Author: अनंत पांगारकर

श्रीरामपूर – श्रीरामपूरच्या स्थानिक राजकारणात मोठा राजकीय ‘बदल’ झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रभावी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष राहिलेले प्रकाश चित्ते यांच्यामुळे शिंदे गटाला शहरातील ओबीसी मतदारांचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा मजबूत आधार मिळेल. सूत्रांनुसार, आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गट भाजपसोबत युती न करता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहे. या पॅनलमध्ये नगराध्यक्षपदासाठी…

Read More

आज नरक चतुर्दशी असल्याने आणि दिवाळीचा सण असल्याने अनेक राशींसाठी आजचा दिवस उत्साहाचा आणि लाभदायक ठरू शकतो. ग्रह-नक्षत्रांची स्थिती आज काही राशींसाठी विशेष शुभ योग घेऊन येत आहे. मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. भाग्याची साथ मिळाल्याने आर्थिक लाभात वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मोठ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. क्रोध आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. आज गायीला गूळ खाऊ घाला. वृषभ (Taurus): आजचा दिवस भाग्यवर्धक ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभाचे योग आहेत. धैर्य आणि मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मोलाचे ठरतील. नवीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ…

Read More

संगमनेर – माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरणपूरक व स्वच्छता कामांमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १.५ कोटींचा निधी (बक्षीस) मंजूर झाला आहे. या बक्षीस रकमेतून विविध पर्यावरणपूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी वसुंधरा ४.०’ अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला हे १.५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून शहरात महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित…

Read More

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे अस्त्र उपसत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज (१९ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बोगस मतदार याद्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महायुतीमधील आमदारांपर्यंत सर्वांचे जुने व्हिडीओ जाहीर सभेमध्ये दाखवून त्यांची पोलखोल केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्थानिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास ९६ लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेत. असे होणार असेल…

Read More

देशाच्या आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने मतनोंदीपासून यादीतील मतदारांची नावं काढून टाकण्याचा केलेला घोळ सामान्य मतदारांच्या अधिकाराचा उघडपणे उपमर्द करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राज्य घटनेच्या कलम 326 अन्वये देशातील 18 वर्षं पूर्ण करणार्‍या व्यक्तीचा मतदानाचा अधिकार अबाधित आहे. मतदार यादीतील नाव नोंदवण्यापासून त्यात बदल लोकप्रतिनिधी कायद्याच्या 1950 अंतर्गत तर अपात्रतेचे नियम हे 1951 अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहेत. या कायद्यान्वये एखादी व्यक्ती कारावासात असेल, मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल अशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळत नाही. मतदाराला मतदानाचा मिळालेला घटनात्मक अधिकार कायदेशीर मानला गेला आहे. जो आजच्या निवडणूक आयोगाला मान्य नाही, असंच दिसू लागलं आहे.  केंद्रिय निवडणूक आयोग आणि राज्यांच्या निवडणूक आयोगाविषयी…

Read More

आज १९ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जुळून येत आहे. चंद्र आज कन्या राशीत स्थित आहे. मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल आणि कामात उत्साह जाणवेल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची चिंता असल्याने वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्ही तुमच्या विचारसरणी आणि गोड बोलण्याने इतरांना प्रभावीत कराल. यामुळे लोकांशी संबंधात सुसंवाद निर्माण होईल. योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर देणे महत्त्वाचे आहे. प्रेम संबंधात गोडवा आणि भावनिक शांतीचा अनुभव येईल. मिथुन: आज मनाची स्थिती थोडी द्विधा राहील…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, निष्पाप नागरिकांना लुटून मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. शहरप्रमुख सूर्यवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेरमध्ये रात्री-अपरात्री नागरिक सुरक्षित नाहीत. काही सराईत गुन्हेगार निष्पाप नागरिकांना अडवून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल आणि दागिन्यांची हिसकाहिसका करतात, आणि विरोध करणाऱ्यांना मारहाण करतात. अशा प्रकारच्या अनेक घटना पोलिसांत नोंदवलेल्या असतानाही कारवाई होत नाही.  शुक्रवारी रात्री शुभम भोईर या तरुणाला साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर राहुल सोनवणे, अनिकेत मंडलिक साई सूर्यवंशी व आणखी एकाने…

Read More

संगमनेर: शुक्रवारी रात्री घोडेकर मळ्यामध्ये म्हाळुंगी नदीच्या पुलावर गुन्हेगारांकडून घरी परतणारा तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात प्रभाग १३ मधील रहिवाशांनी एकत्रित येत सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शुभम सुरेश भोईर हा तरुण कापड दुकानातील काम संपवून घरी परतत असताना साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर काही सराईतानी त्याला अडवले. त्याच्याकडून पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुभम भोईर याने विरोध करताच, या गुन्हेगारांनी त्याला जबर मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या गुन्हेगारी कृत्यामुळे संगमनेर…

Read More

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यात झपाट्याने विकास करत असलेल्या संगमनेर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक मोठी गरज आता पूर्ण झाली आहे. दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक गाठावे लागत होते, मात्र ही कुचंबना आता थांबली आहे. संगमनेरकरांची वाढती मागणी आणि मनोरंजन क्षेत्रातील उणीव लक्षात घेत, मालपाणी उद्योग समूहाने शहरात अत्याधुनिक मालपाणी मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारले आहे. अगदी महानगरांच्या तोडीच्या सुविधांनी सज्ज असलेल्या या मल्टिप्लेक्सचे शानदार उद्घाटन शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोंबर) मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललितादेवी व श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून (शनिवार) हे चित्रपटगृह नवीन चित्रपटांसह लोकसेवेत रुजू झाले असून, संगमनेरमध्ये मनोरंजनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली…

Read More

अहिल्यानगर – श्रीगोंदा तालुक्यातून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात राज्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे अपहृत मुलीची सुटका झाली असून, तिच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी मिळून येत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी उपोषणकर्त्यांना मुलीचा तात्काळ शोध घेण्याचे आश्वासन दिले आणि स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन मुलीचा शोध घेण्याचे आदेश…

Read More