Author: Annant Ppangarkar

संगमनेर: रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना काही व्यक्तींनी भररस्त्यात गाडी आडवी लावून पोलिसांना शिवीगाळ करत मोठा गोंधळ घातल्याची गंभीर घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी (दि. ७ नोव्हेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुखरे आणि कॉन्स्टेबल आगलावे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर बाळू गायकवाड याला पोलीस ठाण्यात घेऊन येत होते. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. काही जणांनी त्यांची गाडी रस्त्यात आडवी उभी केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी संबंधित वाहनचालकांना गाडी बाजूला घेण्याची…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये राहत मिळेल आणि मन प्रसन्न राहील. सकारात्मक ऊर्जेमुळे मोठे काम सुरू करण्याचे साहस कराल. व्यापार आणि व्यवसायात लाभाची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आणि तुम्ही सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. वृषभ – आजचा दिवस अनेक रंग दाखवणारा आणि मिश्र फल देणारा असू शकतो. परिस्थिती वेगाने बदलू शकते, त्यामुळे शांत मनाने आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे फायदेशीर राहील. वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यात चढ-उतार जाणवू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे आर्थिक बाबींना बळ मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत स्पष्टता ठेवा. मिथुन…

Read More

संगमनेर – संगमनेर ग्रामीण विभागात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांत दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तसेच अनेक पाळीव जनावरे बिबट्यांचे बळी ठरले आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने व ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने वन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या भागातील प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे एकही जीव या प्राणघातक समस्येमुळे गमावता कामा नये. वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आणि योग्य कारवाई करावी, असा आग्रही सूर निवेदनातून…

Read More

मेष (Aries): मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस भाग्याची साथ घेऊन येईल. तुम्ही तुमच्या कामाची पद्धत अधिक व्यवस्थित आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत आणि संबंध अधिक दृढ होतील. व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल, परंतु कोणालाही उधार देणे टाळावे. आपल्या आरोग्यावर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. वृषभ (Taurus): नोकरी करणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळाल्याने सर्व कौटुंबिक बाबी सहजपणे सोडवता येतील. आज तुम्ही स्वतःसाठी एकांत पसंत कराल आणि भविष्यातील ध्येये साध्य करण्याचे मार्ग शांतपणे शोधाल. मित्रांकडून वेळेवर मदत मिळू शकते.…

Read More

संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त, मंगळवार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता ‘जाणता राजा मैदान’ येथे महाराष्ट्राच्या तरुणाईचा ‘ट्रेंड’ असलेला ‘फोक आख्यान’ हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सातत्याने विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार, राज्यभरातील तरुणांच्या पसंतीस उतरलेल्या ‘फोक आख्यान’च्या आयोजनाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राज्य व देश पातळीवरील अत्यंत दर्जेदार कार्यक्रम संगमनेरमध्ये होतात. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र…

Read More

मुंबई: फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या कथित असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.  या विधानाचा तीव्र निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत आज गुरुवारी (6 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता मंत्रालयासमोर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या A-4, राजगड, मॅडम कामा रोड या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या निषेध मोर्च्याला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य असलेल्या उत्कर्षा रूपवते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. एका पीडित महिलेच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या…

Read More

शिर्डी – राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी शिर्डी आणि राहाता नगरपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला प्रभावीपणे यश मिळवण्यासाठी रणनीती आखणे, संघनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज करणे, या प्रमुख विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करतील. महाविकास आघाडीच्या…

Read More

मेष राशी (Aries): आज तुम्हाला जीवनात येणाऱ्या अचानक बदलांसाठी तयार राहावे लागेल. प्रेमसंबंधात मनमोकळ्या संवादातून नातेसंबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी सहकार्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक वाढीसाठी नवीन कल्पनांचा विचार करा. वृषभ राशी (Taurus): आज तुम्हाला जीवनात संतुलन साधण्यावर भर द्यावा लागेल. प्रेमाच्या नात्यात तुमची निष्ठा दिसून येईल; प्रियजनांचे कौतुक करा. दीर्घकालीन आर्थिक लाभांसाठी नियोजन करा आणि कामात तुमच्या सहाव्या इंद्रियावर विश्वास ठेवा. मिथुन राशी (Gemini): आजचा दिवस तुमच्यासाठी ज्ञानवर्धक असेल! अनपेक्षित अंतर्दृष्टीमुळे रोमांचक संधी उपलब्ध होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून कामात वाढ मिळवा आणि मानसिक शांतीसाठी आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा. गुंतवणुकीसाठी वेळ खूप अनुकूल आहे. कर्क राशी (Cancer): आज तुमचा काळजी…

Read More

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी इतर मागास प्रवर्ग व बहुजन कल्याण मंत्री, अतुल सावे साहेब यांच्याकडे संगमनेर तालुक्यातील विविध कामांना मंजुरी देऊन निधीची तरतूद करण्याची विनंती केली होती. स्थानिक नागरिकांकडून वारंवार विकासकामांची मागणी होत असल्याने, तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी शासनाकडे केली होती. तांबे यांनी एकूण ३३…

