Author: अनंत पांगारकर
पुण्याच्या द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला पहिल्याच पावसाने दिलेल्या तडाख्याने राज्य सरकारची चांगलीच फजिती झाली. या घटनेवर झालेल्या टिकेने ‘महाराष्ट्राची बदनामी झाली’ अशी ओरड करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत बसलेल्यांच्या अंदाजाचा पुरता फजितवाडा झाला. कॅनडापासून अमेरिकेपर्यंतच्या पायाभूत सुविधांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रगती गाठणाऱ्या पाश्चात्य देशांची मदत घेऊनही व्हायचं तेच झालं. प्रचंड मोठी आश्वासनं दिल्यावरही ती खोटी ठरावीत ही तर लाजीरवाणी गोष्ट आहे. अतिपावसाने मिसिंग लिंकला लागलेली गळती आणि त्याच्या कमानीला बसलेले हादरे ही प्रशासनाच्या एकूणच कारभाराच्या चिंधड्या उडवणारी घटना आहे. आता टीका झाल्यावर नमतं घेण्याऐवजी सत्ताधारी ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, ती पाहता यांना झाल्या प्रकारचा ना खेद आहे ना चिंता. राज्य…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. मानसिक दृष्ट्या तुम्ही अतिशय सक्षम असाल आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यावर तुमचा भर राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम असली तरी खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक करताना घाईगडबड करू नका. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहावे लागेल. नको असलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा बजेट बिघडू शकते. व्यावसायिक पातळीवर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद…
संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयामार्फत मागील चार ते पाच वर्षांपासून असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. या सेवा कक्षामधून आतापर्यंत तब्बल १८ हजार कामगारांची यशस्वी नोंदणी करण्यात आली असून, मागील अवघ्या एका वर्षात शिष्यवृत्ती योजनेंतर्गत तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी दिली आहे. यशोधन जनसंपर्क कार्यालयातून अधिकृत नोंदणी झाल्यामुळेच तालुक्यातील या गोरगरीब कामगारांना भांडे व विविध घरगुती साहित्याचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकनेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायण येथे हॉटेलच्या बिलाच्या किरकोळ वादावरून एका तरुण हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात हॉटेलचे तरुण चालक-मालक आकाश शेखर दुबय्या (वेंकटरामन) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश सतीश जाधव (रा. खिलारी वस्ती) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मी नारायण येथे काहीजण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिलाच्या रकमेवरून त्यांची हॉटेल कर्मचाऱ्यांशी हुज्जत सुरू…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यात आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उघडपणे समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडून बोलताना अनावधानाने झालेल्या एका किरकोळ भाषिक चुकीचे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली आक्रमक भूमिका मांडत, ज्येष्ठ महिला नेत्यावर चिखलफेक होत असतानाही काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी गप्प का, असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी कतारी यांनी विरोधकांच्या बेछूट आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी करत विरोधकांच्या आरोपांना अत्यंत जळजळीत आणि चोख उत्तर दिले आहे. राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, ज्यांना कसलेही भान नाही अशा विरोधकांच्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर विशेष चर्चेत आले आहे. आपली भूमिका मांडताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,…
शनिवार, ११ जुलै २०२६ चे राशिभविष्य मेष ♈ आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायक आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. नवीन योजना आखण्यासाठी किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मनामध्ये अनेक दिवसांपासून असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतता नांदेल, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. वृषभ ♉ आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळे देणारा ठरेल. आर्थिक व्यवहार करताना किंवा कुठेही गुंतवणूक…
मुंबई: सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाडे के तट्टू’ किंवा ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या कथित भ्रष्टाचारावर आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दांत आक्षेप घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ‘कुत्रे’ किंवा ‘भाड्याचे तट्टू’ यांसारखे शब्द शोभा देत नाहीत, कारण ही टपोरी लोकांची भाषा आहे. लोकशाहीत सरकारच्या कामावर प्रश्न विचारण्याचा जनतेला आणि विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे. काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करून फडणवीसांना ‘डिझास्टर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये हे दूषित पाणी मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ नियमित पाणी तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा संगमनेरकरांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा शिवसेनेच्या (शिंदे गट) एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. शहरातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना यासंबंधीचे निवेदन देत तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सूर्यवंशी यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता संगमनेर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे संपूर्ण…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी मान-सन्मान वाढवणारा आणि उत्तम ठरेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. आपल्या मतांविषयी तुम्ही आग्रही राहाल. मात्र, आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील आणि काही नवीन मोठे प्रकल्प तुमच्या हाती येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत काही जुन्या तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण टाळा. मिथुन – गेल्या अनेक दिवसांपासून चालत…
