Author: Annant Ppangarkar
मेष – आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे. चंद्र गोचर तुमच्यासाठी शुभ योग घेऊन येत आहे, ज्यामुळे तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. विशेषतः बँकिंग आणि आर्थिक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. बऱ्याच दिवसांपासून असलेली एखादी चिंता किंवा अडचण आज दूर होऊ शकते. जीवनसाथीकडून तुम्हाला चांगले सहकार्य प्राप्त होईल. घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात तुमचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल, कारण मानसिक भटकावामुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात. लहान मुलांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि आज तुम्हाला एखादे सुंदर उपहार मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शरीर आणि मनाने स्वस्थ आणि…
संगमनेर – काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना मोठी भेट दिली आहे. २०२४-२०२५ हंगामात गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन २०० रुपयांप्रमाणे ऊस विकास अनुदान ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. ऊस विकास अनुदान, ठेव व ठेवीवरील व्याज, आणि कामगार बोनस अशा एकूण २५.१० कोटी रुपयांची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. ३२०० रुपये प्रति टन उच्चांकी भाव – कारखान्याने प्रति टन २०० रुपयाप्रमाणे रक्कम वर्ग केल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना यंदा प्रति टन…
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मतदार याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर यावेळी आयोगाचे लक्ष वेधण्यात आले. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट असल्याचे आणि अनेक पत्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्या ठिकाणी मतदार नोंदवले गेल्याच्या गंभीर त्रुटी शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. या पार्श्वभूमीवर, तांत्रिक साधनांचा वापर करून दुबार मतदार व संशयास्पद नोंदींची तत्काळ छाननी करावी, या त्रुटी त्वरित दुरुस्त…
अहिल्यानगर: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून प्रारुप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील एकूण सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियांसाठी (सर्व प्रवर्गांमधील) आरक्षित ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. या प्रारुप आरक्षणासंदर्भात कोणाच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्या लेखी स्वरूपात १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे. पंचायत समितीशी संबंधित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – तुम्ही दररोज इतरांच्या घरात काम करतात. साफसफाई, स्वयंपाक, सेवा, मोठ्या-मोठ्या बंगल्यांमध्ये तुम्ही स्वच्छता करता, पण स्वतःच्या राहण्यासाठी छत नाही, हे अन्यायकारक आहे. तुमचंही एक स्वप्न आहे ‘आपलं स्वतःचं घर असावं!’ हे स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांमधून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ असे आमदार सत्यजित तांबे यांनी महिलांना आश्वस्थ केले. आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कामगार संघटनेच्यावतीने संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या…
संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांनी प्रेरित आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने यंदाच्या दीपावली सणाच्या तोंडावर दूध उत्पादक आणि कामगारांसाठी मोठा दिलासा दिला आहे. दूध संघाने दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत रक्कम, कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी अशा विविध बाबींसाठी तब्बल ४१ कोटी रुपये थेट बँकेत वर्ग केले असल्याची माहिती संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे. रणजितसिंह देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सातत्याने प्रशंसनीय राहिली आहे. दूध व्यवसाय आता संगमनेर…
मेष (Aries): आजचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक असेल. तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह उच्च राहील, ज्यामुळे कामात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. व्यापारात केलेल्या योजना यशस्वी होतील आणि सरकारी लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus): आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. मित्र आणि स्नेह्यांच्या भेटीमुळे आनंद मिळेल. मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे, तसेच वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न तुमच्या बाजूने सुटतील. कुटुंबातील काही व्यक्तींच्या वागण्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. मिथुन (Gemini): कुटुंबात तुमचा मान वाढेल आणि तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. करिअर किंवा कुटुंबातील कार्यक्रमांसाठी प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे खर्च वाढण्याची आणि आर्थिक…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या संगमनेरमधील नऊ जागांसाठी व तालुका पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद जागांसाठी अहिल्यानगर मध्ये तर पंचायत समितीच्या जागांसाठी संगमनेरमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बहुतांशी गट आणि गण राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर राखीव जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे अनेक प्रस्थापितांचे साम्राज्य धुळीस मिळाले आहे. तसेच पुन्हा निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे. असे आहे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण…. समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तळेगाव – सर्वसाधारण महिला आश्वी बुद्रूक – नागरिकांचा…
अहिल्यानगर – आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज (दि. १३ ऑक्टोबर) रोजी पार पडली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी झालेल्या या सोडतीनुसार २९ गट खुल्या प्रवर्गासाठी, २० गट इतर मागासवर्गीय (OBC) (यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांचा समावेश आहे), अनुसूचित जमातीसाठी (ST) ९ गट, अनुसूचित जातीसाठी (SC) ७ गट व उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव आहेत. जिल्हा परिषदेची ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष निवडणुकीच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहरातून प्रेमसंबंधातील त्रिकोणातून घडलेली एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि क्रूर घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयाने आणि संतापाने एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा निघृण खून केला आहे. वाढदिवस एकत्र साजरा केल्यानंतर प्रियकराने केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने प्रेयसीचा गळा चिरल्याची ही धक्कादायक घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत मेरी मल्लेश तेलगू या तरुणीचा खून झाला असून, तिच्या प्रियकर दिलावर सिंग (वय २५) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग आणि मृत मेरी मल्लेश तेलगू हे दोघे २०१७ पासून प्रेमसंबंधात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेरीचे…
