Author: Annant Ppangarkar

मुंबई, दि. २७: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे. पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर…

Read More

अहिल्यानगर दि. २७- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न करून घ्यावे लागणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ फेब्रुवारी महिन्यापासून बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फेब्रुवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) अतुल चोरमारे यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी उघडलेले बँक खाते आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकासोबत जोडण्यासाठी बँक खाते, आधार व मोबाईल क्रमांक आदी माहिती संबंधित…

Read More

अहिल्यानगर दि. २७-  कृषी विभागामार्फत सन २०२१-२२ पासून कृषी यांत्रिकीकरण योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे सोडत पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सध्याच्या सोडत पद्धतीविषयी बदल करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे अभिप्राय ३० जानेवारी, २०२५ पर्यंत कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेची सध्याची सोडत पद्धत योग्य आहे का, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीची सोडत पद्धत असावी असे वाटते काय, प्रचलित सोडत पद्धत व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी कोणती सोडत पद्धत प्राधान्याने राबवावी याबाबत शेतकऱ्यांनी त्यांचे अभिप्राय सादर करावेत, असेही बोराळे यांनी म्हटले आहे.

Read More

संगमनेर दि. २७- संगमनेर शहरामध्ये शासकीय विश्रामगृहासमोरील चांदणी खानावळी समोर ‘गावचा सरपंच होऊ दिले नाही’, या कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी शनिवारी रात्री १९ दिवसानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते (दोघे रा. सोनोशी, ता. संगमनेर) व आकाश संतोष चकोर (रा. पिंपळे ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. ७ जानेवारीला घडलेल्या या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल १९ दिवसांचा कालावधी लागला आहे. शहर पोलीस ठाण्यात सोनोशी येथील उपसरपंच राजेंद्र तुकाराम सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६४, भारतीय न्याय…

Read More

संगमनेर दि. २७- अवैध धंद्याचे प्रमुख केंद्र बनलेल्या अकोले नाका येथे विनापरवाना चोरून देशी दारूची विक्री करणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी छापेमारी केली. यातील दारू विकणाऱ्या दोन महिला आरोपी फरार झाल्या आहे. या चारही दारू विक्रेत्यांकडून पोलिसांनी विक्रीसाठी असलेल्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात चार स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. पोलीस शिपाई विशाल रामदास कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मीरा भारत सोनवणे (रा. अकोले नाका, संगमनेर) व किरण बबन नाईक (रा. बुळकुंडे मळा, ढोलेवाडी, संगमनेर) यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील मीरा भारत…

Read More

अहिल्यानगर दि. २७- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती सुरू आहे. आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या या भरतीला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देत बँकेची भरती प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. रविवारी (२६ जानेवारी) वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांच्यासह वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेत त्यांना या संदर्भातील निवेदन दिले. जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद वगळण्यात आली आहे. वंचित शोषित घटकांवर अन्याय होऊ नये असा आग्रह शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे धरला. संचालक मंडळाचा कुठल्याही रास्त प्रक्रियेशिवाय आरक्षणाची तरतूद रद्द करणाऱ्या निर्णयाचा यावेळी…

Read More

मुंबई दि. २६- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तू स्थितीत धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिले आहे. या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी, शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव…

Read More

प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी- राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या आणि अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावामध्ये आगळावेगळ्या पद्धतीने झालेल्या ध्वजारोहणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गावचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब भांड यांच्या पुढाकारातून ७६ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गावातील आत्तापर्यंतच्या माजी सरपंचांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी आत्तापर्यंतचे माजी सरपंच उपस्थित होते. गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आतापर्यंतच्या या माजी सर्व माजी सरपंचांचा ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब भांड, राजापूरच्या सरपंच कुसुमताई पानसरे, उपसरपंच सोमनाथ हासे यांनी फेटे बांधून सत्कार केला. माजी सरपंचांमध्ये संपत हासे, शोभा गोसावी, माधव हासे, सुरेखा हासे, रोहिणी खतोडे, संजय हासे, बादशहा हासे, शैला हासे आदींचा समावेश…

Read More

संगमनेर दि. २६- तुझ्या मुलीला उचलून नेत परस्पर मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, प्रेम संबंध बद्दल नवऱ्याला माहिती देईल असे वारंवार धमकावत विवाहित महिलेचे शारीरिक संबंध निर्माण करत तिला आर्थिक ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहरालगतच्या राहणे मळा येथील ओमकार नामदेव सोनवणे या आरोपीविरुद्ध शनिवारी संध्याकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका विवाहित महिलेशी ओळख निर्माण करत आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. पीडित महिला आणि आरोपीची २०२२ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून २६ मे २०२२ रोजी आरोपी सोनवणे याने…

