Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar प्रवीण पुरो- घेतलेलं कर्ज फेडणं हे सामान्य कर्जदाराचं कर्तव्य. मात्र येनकेन कारणास्तव हे कर्ज भरणं अवघड झालं तर? अगदी गंभीर आजारात कर्जाचे अखेरचे एक-दोन हप्ते भरणं अशक्य झालं तर बँकेचे अधिकारी काय करतात? त्यातच कर्जदार व्यक्ती ते कर्ज भरू न शकल्यास म्हणजे ती मृत्यू पावल्यास हे अधिकारी त्या कर्जदाराचं आणि त्याच्यासाठी तारण राहणाऱ्या व्यक्तीचं काय करतात? या प्रश्नाचं उत्तर एकच, ते म्हणजे कोणत्याही मार्गाने वसुली! ती करण्यासाठी प्रसंगी दादागिरी, ती प्राप्त करण्यासाठी बळजबरीची वसुली. सामान्य माणूस अक्षरशः हतबल होतो. इतक्याशा पैशांसाठी तो वाकतो. त्याला आपल्या इभ्रतीची काळजी असते. ती जाऊ नये म्हणून तो आणखी कर्ज काढतो आणि खाईत…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस नवीन संधी आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येईल. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यातील योजनांना योग्य दिशा देईल. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, परंतु अवाजवी खर्च टाळावा. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामे यशस्वी होतील. वृषभ – कुटुंबात सहकार्य आणि प्रेमाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी एखाद्या विशेष प्रकल्पावर लक्ष केंद्रित कराल. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांमुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. कायदेशीर किंवा जुन्या न्यायालयीन प्रकरणांतून दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. मिथुन – मानसिक शांतता आणि संतुलनासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील, परंतु घाईघाईत कोणताही अयोग्य…
Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना शनिवारी शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यापूर्वीही याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवछत्रपती ERT टीमचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही जवानांना मृतदेह शोधण्यात यश आले आणि तो…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात तसेच त्यावर तत्परतेने तोडगा काढता यावा, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रभागनिहाय बैठकांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे संगमनेरकरांना आपल्या हक्काच्या व्यासपीठावरून थेट प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पालिका गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली. हा कोणताही नेहमीचा ‘जनता दरबार’ नसून, शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तयार केलेले एक सक्षम कार्यचौकट आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापनासारख्या दैनंदिन नागरी समस्यांवर संबंधित प्रभागातील नगरसेवक…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत राहुरी येथील घरफोडीसह पाथर्डी तालुक्यातील दुचाकी व मंगळसूत्र चोरीचे तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोहन अनिल उर्फ यासीनखाँ भोसले (वय २०, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचे इतर तीन साथीदार सध्या फरार आहेत. २५ ऑगस्ट २०२६ रोजी राहुरी फॅक्टरी परिसरातील शाहुल जॉन वंजारे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटखा विक्रेत्यांविरोधात जोरदार धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान ७ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २,९९,९९० रुपये किमतीचा अवैध पानमसाला, मावा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून एकूण १४ आरोपींविरुद्ध ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांना…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन हिक्किम: जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ‘हिक्किम’ पोस्ट ऑफिसमधून भारताच्या पंतप्रधानांना एक थेट पत्र पाठवण्यात आले आहे. वाढती असहिष्णुता, नफरत आणि सामाजिक विभाजनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संगमनेर येथील वकिल समीर लामखडे यांनी पत्राद्वारे केली आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत संगमनेरमधील वकिलाने लिहिलेलं हे पत्र चर्चेत आलं आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. मात्र, सध्या देशात ज्या प्रकारे असहिष्णुता आणि नफरतीचे वातावरण पसरत आहे, तसेच लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेवर गंभीर…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड टाळा. वृषभ- आज तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. नवीन आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन करारांची शक्यता आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन- आजचा दिवस तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची परीक्षा घेणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यावर सहजरीत्या मात कराल. प्रवासाचे योग…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. नेवासा येथील कुख्यात लष्करे टोळीतील प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण आणि सादिक बशीर शेख या ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तर कटाचा थेट व पुरेसा पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रधान…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नेपाळमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या धडकताच संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची धडधड वाढली होती. संगमनेरच्या घुलेवाडी येथील निर्मला गुंजाळ यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत २४ ऑगस्टला नेपाळला गेलेले ४५ पर्यटक या प्रलयात अडकल्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने सर्व पर्यटक पूर्णपणे सुखरूप असून ते आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनीही प्रशासनाचा पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. २६ ऑगस्टच्या दुपारनंतर नेपाळमध्ये महाप्रलयाने थैमान घातल्याच्या बातम्या वाहिन्यांवर झळकताच पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. संगमनेरमधील निवृत्त शिक्षक हिरालाल पगडाल यांच्यासह अनेक भाविकांचे नातेवाईक चिंतेत…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी केवळ एक विकास प्रकल्प नसून, तो प्रत्येक संगमनेरकराच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या मनात ज्या स्वरूपाचे स्मारक आहे, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याला पूर्णपणे न्याय देणारे भव्य-दिव्य, दिमाखदार आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे स्मारकच उभारण्यात येईल. स्मारकाच्या उभारणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यासाठी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी स्पष्ट भूमिका माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलीप पुंड यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना दिलेला स्वाभिमान, लोककल्याणकारी राज्यकारभार, सर्वधर्मसमभाव, दूरदृष्टी…
Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी सोनई आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ५ विविध ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत एकूण ८९,३६६ रुपये किमतीचा बंदी असलेला पानमसाला, मावा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून ८ आरोपींवर ५ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस…
Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जावान राहील. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता असून कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वृषभ – आज तुम्हाला कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थितीत बळकट सुधारणा दिसून येईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी दिवस अनुकूल आहे, मात्र घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील अवैध मावा आणि सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रिक मशीन, सुगंधीत तंबाखू आणि माव्यासह एकूण ४ लाख ३९ हजार ४८६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ५ आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शहरात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची दोन विशेष पथके तयार करून शहरात अवैध गुटखा व…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ गडावर परिसरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने आज गुरुवारी मोठ्या उत्साहात यात्रा पार पडत आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरी होणारी ही यात्रा सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यात्रेनिमित्त निमोण येथे अश्विनाथ गडावर जाणाऱ्या मानाच्या काठीचे पूजन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आर्किटेक्ट बी. आर. चकोर, सोमनाथ धोंडीबा घुगे, ज्ञानेश्वर धोंडीबा घुगे, ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, चंद्रकांत घुगे, साहेबराव मंडलिक यांच्यासह विविध मान्यवर आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे संत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र सरला बेटचे विद्यमान मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनाखाली एकूण ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीचा विश्वविक्रम- “वंदे मातरम्”चे एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी केलेल्या सामूहिक गायनाचा यापूर्वीचा विश्वविक्रम १ लाख ४ हजार ६३७ सहभागींच्या नावावर होता. हा विक्रम १२ जानेवारी २०१० रोजी पुणे येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने आयोजित केलेल्या “अंतर्नाद” या…
संगमनेर | मोहसीन शेख – ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी (२६ ऑगस्ट) संगमनेर शहरात काढण्यात आलेला ईद मिलाद जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक उत्सवाला सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेची जोड देत जुलूस यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजक, सहभागी नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलीस प्रशासनाने जुलूस शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोजकांशी संवाद साधत आवश्यक सूचना केल्या होत्या. पोलीस प्रशासनाच्या सूचनांना आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत संयम आणि शिस्तीचे दर्शन घडविले. हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीत शांतता, संयम, बंधुभाव आणि समाजात सलोखा निर्माण…
आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा काळ खूप अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. वृषभ- आज तुम्हाला कामात थोडे धैर्य आणि संयम ठेवावा लागेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास मानसिक शांतता मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासाच्या दृष्टीने चांगला राहील. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मित्र आणि प्रियजनांसोबत…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश आणि कर्तेपणाच्या अहंकारापासून मुक्ती असेल, तर त्याच कर्माचे रूपांतर साधनेत होते. कर्माचे डोळे म्हणजे ज्ञान आणि अहंकार सोडणे हाच खरा संन्यास आहे, अशा अत्यंत साध्या पण जीवनाला भावस्पर्श करणार्या सूत्रातून गीतेतील ज्ञान-कर्म-संन्यासयोगाचा गाभा उलगडत गीता विशारद्, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले. राजस्थान युवक मंडळाच्या चार दिवसीय ‘मनशांती आणि जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप ज्ञानेश्वरीच्या रसाळ ओव्या, भगवद्गीतेतील श्लोकांचे सहज विवेचन आणि आधुनिक जीवनाशी त्यांची घालून दिलेली सांगड यामुळे आत्मपरीक्षणाचा अनुभव ठरला. पुढील वर्षापासून या व्याख्यानमालेत ‘एक अध्याय, दोन दिवस’…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: वाहनात लिफ्ट देण्याचा बहाणा करून एकट्या-दुकट्या ज्येष्ठ महिलांना मारहाणीची धमकी देत त्यांचे दागिने लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिला आरोपीसह तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून कार, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल आठ लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मिरजगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले साखळी चोरीचे (चैन स्नॅचिंग) दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. नागलवाडी (ता. कर्जत) येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला द्वारकाबाई उत्तम डाडर या २० ऑगस्ट २०२६ रोजी मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी…
