोलणे यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. एखादा लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे, जो लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील, मात्र कायदेशीर किंवा प्रशासकीय कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका. मिथुन- आज घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या समाजात वाढलेली नकारात्मकता दूर करून मानवता आणि आनंदाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (दयाळूपणाचा महिना) म्हणून राबवण्याचा एक अनोखा संकल्प प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सोडला आहे. या मोहिमेत प्रत्येकाने दररोज किमान एक चांगली कृती करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगभरात अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यात राबवली जात असून, या संदर्भात यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नकारात्मक बातम्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीवर होत आहे. हे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई “देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्षचोरी केली जाऊ लागली, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागलं आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क आणि अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा,” असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी केले. ​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: अवैध मुरूम आणि माती वाहतुकीबाबत जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाला असून, यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात ही धक्कादायक घटना घडली. समजलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेले फिर्यादी संदीप घुगे (वय ४३) हे रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करत असताना, दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर व सुदर्शन शिवाजी श्रीराम (दोघे रा. डिग्रस) हे होते. विशाल व प्रवीण यांनी घुगे यांना पाहताच पिस्तूल उपसून ‘तुझा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने रविवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजता एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशन हॉल येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘तापलेल्या पृथ्वीची गोष्ट’ या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. गुरुदास नुलकर प्रकाश टाकणार आहेत. हवामान बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसत असताना, या संकटाची दाहकता आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आयोजित या व्याख्यानात डॉ. नुलकर हे सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनात कशी भर घालता येईल, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील. सत्यशोधक विचार मंच आपल्या प्रबोधनपर उपक्रमांसाठी ओळखला जातो. मंचाचे समन्वयक संदीप…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने चांगला राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी किंवा कार्यालयीन अधिकारी वर्गाशी चर्चा करताना अत्यंत सजग राहा. व्यावसायिक योजनांमध्ये काही सकारात्मक बदल करावे लागतील, ज्यासाठी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कुटुंबातील वातावरण धार्मिक राहील. वृषभ – आज कामाच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या संदर्भात परदेश प्रवासाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचा तुमचा संकल्प आज तडीस जाऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. मिथुन – आज विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. नेहमीपेक्षा अतिरिक्त किंवा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा मनात प्रबळ होईल. घरातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कारनामा समोर आला असून, दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला चक्क २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने जेलमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर तीव्र शब्दात प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तपासी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणावरून आता मानवाधिकार आयोग देखील चौकशी करण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. एवढा गंभीर प्रकार घडत असताना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे…

Read More