Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी-  राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी मांडलेला विकासाचा ‘धडाका’ आता कोट्यावधी रुपयांच्या दाव्यात रूपांतरित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा भरघोस निधी खेचून आणण्यात आ. खताळ यांना यश आले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामांना मोठी गती मिळाली आहे. ग्रामीण विकासाचा कणा असलेले रस्ते मजबूत करण्यासाठी आ. खताळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेतून १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात तुटणारा गावांचा संपर्क आणि…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, फक्त आहारावर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास अधिक फायदा होईल. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील. मिथुन -…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत. नेमके काय आहेत निर्बंध?- या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगणे, एकत्र जमा होणे किंवा प्रक्षोभक कृती करणे यावर बंदी असेल. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कोणाला मिळणार सवलत? सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींना या आदेशातून वगळण्यात आले आहे: धार्मिक विधी व…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  राजकारण आणि समाजकारणाच्या मैदानात एकमेकांना खंबीरपणे साथ देणारे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने पाहायला मिळाले. निमित्त होते संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘२६ व्या सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’. जेव्हा दुर्गाताईंनी हातात चेंडू घेतला आणि समोर डॉ. सुधीर तांबे बॅटिंगसाठी सज्ज झाले, तेव्हा उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले. तांबे दांपत्याची ही खेळाडूवृत्ती पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (१ जानेवारी) आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने २६ व्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर…

Read More

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज- अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. जहागीरदार याची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी जर्मन रुग्णालयासमोर झालेल्या या थरारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास, कब्रस्तान परिसरातील जर्मन रुग्णालयासमोर बंटी जहागीरदारवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला अमिन गुलाब शेख हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या राजापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामसभेत झालेल्या या निवडीमुळे राजापूरमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तरुणांनी या निर्णयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. राजापूर हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि मोठे बागायती क्षेत्र असलेले समृद्ध गाव आहे. या ऐतिहासिक गावात नागरी प्रश्नांची व्याप्ती मोठी असल्याने, गावातील छोटे-मोठे वाद पोलीस ठाण्यापर्यंत न जाता स्थानिक पातळीवर सामोपचाराने सुटावेत, अशी ग्रामस्थांची भावना होती. भाऊसाहेब हासे यांच्या जनसंपर्क आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. मिथुन – आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढल्यामुळे थोडा थकवा जाणवेल, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण…

Read More

श्रीरामपूर –  शहरातील वर्दळीच्या भागात आज दुपारी झालेल्या एका थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरून गेले आहे. कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतणारे राजकीय कार्यकर्ते असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  या घटनेनंतर कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास बंटी जहागीरदार हे त्यांचे मित्र अमीन हाजी यांच्यासोबत…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान ओढले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला ‘प्रशासक काळ’ आता संपुष्टात येणार असून, नववर्षाच्या पहिल्याच शनिवारी (३ जानेवारी) नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. या सोहळ्यासाठी संगमनेर पालिकेमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांची पालिकेतील सत्तेची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करत ऐतिहासिक विजय नोंदवला. डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या…

Read More

प्रतिनिधी –  कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या दोन मोठ्या कॅफेंवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, तासाच्या हिशोबाने जागा भाड्याने देणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘आपलं कॅफे’ आणि ‘मराठी कॅफे’ या दोन ठिकाणी तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी खाजगी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हे कॅफे चालक केवळ जागेचे पैसे घेऊन अशा कृत्यांना प्रोत्साहन देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी या दोन्ही कॅफेंवर अचानक छापा टाकला. यावेळी तिथे धक्कादायक प्रकार…

Read More

संगमनेर –  पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयतेने कोंडून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी २८ गोवंश जातीची जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका १० टायर कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीने या संबंधीची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना दिली. पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या सूचनेवरून पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे आदी पोलिसांनी संगमनेर ते…

Read More

अहिल्यानगर: सोशल मीडियाचा वापर करून एका १८ वर्षीय तरुणीची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून, तिचे फोटो आणि गावातील एका तरुणाचे छायाचित्र मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील एका १८ वर्षीय तरुणीच्या नावाने काही अज्ञात व्यक्तींनी इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. या खात्यावर पीडितेचे मूळ फोटो वापरून त्यासोबत चुकीची माहिती जोडण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणासोबत तिचे फोटो तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पद्धतीने तयार केले आणि ते…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, मात्र घाईघाईत कोणताही मोठा गुंतवणूक निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि सायंकाळी मित्रांसोबत नवीन वर्षाच्या स्वागताचे बेत आखले जातील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. थांबलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आज कोणालाही उधार देणे टाळावे. नवीन संकल्प करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक आहे. मिथुन: आजचा…

Read More

जुन्नर (पुणे):  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आज मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे. डुंबरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल अभिजित जवळ मजुरांनी भरलेली पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज मंगळवारी (दिनांक ३० डिसेंबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मजुरांचे पिकअप वाहन ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जात होते. याच वेळी आळेफाटा बाजूकडून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चक्काचूर…

Read More

संगमनेर-  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. विकास क्रांती सेनेसह विविध रेल्वे कृती समित्यांनी येत्या १२ जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.  या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्वांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या मागण्या कळवल्या असून आता १२ जानेवारीच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता या बहुउद्देशीय पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, परंतु घरातील व्यक्तींशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. व्यापारात नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मिथुन – आजचा दिवस धावपळीचा आणि कष्टाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल. आर्थिक देवाणघेवाण…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने जुनी देणी पूर्ण होण्यास मदत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील, मात्र बोलताना शब्दांचा वापर जपून करणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याचे योग असले तरी वायफळ खर्च टाळणे गरजेचे आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेतल्यामुळे घरातील वातावरण शांत राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित…

Read More

अहिल्यानगर – शिर्डी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शिर्डीतील हॉटेल रेणुका जवळील काटवनात दबा धरून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) यांचा मुलगा निलेश हा शिर्डीहून सावळविहीर येथे जात होता. यावेळी आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख आणि त्याच्या साथीदारांनी निलेशला रस्त्यात अडवले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, काँग्रेसने सत्ताधारी विखे-खताळ जोडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पडलेली असताना पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. या निव्वळ दुर्लक्षामुळेच १६ गावांवर तहानेची वेळ आली असून, या वाताहतीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळच पूर्णतः जबाबदार आहेत. आता निवडणुका जवळ आल्यावर जनतेचा रोष पाहून यांना योजनेची आठवण झाली का? असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकारी सचिन दिघे यांनी उपस्थित केला आहे. सचिन दिघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ही योजना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी…

Read More