Author: Annant Ppangarkar
संगमनेर, २७ जानेवारी – महावितरण कार्यालयात वीजबिल, नवीन वीज जोडणी आणि ट्रिपिंग यांसारख्या विविध तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक असून, यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सक्त सूचना त्यांनी महावितरणच्या आढावा बैठकीत दिल्या. संगमनेर शहर आणि तालुक्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय कार्यालयात ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे उपअभियंता उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील जुना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वाहनांचा अतिवेग यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः पुणे रोडवरील मौलाना आझाद मंगल कार्यालय समोर आणि जोर्वे नाका या दोन ठिकाणी वाहने अतिशय वेगाने धावत असल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या परिसरात शाळा, रहिवासी वस्ती आणि बाजारपेठ असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक गुड्डू इंजिनिअर यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन दिले आहे. यापूर्वी अनेकदा स्थानिक स्तरावर अर्ज देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष…
संगमनेर, २७ जानेवारी – भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने नाशिकच्या पालकमंत्र्यांची प्रजासत्ताक दिनाची कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पालकमंत्र्यांना जाब विचारणाऱ्या भीम कन्या माधवी जाधव यांच्यावर कोणताही अन्याय झाल्यास किंवा प्रशासकीय कारवाईचा प्रयत्न झाल्यास सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ॲड. किरण रोहम यांनी पी. जे. रोहम फाउंडेशनच्या माध्यमातून दिला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात नाशिक येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याने एक मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत असून, पी.…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल, मात्र जोडीदाराशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी बदला. वृषभ- आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी शुभ राहील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य असून जुने आजार…
संगमनेर | अनंत पांगारकर संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक वास्तू आणि ऐतिहासिक कोनशिला सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नुकत्याच साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील सुज्ञ नागरिक ॲड. सैफुद्दीन शेख यांनी या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर हा वारसा नष्ट होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ॲड. शेख यांनी म्हटले आहे की, संगमनेर नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या प्रवेशद्वारावर असलेले गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक ‘प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी’ यांच्या नावाचा फलक पूर्णपणे गंजला असून, त्यावरील अक्षरेही…
संगमनेर, प्रतिनिधी – तमाशासम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा जपत लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव देशपातळीवर पोहोचवणारे ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगमनेरकरांच्या वतीने त्यांचा अभूतपूर्व गौरव करण्यात येणार आहे. येत्या रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. तमाशा ही महाराष्ट्राची अस्मिता असून खेडकर यांनी या कलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. कांताबाई सातारकर यांच्यानंतर त्यांनी केवळ ही कलाच जपली नाही, तर तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्षपद भूषवून कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी यशस्वी लढाही दिला. आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावात जेव्हा पारंपारिक…
अहिल्यानगर, २६ जानेवारी संगमनेर नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १ कोटी रुपये निधी देण्याची बाब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केली असताना, अचानक हा प्रस्ताव राज्य सरकारकडे का पाठवण्यात आला, असा रोखठोक सवाल उपस्थित करत शासन स्तरावर या प्रस्तावाबाबत नेमकी काय कार्यवाही झाली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्मारकाच्या कामातील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार तांबे यांनी प्रशासकीय धोरणे आणि प्रलंबित विकासकामांवरून धारेवर धरले. या बैठकीत त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रशासकीय विसंगतीकडेही लक्ष वेधले.…
आजचे राशीभविष्य: मेष – मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सरकारी कामात प्रलंबित असलेले निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील. प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरातील थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील. मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. संवादातून अनेक समस्या सुटू शकतात, त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी…
अहिल्यानगर, २६ जानेवारी संगमनेर तालुक्यातील धार्मिक आणि सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान (खळी) आणि श्री क्षेत्र विठोबा देव मंदिर (धांदरफळ बु.) या दोन देवस्थानांना शासनाकडून अधिकृतपणे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता या दोन्ही देवस्थानांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विशेष दर्जामुळे जिल्हा नियोजन समिती आणि…
मुंबई, २६ जानेवारी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी संगमनेरचे झुंजार युवा नेतृत्व साथी अनिकेत घुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात ही निवड जाहीर करण्यात आली. या अधिवेशनासाठी छात्र भारतीचे मावळते अध्यक्ष रोहित ढाले आणि राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिकेत घुले यांची गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळख आहे. शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. विशेषतः शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी संगमनेर भागात २०२४-२५ या वर्षात…