Read More

दि. २६ जानेवारी- तीर्थक्षेत्र माहूर शहरात असलेल्या ठाकूर बुवा यात्रेसाठी आलेल्या दिंडीतील भाविकांनी शनिवारी रात्री (२५ जानेवारी) भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या भाविकांना मळमळ उलट्या झाल्याने विषबाधेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रविवारी पहाटे ही घटना घडली असून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीर्थक्षेत्र माहूर शहरात दरवर्षी षट्तिला एकादशीला ठाकूर बुवा यांची यात्रा भरते. यात्रेसाठी राज्यभरातून अनेक ठिकाणच्या पायी दिंड्या माहूरमध्ये येत असतात. दिंड्यांसाठी मोकळ्या जागेत, विविध…

Read More

अहिल्यानगर दि. २६ जानेवारी- आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथोस्तवासारखे उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “ग्रंथालय ऑन व्हील” हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचे आश्वासन अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे. शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे,…

Read More

संगमनेर दि. २६ जानेवारी – भारतीय राज्यघटनेने सर्वांना समानतेसह स्वातंत्र्य व विविध मूलभूत अधिकार दिले आहेत. ही राज्यघटना जपणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून जगातील सर्वात आदर्श अशी आपल्या भारताची राज्यघटना असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात थोरात बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे, रोहिदास पवार, ॲड. अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, रामदास तांबडे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींसह अनेकांनी या…

Read More

पुणे – पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा गौरव करण्यात आला असून कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकारी संचालकांचा पुरस्कार देत सन्मान करण्यात आला आहे. पुण्याच्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये २०२३-२४ यावर्षीचे विविध पुरस्कार खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते देत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, खासदार विशाल पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, विवेक कोल्हे, नरेंद्र घुले, जयप्रकाश दांडेगावकर आदींसह राज्यभरातून…

Read More

वाचकहो, मथळा पाहून तुम्हाला कळलं असेल आम्हाला काय म्हणायचेय ते. हा महाराष्ट्र आहे इथे कोणीही कसाई होऊ शकतो. राजकारणात कोणाचीही कत्तल करायला इथे फार मेहनत घ्यावी लागत नाही. जिथे शरद पवारांची जागा अजित पवार आणि उध्दव ठाकरेंची जागा एकनाथ शिंदे घेऊ शकतात, त्या राज्यात काहीही घडू शकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विमान दाहोसला उतरता उतरता महाराष्ट्रभर सामंतांच्या उदयाची जोरदार चर्चा सुरू झाली.  सामंत यांच्याविषयी राजकीय गणिताच्या पायर्‍या रचल्या जाऊ लागल्या. त्या अगदीच वायफळ होत्या असं कोणी म्हणेल तर त्याची राजकारणातल्या वेड्यात गणती होईल. ही ती वेळ नाही, असंच कोणी सांगेल. अपेक्षित नसताना ५७ जागा मिळवणं, अपेक्षित नसताना महत्वाची मंत्रिपदं मिळणं, पुढे…

Read More

नवी दिल्ली दि. २५- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर ११ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ मान्यवरांना पद्मश्री-  कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले…

Read More

नवी दिल्ली, दि. २५ : राज्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ तर ४४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली असून यात राज्यातील एकूण ४८ पोलिसांचा समावेश आहे. ४४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) जाहीर झाले असून यातील ३९ पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९४२ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून…

Read More

संगमनेर दि. २५ – राज्य नव्हे तर देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आणि कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समाज माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस, जिल्हा सायबर विभागाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. थोरात कारखान्याचे एन्व्हायरमेंट केमिस्ट भास्करराव पानसरे यांनी या संदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही अहिल्यानगर सायबर सेल पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून विशेषतः काही ठराविक विचाराने प्रेरित व्हाट्सअप ग्रुप वरून काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक थोरात कारखान्याचे कार्यकारी…

Read More

अहिल्यानगर दि.२५- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.  सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

महाराष्ट्रात १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या ९.५४ कोटी असताना मतदार ९.७ कोटी कसे? निवडणूक आयोगाने ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ बनवले. मुंबई, दि. २५ जानेवारी २०२५ लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख…

Read More

अहिल्यानगर – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाशिवाय ७०० जागांवर नोकर भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. बँकेच्या आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरती निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले आहे. यावेळी हिरालाल पगडाल, अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर राक्षे, के. जी. भालेराव, राजीव साळवे, अरविंद सांगळे, फ्रान्सिस सोनवणे, सुनील क्षेत्रे, प्रा. भीमराव पगारे, सुभाष ब्राह्मणे, राजाभाऊ अवसक, नितीन कसबेकर, सिताराम राऊत, अनिकेत घुले आधी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याचे अग्रेसर बँक…

Read More