Read More

संगमनेर – एकेकाळी ‘एअरपोर्ट’ म्हणून राज्यात गौरवपूर्ण उल्लेख होणारे आणि संगमनेर शहराचे वैभव असलेले हायटेक बसस्थानक मागील वर्षभरापासून अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यातून अखेर मुक्त झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही हतबल ठरलेल्या पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या आचारसंहितेमुळे साधले. आचारसंहिता लागू होताच रातोरात हे सर्व फ्लेक्स हटले आणि तब्बल एक वर्षानंतर संगमनेरच्या या देखण्या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. वर्षभर फ्लेक्सचा विळखा आणि प्रशासनाची ‘हतबलता’- लोकनेते तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हायटेक बसस्थानक शहराची ओळख आणि अभिमान आहे. प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत आणि आकर्षक प्रवेशद्वार यामुळे हे ठिकाण…

Read More

संगमनेर – शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गंडा घालून ते ट्रॅक्टर परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व अभिजीत सुनील भांडवलकर (रा. सिव्हिल हडको अहिल्यानगर) दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल असा एकूण ७१ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्य शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे. भालचंद्र…

Read More

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय निकषांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देणारे आदेश नुकतेच जारी केले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निवडणुकीची मोठी जबाबदारी… निवडणुकांचे सर्व कामकाज शांततेत, पारदर्शकतेने आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. हे नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करतील. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक…

Read More

मेष (Aries) – आज तुम्हाला संयम आणि धीराने काम करावे लागेल, ज्यामुळे कठीण समस्यांवरही सहज उपाय मिळू शकेल. कुटुंबाशी संबंधित कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा लागेल. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला घर आणि कामाच्या जगातून बाहेर पडून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. जुन्या मौल्यवान वस्तूंसाठी केलेले सौदे फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. काही खर्चाचा सामना करावा लागेल. मिथुन (Gemini) – व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे काम अत्यंत काळजीपूर्वक करा आणि इतरांची मदत घ्या. तुम्ही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. अनावश्यक वादात अडकणे…

Read More

मुंबई – अखेर संगमनेरसह राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या प्रक्रियेद्वारे एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त…

Read More

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नरसिंह देशमुख यांची कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली आहे. देशमुख यांच्या बदलीमुळे संगमनेरमध्ये सुरू असलेला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांच ग्रहण अद्यापही सुरूच आहे. देशमुख गेल्या काही दिवसापासून बदलीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा अखेरीस पूर्णत्वास आली आहे. देशमुख यांच्या रिक्त जागेवर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  देशमुख यांची बदली अहिल्यानगरच्या ए. एच. टी. यु. या शाखेकडे करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहा पोलीस निरीक्षक व तिघा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत केलेल्या अधिकाऱ्यांच्या विनंती…

Read More

नान्नज दुमाला-पिंपळे परिसरासाठी मंजूर उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करण्याची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी संगमनेर – निळवंडे धरणाचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूर चारीचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच, त्यांनी नान्नज दुमाला, पिंपळे परिसरासाठी मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करून कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्याचे स्वप्न जनता खूप दिवसांपासून ऐकत आहे, असेही ते म्हणाले. पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात उघडकीस आलेल्या ड्रग्स इंजेक्शन विक्री प्रकरणासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने कठोर भूमिका घेत पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांना एक निवेदन देत या देशविघातक कृत्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेल्या तपासात आणखी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहरात ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप’ नावाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरली जाणारी औषधे (मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन्स) विकणाऱ्या आदित्य किशोर गुप्ता याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात राजकीय…

Read More

संगमनेर – अवैध धंद्यामुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या संगमनेरमध्ये थेट नशेच्या इंजेक्शनची होणारी विक्री समोर आल्यानंतर आता सोमवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासारखा अमली पदार्थ जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या संदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.  गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये पोलिसांनी राबविलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये नशेचे इंजेक्शन्स विक्री होत असल्याचे समोर आले होते. आदित्य किशोर गुप्ता याला पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आणि पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आल्याचे समोर आल्याने हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला. दबावानंतरही पोलिसांनी केलेली कारवाई शहरात कौतुकाचा विषय ठरली होती. गेल्या काही…

Read More

मेष (Aries) – महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. तुम्हाला अचानक खूप पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्याची चिंता कमी होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. वृषभ (Taurus) – कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस असून नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मनःशांतीसाठी ध्यान करा. मिथुन (Gemini) – महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल आणि कुटुंबात आनंदी क्षण असतील. नवीन कल्पना आणि योजनांमुळे करिअर व व्यवसायात यश मिळेल. ताण कमी करण्यासाठी चालणे किंवा योग करा. कर्क (Cancer) – तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल; मानसन्मान व…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील १८ गावांतील शेतकरी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. येथील वीजपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून स्थिर व अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी मंजूर झाला आहे. ‘जिल्हा नियोजन’मधून मिळालेल्या या भरीव निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची दीर्घकाळापासूनची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणाऱ्या १८ गावांमध्ये प्रामुख्याने अंभोरे, कुंभारवाडी, कोळवडे, घुलेवाडी, जाखोरी, जोर्वे, डिग्रस, तळेगाव, नांदुरी दुमाला, मांडवे बु., मालुंजे, रणखांब वाडी, राजापूर, वरवंडी (जनतानगर), हिवरगाव पावसा, मालुंजे आणि संगमनेर खुर्द या गावांचा समावेश आहे. या भागात…

Read More