Author: अनंत पांगारकर

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी उद्या रविवारी, (२१ डिसेंबर) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने क्रीडा संकुल परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले असून अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या दिवशी सुरक्षिततेच्या कारणास्तव खालील मार्गांवरून सर्व वाहनांना व नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे-  ईदगाह मैदान ते नेहरू गार्डन: हा संपूर्ण रस्ता मतमोजणीच्या दिवशी बंद राहील. शहर पोलीस स्टेशन ते संजय गांधी नगर: या दरम्यानचा रस्ता बॅरिकेडिंग करून पूर्णतः बंद असेल. वकील कॉलनी व अभंग मळा: या भागातून…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर संगमनेर नगरपरिषदेच्या रखडलेल्या तीन जागांसाठी आज (शनिवारी) रणधुमाळी उडाली आहे. या तीन जागांसाठी आज सकाळीच शांततेत मतदान सुरू झाले असून सकाळी साडेनऊ पर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले होते. तर नगराध्यक्षपदासह २७ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले आहे. उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर संगमनेर शहराच्या स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निकालातून शहराचा ‘किंग’ कोण ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुमारे ११,४२६ मतदार आज ९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार असून, उद्या रविवारी (२१ डिसेंबर) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या निवडणुकीत…

Read More

मेष – आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, पण त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग आहेत. व्यावसायिक कामात प्रगती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील, मात्र बाहेरचे अन्न खाणे टाळावे कारण पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. मिथुन – आज तुम्हाला बुद्धी आणि कौशल्याचा वापर करावा लागेल. नवीन लोकांशी संपर्क होईल जो भविष्यात फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत असलेल्या जुन्या कुरबुरी संपतील. प्रवासाचे बेत आखले जातील. कर्क – आजचा दिवस थोडा संयमाचा आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्याच्या जनतेने ४० वर्षे प्रेम दिले, आम्ही कष्टाने निळवंडे धरण, थेट पाईपलाईन आणि रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. मात्र, आता हाच विकासाचा वारसा उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू असून ज्यांनी रेल्वे पळवली, त्यांना ओळखा आणि तालुका वाचवण्यासाठी वेळीच एकत्र या, असे प्रखर आवाहन माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर सेवा समितीच्यावतीने गणेशनगर येथे आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष व उमेदवार असलेले…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाला मोठे यश आले आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी मोहीम राबवत आतापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद केले. सुरुवातीला घटनेच्या दुसऱ्या दिवशी पकडण्यात आलेल्या बिबट्यानंतर पुन्हा एका बिबट्याला गुंगीचे औषध (डॉट) देऊन पकडण्यात आले, तर एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची संख्या जवळेकडल मध्ये तीन वर गेली आहे. काही दिवसांपूर्वी जवळेकडलग येथील अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. शासनाने या घटनेची गंभीर दखल…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत ‘संगमनेर मॉडेल’ राज्यासमोर ठेवणारे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने ९ अद्यावत अभ्यासिका उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे.  या उपक्रमाचा शुभारंभ म्हणून राजापूर येथे ग्रामविकास २५१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३० लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या अभ्यासिकेचे भूमिपूजन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार ही ओळख जपत लोकनेते बाळासाहेब थोरात…

Read More

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चंदनाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून झडती घेतली. या धडाकेबाज कारवाईत ५ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता.  गुरुवारी (१८ डिसेंबर) एलसीबीचे…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार १९ डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील राहाता वगळून उर्वरित संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजीच केंद्रांवर दाखल होणार आहेत. निवडणूक कामात कोणताही अडथळा येऊ…

Read More

मेष: कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराशी संवाद वाढवा. मिथुन: नवीन कामाची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्क: आजचा दिवस धावपळीचा ठरेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. व्यापार-उद्योगात फायदा होईल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे. कन्या: नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरासाठी काही खरेदी कराल. तूळ: प्रवासाचे योग आहेत. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वृश्चिक: आरोग्य आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. गुपित गोष्टी कोणाशीही…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम आयडीवरून मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह सब-टायटलसह काही व्हिडिओ आणि मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या पोस्टमध्ये दोघांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.  भाजपचे ज्येष्ठ नेते…

Read More