Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: बँकेतून पैसे काढून घराकडे चाललेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे लक्ष विचलित करून, दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीला लटकवलेली पैशांची पिशवी चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३ जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुकेवाडी कुरण रस्त्यावर घडली. शेतकऱ्याकडील पिशवीत १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ३ लाख रुपयांचे सह्या केलेले दोन धनादेश होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकेवाडी येथील ६९ वर्षीय शेतकरी सुरेश बाळकृष्ण शेटे यांनी एका व्यवहारापोटी मिळालेल्या तीन धनादेशांपैकी १ लाख ७५ हजार रुपयांचा एक धनादेश येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून वटवला होता. मिळालेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात वीज चोरी प्रकरणावरून हॉटेल चालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी वायरमनला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. गणेश माधव दातीर (रा. पिंप्रीलौकी, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. या कारवाईनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई काल (शुक्रवार ५ जून) दुपारी १ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हेवाडी रोड परिसरातील एका नामांकित हॉटेलला मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा लागतो. या हॉटेल चालकाने विजेचे पैसे वाचवण्यासाठी डीपीवरून चोरून वीज वापरण्यास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ५) संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला. ३० मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी मोर्चेकर्यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे आपले नादुरुस्त वाहन घेऊन मालपाणी बजाज शोरूममध्ये गेले होते. वाहनाची जबाबदारी स्वीकारून त्याची पावती देण्याबाबत चर्चा सुरू असताना, शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ लाभल्यामुळे रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबापेक्षा स्वतःच्या कष्टावर अधिक विश्वास ठेवावा लागेल. वादविवादापासून दूर राहणे तुमच्या हिताचे राहील, विशेषतः कार्यालयात सहकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगा. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे. वाढती उष्णता, घटलेला पाऊस, सातत्याने जाणवणारा दुष्काळ आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला असमतोल हा मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे असून, येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित ‘दंडकारण्य अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात आज (शुक्रवारी ४ जून) दुपारी एक वाजेच्या सुमारास एका चालत्या कंटेनरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. हा कंटेनर पुण्याहून नाशिकच्या दिशेने नवीन चारचाकी गाड्या घेऊन जात होता. कृष्णा लॉन्स परिसरात पोहोचताच कंटेनरमधून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ती आटोक्याबाहेर गेली. घटनेच गांभीर्य ओळखून तात्काळ घुलेवाडी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे चालक आकाश बनसोडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर शिर्डी पोलिसांनी धाडसी कारवाई केली. सावळीविहीर जवळ सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६ जनावरांची सुटका केली असून, एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गंगापूरच्या दिशेने गोवंशाची बेकायदेशीर तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. यावेळी गंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिंद्रा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे: जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील एका दिमाखदार सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला. पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शिका डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल…
संपादकीय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेतले. ‘नॉट रिचेबल’ उमेदवार, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा इशारा देणारे बंडखोर नेते आणि पडद्यामागे फिरलेली सूत्रे… हा सगळा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर सिनेमालाही मागे टाकणारा होता. पण सरतेशेवटी, महायुतीचे (भाजप) अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. या संपूर्ण प्रकरणाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते; गरज असते ती योग्य वेळी अचूक ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याची, जी किमया आ. संग्राम जगताप आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या जोडीने करून दाखवली. अहिल्यानगरमध्ये सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी येणे बाकी असलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात एखाद्या धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे…