मेष (Aries): आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कामात नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. जुनी कामे पुढे सरकतील. वृषभ (Taurus): पैशांचा वापर जपून करा. विनाकारण खर्च करणे टाळा. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता. मिथुन (Gemini): वैयक्तिक संबंधात इतरांच्या भावनांमध्ये अडकू नका. संवाद साधण्यासाठी चांगला दिवस. आरोग्याची काळजी घ्या. कर्क (Cancer): नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सिंह (Leo): कामाच्या ठिकाणी संयमी व्यक्तिमत्त्व ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला प्रमोशन किंवा भाग्याची साथ मिळण्याचे योग. कन्या (Virgo): जास्त भावनिक होऊन विचार करू नका. बुद्धिमत्ता आणि विश्लेषण क्षमता कामात स्थिरता आणेल. तूळ (Libra): कामाच्या निमित्ताने…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५, रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. हा खून की घातपात, याचा कसून तपास घारगाव पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात रोज सकाळी भाविक दर्शनासाठी जातात. रविवारी सकाळी काही भाविक दर्शनासाठी गेले असता, त्यांना भक्तनिवासातील सभामंडपात भाऊराव बाचकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त…
संगमनेर – इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या व डिग्रस येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रगती सखाराम श्रीराम हिची शनिवारी रात्री राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत तिची आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. डिग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात शिकणारी प्रगती शनिवारी सकाळी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या असून ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर बिबट्याने केलेल्या…
देशातील बिघडत्या सामाजिक वातावरणाने आता अतिरेक गाठला आहे. धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवणार्यांवर सरकारचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचा बळी घेणार्या शक्तीने टोकाचं पाऊल गाठत आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना टार्गेट केलं आहे. खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना 75 वर्षाच्या राकेश तिवारीने त्यांच्यावर पायातला बुट फेकला. ही घटना एकट्या गवईंपुरती मर्यादित राहिलेली नाही. ज्यांनी देशातील जनतेला न्याय द्यावा, अशा यंत्रणेच्या प्रमुखावरच बुट फेकला जात असेल तर सामान्यांचं या देशातील स्थान काय? असा साधा प्रश्न आहे. गवईंनी या व्यक्तीला माफ केलं…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असून घरात समाधानाचे वातावरण राहील. तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांबद्दल आणि जोडीदाराबद्दल प्रेमाची भावना वाढेल. बुद्धी आणि विवेक वापरून घेतलेले व्यावसायिक निर्णय यशस्वी होतील. वृषभ (Taurus): दूरदृष्टी आणि चांगले नियोजन तुमच्या संपत्तीत वाढ करेल. तुमच्या यशामुळे कुटुंबाला अभिमान वाटेल. तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळण्याचे योग आहेत. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज तुमचे विचार इतरांना प्रभावीपणे मांडण्याची तीव्र इच्छा असेल. मिथुन (Gemini): आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बरीच प्रगती कराल, हा सकारात्मक टप्पा आहे. निरोगी खाण्याच्या सवयींमुळे किरकोळ आजारांपासून दूर राहाल. एखादा महत्त्वाचा घरगुती प्रश्न तुमच्या कौशल्याने हाताळावा लागेल. कामामध्ये जास्त घाई…
संगमनेर – तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. शनिवारी (दि. ११ ऑक्टोंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बबन इघे (वय ३१, रा. खडकवाडी, ता. पारनेर) हे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्याच वेळी दत्तात्रेय देवराम गाडगे (वय ४९, रा. लोणी, ता. राहाता) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार सचिन इघे…
संगमनेर: पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जातीचे मांस तस्करी करताना रंगेहाथ एका आरोपीला पकडले, तर गोमांसाचा मालक आणि एका वाहनाचा मालक असलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचे गोमांस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (११ ऑक्टोंबर) सकाळी ०७.०५ वाजता पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, रहेमतनगर येथे मोहंमद अतीक रफीक कुरेशी ऊर्फ सोन्या (रा.…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील डिग्रस-अंभोरे रस्त्यावर सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची भयानक घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेला व गळ्याला खोल जखमा झाल्या आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला आणि मुलीचा जीव वाचला. इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात होती. डिग्रस गावाजवळ रस्त्यालगतच्या शेतातील गिन्नी गवत व कपाशीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेला चावा घेऊन तिला फरफटत गवतात ओढून नेले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी…
संगमनेर – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदा दिवाळीनिमित्त आपल्या सभासदांना मोठे गिफ्ट दिले आहे. कारखान्याने यंदा दरवर्षीपेक्षा दुप्पट, म्हणजेच प्रत्येक सभासदाला ३० किलो मोफत साखर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साखरेचे वाटप १५ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू असून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने नेहमीच शेतकरी, सभासद, उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य दिले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका पोलिसाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. विशाल वाघाटे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ३० वर्षीय तक्रारदाराविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची तक्रार प्राप्त झाली होती. या गुन्ह्यात योग्य ती मदत करण्यासाठी तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी विशाल वाघाटे याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली. ९ ऑक्टोबरला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली, यात आरोपी पोलीस वाघाटे यांनी…
