Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी – तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लारपूर येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली. या घटनेचे पडसाद संगमनेर शहरात उमटले असून, राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने बस स्थानक परिसरात आज दुपारी ३ वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. देशातील अस्पृश्यता, सतीप्रथा आणि जातीभेदाविरुद्ध लढा देऊन बहुजन समाज, महिला व शेतकऱ्यांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या महापुरुषाच्या पुतळ्यावर झालेला हा हल्ला अत्यंत खेदजनक आणि गंभीर स्वरूपाचा आहे. हा केवळ एका पुतळ्यावर झालेला हल्ला नसून तो सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांवर झालेला आघात आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या घटनेमुळे संपूर्ण देशातील…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम इशारा देत आमदार अमोल खताळ यांनी शहर पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ कारवाईचे कडक आदेश दिले आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर आता निर्णायक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सध्या शहरातील विविध भागांत सुमारे २८ बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कत्तलखान्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारी तसेच पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या…

Read More

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या आणि गाणी म्हणत सार्वजनिक शांतता व वातावरण दूषित करणाऱ्या ११ महिलांवर कोतवाली पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा बस स्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून प्रवाशांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक मुगडे, प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील देवतळे (देवगाव) आणि देवगड (हिवरगाव पावसा) या दोन गावांमधील श्री खंडोबा मंदिरांमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकताच येथे मोठा यात्रोत्सव पार पडला होता, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी रात्री दोन्ही मंदिरांमधील गाभाऱ्यात प्रवेश करून कटरच्या साहाय्याने दानपेट्या कापल्या आणि त्यातील रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी केवळ कागदी नोटांची चोरी केली असून चिल्लर पैसे मंदिरांतच सोडून दिले आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या दोन्ही मंदिरांमधील अंतर अवघ्या दोन किलोमीटरचे असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चोरी करताना…

Read More

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तुत्वाचा ठसा उमटेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर तुमचा भर असेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. वृषभ : वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संयम राखण्याचा आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात, त्यामुळे गुंतवणुकीचे व्यवहार करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि एखादा शुभ समारंभ ठरण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मिथुन :…

Read More

संगमनेर: स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर संगमनेर मध्ये अवैध गोवंश जनावरांच्या कत्तली सुरू आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून सातत्याने अहिल्यानगर एलसीबीचे पथक संगमनेर मध्ये छापेमारी करत आहे. गेल्या काही दिवसात या पथकाने तीन-चार मोठे छापे टाकत या अवैध कत्तलखान्याची पोलखोल केली आहे. त्यामुळे या अवैध कत्तलखान्यांना नेमके आशीर्वाद कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडक आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी – संगमनेर आणि सिन्नर मतदारसंघातील आरोग्य सुविधांचे प्रलंबित प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित ट्रॉमा सेंटर, महिला रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या कामात होणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबाबाबत आज आमदार सत्यजित तांबे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्री आबिटकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रामुख्याने सिन्नर-वावी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरचा विषय लावून धरला. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजूर झालेल्या या सेंटरचे काम अद्यापही सुरू न झाल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, परिणामी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, या…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –  श्रीरामपूर शहरातील ‘आदर्श लॉज’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, अनैतिक देहविक्रय व्यवसायामुळे हे लॉज एका वर्षासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही माहिती दिली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ‘आदर्श लॉज’ येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक आणि पंचांच्या उपस्थितीत सदर लॉजवर छापा टाकला. या छाप्यात लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले (वय ३५ वर्ष, रा. रंगोली…

Read More

मंगळवारी १० फेब्रुवारीला पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील प्रमाणे निर्णय झाले. 🌟 नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. यातून ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प व १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार. राज्यातील ८ लाख हेक्टर कृषि क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. (जलसंपदा विभाग) 🌟 कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार. मौजे विकासवाडी ( ता. करवीर) १२ हेक्टर ७६ आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी. कोल्हापुरच्या क्रिडा विकासाला चालना मिळणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) 🌟 पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व…

