Author: अनंत पांगारकर
संगमनेर – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आयर्न लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, ‘राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र’ (RGSS) यांच्यावतीने संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर शुक्रवारी (दिनांक ३१ ऑक्टोबर) यशस्वीपणे पार पडले. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उदात्त हेतूने आयोजित या शिबिराला संगमनेरवासीयांनी उस्फूर्तपणे चांगला प्रतिसाद दिला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील शिबिर स्थळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जीवनदानाचा संकल्प’ करत राहुल गांधी समर्थक संघाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. शिबिरादरम्यान नवीन नगर रस्त्यावरील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…
मेष (Aries) – वेळेची गती तुमच्या बाजूने राहील. मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून आव्हान मिळू शकते, कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. वृषभ (Taurus) – पाहुण्यांच्या येण्या-जाण्यात वेळ जाईल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल, ज्यामुळे आनंदी वातावरण राहील, पण बजेट बिघडू शकते. व्यवसायात जास्त मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. मिथुन (Gemini) – मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर तुम्हाला हवे असलेले साध्य करू शकता. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरेल. सध्या कुठेही पैशांची गुंतवणूक करणे टाळा. कामाच्या ठिकाणी आळस टाळा. कर्क (Cancer) – कुटुंबासोबत आनंदात जाईल. कार्यक्षमतेच्या मदतीने तुम्हाला हवे असलेले यश मिळेल. भावनांवर आणि रागावर नियंत्रण ठेवा.…
संगमनेर: विधानसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे. संगमनेर येथे झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आणि ‘एकट्याने नव्हे, तर सर्वांना सोबत घेऊन’ चालण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. समन्वय समितीची घोषणा, विखे पाटलांच्या नेतृत्वावर भर – डॉ. विखे यांनी स्पष्ट केले की, संघटनात्मक निवडणुकीतील निर्णयासाठी आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समन्वय समिती स्थापन केली जाईल. उमेदवारीसह सर्व महत्त्वाचे निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील. उमेदवारीचा निकष हा केवळ जवळीक किंवा भेटीगाठींवर नव्हे, तर…
संगमनेर (प्रतिनिधी) बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व धाडसी व पराक्रमी होते. देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर पंतप्रधान होत्या, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील शक्तीस्थळ येथे देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. डॉ. तांबे म्हणाले…
संगमनेर – लोक कलावंतांना ‘शासनकृत कलावंत’ म्हणून तातडीने मान्यता द्यावी, त्यांच्यासाठी विशेष योजना लागू कराव्यात आणि त्यांच्या सध्याच्या तुटपुंज्या मानधनात भरीव वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाच्या नेतृत्वाखाली लोककलावंतांनी काल (गुरुवारी, ३० ऑक्टोबर) सकाळी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. लोककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले, यात प्रामुख्याने मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे, कारण सध्या शासनाकडून मिळणारे मानधन अत्यंत कमी आहे. तसेच, मानधनाव्यतिरिक्त लोककलावंतांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय योजना त्वरित राबविण्यात याव्यात आणि त्यांना अधिकृतपणे…
मेष (Aries) – धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी आणि घरात व्यवस्था राखण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. आर्थिक लाभ होईल, पण अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे लक्ष द्या. वृषभ (Taurus) – दिवसाची सुरुवात नवीन संधी आणि लाभाने होईल. एखाद्या परिचितांकडून मिळालेली बातमी विचार करायला लावणारी असू शकते. आर्थिक व्यवहार सामान्य राहतील. मिथुन (Gemini) – दिवसाची सुरुवात थोडी गोंधळात जाईल, पण दुपारनंतर दिलासा मिळेल. पैशांचा ओघ सामान्य राहील. एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य मिळेल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीसाठी अनुकूल दिवस. कर्क (Cancer) – आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. सिंह (Leo) – आज तुम्हाला मोठी यश मिळण्याची शक्यता आहे.…
संगमनेर – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आयर्न लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने संगमनेर येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उदात्त हेतूने आयोजित हे शिबिर खऱ्या अर्थाने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार आहे. हा जीवनदानाचा संकल्प करण्यासाठी, शुक्रवारी (दिनांक ३१ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संगमनेर येथील बस स्टॅन्ड येथे हे रक्तदान शिबिर पार पडेल. रक्तदान हे सर्वात मोठे दान मानले जाते. आपल्या रक्ताने कोणाचा तरी जीव वाचू शकतो, हे सत्य लक्षात घेऊन, राहुल गांधी समर्थक…
संगमनेर: थोरात कारखान्याने मागील हंगामात दिलेल्या ३२०० रुपये उच्चांकी भावामुळे बाजारपेठ फुलली आणि कामगार, सभासद, ऊस उत्पादक व व्यापाऱ्यांची दिवाळी आनंदात गेली. आपला हेतू चांगला असल्याने थोरात कारखान्याचे काम चांगले होत आहे आणि याचमुळे सभासद व बाहेरील ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारात आदर्शवत ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. थोरात म्हणाले,…
संगमनेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत झालेल्या संघटनात्मक फेरबदलांनंतर संगमनेर तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान, नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी शिवसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी नव्या जोमाने आणि संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे निर्देश दिले. बुधवारी (२९ ऑक्टोबर) संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख कोते पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसैनिकांनी संपूर्ण तयारीने निवडणुकांसाठी सज्ज राहावे, आणि यावेळी पक्षाकडून संबंधित उमेदवारांना पूर्ण ताकद मिळवून देण्याचे वचन त्यांनी शिवसैनिकांना दिले. संगमनेर तालुक्यात सध्या शिंदे गटाचे आमदार असल्याने, आगामी निवडणुका वर्चस्वाच्या आणि अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लॉजिंगवर मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. नेवासे येथील खडका फाट्यावरील साई लॉज येथे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देह व्यापारास (वेश्या व्यवसाय) प्रवृत्त करत लॉजिंगवर जागा उपलब्ध करून त्यांच्याकडून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी आपल्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक…