अहिल्यानगर, २६ जानेवारी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संगमनेरचे भूषण आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे तमाशा या लोककलेला राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुकुट लाभला आहे. या ऐतिहासिक सन्मानाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रघुवीर खेडकर यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला जो सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध कलावारसा समर्थपणे पुढे नेत रघुवीर खेडकर यांनी तमाशा या लोककलेला नवी ओळख, नवे परिमाण आणि नवी उंची मिळवून दिली. सोंगाड्याच्या हजरजबाबी भूमिकेपासून वगनाट्यातील दमदार अभिनय तसेच पारंपरिक लावणी नृत्य आणि अष्टपैलू सादरीकरणातून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर…
डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर संतोषभाऊ… आज आई पाहिजे होती… एक हुंदका बाहेर पडला आणि क्षणभर आम्ही दोघेही नि:शब्द झालो… रघुभाऊ फोनवर बोलत होते. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे मागील पंचावन्न वर्षांचा तमाशा रंगभूमीवरचा प्रवास आठवत भाऊ बोलत होते. सन २०१५ पासून तमाशा लोककलेला पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. सुरुवातीची अनेक वर्षे कांताबाई सातारकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. त्यानंतर दरवर्षी सप्टेंबर महिना आला की पद्मसाठीचा अतिशय क्लिष्ट असा फॉर्म भरायला सुरुवात व्हायची. यासाठी सुरुवातीला माझे मित्र ज्ञानेश्वर केदार यांच्या मदतीने अविनाश वर्पे यांच्याकडे हे काम चालायचे. पुढे या सगळ्याचा सराव झाला. दरम्यान कोविडमध्ये कांताबाई गेल्या. नंतर…
संगमनेर, २५ जानेवारी | अनंत पांगारकर संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या ३३ लाखांच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते, तोच शनिवारी पुन्हा संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १००० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून १० जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील अनियंत्रित कत्तलखाने बंद करण्याचे धाडस स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी जोर धरत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.…
संगमनेर | प्रतिनिधी आयुष्यभर तमाशा या लोककलेचे जतन, संवर्धन करत कलाप्रेमींचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारे संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत, स्व. कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र तसेच अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून लोककला क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण तमाशा कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर ही लोककलावंतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर हे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. खेडकर यांची ही निवड म्हणजे तमाशा या महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेला मिळालेले ‘गतवैभव’ असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली असून, या गौरवामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जपलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला आहे. एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवरांसह देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. कला, समाजसेवा, विज्ञान आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रासाठी यंदाचा पद्म पुरस्कार सोहळा विशेष ठरला आहे, कारण राज्यातील चार व्यक्तींना या यादीत स्थान मिळाले आहे. लोकनाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांताबाई खेडकर आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता. कृषी क्षेत्रात कापूस…
नाशिक | २५ जानेवारी २०२६ पालघरमध्ये २१ जानेवारी रोजी ५०,००० लोकांच्या उपस्थितीत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर, आता नाशिकमध्ये शेतकरी संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज, २५ जानेवारी रोजी नाशिकमधून सुमारे ५५,००० शेतकऱ्यांचा भव्य ‘लाँग मार्च’ मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या महामोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, इंद्रजित गावीत आणि उमेश देशमुख यांसारखे दिग्गज नेते करत आहेत. हा लाँग मार्च मुख्यत्वे दोन मोठ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी काढण्यात आला…
नाशिक | प्रतिनिधी कर्करोगाचा धोका सातत्याने वाढत असतानाच, या आजाराच्या उपचारांमधील सर्वात मोठा अडसर हा निदानासाठी लागणारा खर्च ठरत आहे.भारतात कर्करोगाची लक्षणे असलेल्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांकडे प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक पैसे नसतात, तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून सुमारे ५५ ते ६० टक्के रुग्ण केवळ आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करतात. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या आता मोफत करण्यात आल्या आहेत. कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात असून,या सुविधेचा लाभ आतापर्यंत…
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडत असलेल्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सत्तेचा किती हव्यास आहे, याचं चित्र दिवसगणिक पहायला मिळत आहे. विशेषत: सत्ताधार्यांना पडलेला हव्यास इतका विकृत आहे, की कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या पक्षाकडेच एकवटली पाहिजे, असा पण या पक्षांचा दिसतो आहे. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्या पक्षांची आहे. यात कोणाही राजकीय पक्षाची मागे राहायची तयारी नाही. जो तो सत्तेसाठी हपापलेला आहे. हे हपापलेपण पाहून मतदारही आपण यांना निवडून देऊन गैर तर केलं नाही ना, असा प्रश्न स्वत:लाच विचारू लागला आहे. विशेषत: महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या हव्यासाची विकृती अधिकच डोकं वर काढू लागली आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला पोहोचलंय…
आजचे राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना नम्रता ठेवा. आर्थिक बाबतीत थोडे नियोजन आवश्यक आहे, विनाकारण खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ – आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार करत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवा. दुपारनंतर काही चांगली बातमी मिळण्याची…