Read More

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे विभाजन केले आहे. आता जिल्ह्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी अशी दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यालये निर्माण करण्यात आली असून, शिर्डीच्या अधीक्षकपदी ऋषिकेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येणार असून, राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या सहा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या अहिल्यानगरमध्ये आता दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यरत असतील. नगर कार्यालयाची धुरा अधीक्षक सोनोणे यांच्याकडे कायम असून, शिर्डीसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारणीला सुरुवात झाली आहे. या नवीन रचनेनुसार तालुक्यांची विभागणी अत्यंत स्पष्टपणे करण्यात आली आहे. अहिल्यानगर कार्यालयांतर्गत अहिल्यानगर शहर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुमारे दोन हजार धावपटूंनी सहभाग नोंदवून संगमनेरच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडविला. संगमनेरकरांमधील ही आरोग्यविषयक जागरूकता शहराच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असल्याची भावना क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी यावेळी व्यक्त केली. मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ लायन्स क्लब संगमनेर सफायरने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शरीराला व्यायामाची सवय लागावी आणि निरोगी आरोग्याचा संदेश घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत ७ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांचा समावेश होता.  लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेश…

Read More

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वृषभ : आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग आहेत. नोकरीत बढतीची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरामध्ये पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, फक्त घाईत कोणताही निर्णय घेऊ…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या आधीही संगमनेर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडल्यानंतर या टोळीवर देखील बीएनएसच्या कलम १११ कारवाई केली होती. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हरिष रामसिंग…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  राज्य सरकारने घरपट्टी शास्ती आणि दंड माफीचा निर्णय घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी संगमनेर नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अद्याप या सवलतीचा लाभ मिळालेला नाही. याउलट, सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत नागरिकांकडून जादा रक्कमेची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि सॉफ्टवेअर कंपनीवर कठोर कारवाई करून नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारने शास्ती माफीचा जीआर काढल्यानंतर संगमनेरमध्ये याचे मोठे स्वागत झाले होते. अनेकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचेही प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या…

Read More

मेष: आज तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी काळ अनुकूल आहे. तुमची ऊर्जा आणि उत्साह पाहून सहकाऱ्यांमध्येही सकारात्मकता पसरेल. आर्थिक बाजूने विचार करता, जुन्या उधारीचे पैसे परत मिळू शकतात. घरातील मोठ्यांशी चर्चा करताना नम्र राहा, जेणेकरून कौटुंबिक शांतता टिकून राहील. जोडीदारासोबत संध्याकाळ मजेत जाईल. वृषभ: आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळताना दिसेल. विशेषतः जे लोक रिअल इस्टेट किंवा शेतीशी संबंधित आहेत, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील एखाद्या मंगल कार्याचे नियोजन आज ठरू शकते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा जनसंपर्क वाढेल. मिथुन: आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाच्या ठिकाणी काही गुप्त…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.  पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांच्या संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रसिद्ध उद्योगपती राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे,…

Read More

शिर्डी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व गट-तट विसरून शिवसैनिकांची वज्रमूठ सहाही तालुक्यांत पक्षाला मोठा विजय मिळवून देईल, असा निर्धार शिवसेनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित कार्यकारिणीची निर्धार बैठक आणि सत्कार सोहळा शिर्डी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूरचे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले. या बैठकीच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभेतील ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार अनिल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील काम करण्याच्या, कामाचा दर्जा आणि सुरक्षितता याच्याशी कोणतीही तडजोड करू नका अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उड्डाणपुलाच्या कामदरम्यान नागरिकांना येत असलेल्या समस्यांची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आमदार खताळ यांना दिले. यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या ठिकाणी ये-जा…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –  कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीची जनावरे हस्तगत करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (८ फेब्रुवारी) रात्री १२ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर २ मधील एका पडक्या घराच्या आडोशाला काही गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली आहेत. या जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता केवळ कत्तल करण्याच्या हेतूने त्यांना तिथे ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ५,४४,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भिकाजी राहिंज (वय ४६, रा. पिंपरणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास पिंपरणे ते संगमनेर रोडवरील ‘हॉटेल गरीब’ येथे ही कारवाई…

Read More