Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी समाजाचे स्वप्न पाहिले, मात्र दुर्दैवाने त्यांचे हे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेलो नाही, अशी खंत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथील प्रवरा नदीकाठच्या गंगामाई घाटावर भव्य ‘अभिवादन सभा’ झाली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक लढ्याला मानवंदना दिली. डॉ. तांबे म्हणाले, १९२७ मध्ये महाड येथे झालेला हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो…

Read More

आजचे सविस्तर राशिभविष्य : शुक्रवार, २० मार्च २०२६ ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाला नवी ओळख मिळेल. जुन्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असून जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. ​वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजित गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. घरातील वडीलधार्‍यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला मोठा लाभ होईल. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवा. ​मिथुन: तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही आज कठीण…

Read More

अहिल्यानगर, प्रतिनिधी –  पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सावेडी उपनगरातील अशोकनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी रवींद्र नारायण राजहंस हे सावेडी येथील जॉगिंग पार्कजवळ थांबलेले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून दिली. त्यांनी एका पत्त्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने राजहंस यांचा विश्वास संपादन केला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश्य द्रव पदार्थ एकूण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अमानवीय कृत्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (१७ मार्च) घडली. पीडित मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात असताना हाडकीच्या ओढ्याकडून जाणाऱ्या महादेव मळ्याकडील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने तिला अडवले. साधारण ३२ ते ३५ वयोगटातील या व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले आणि अचानक आपल्याकडील बाटलीतील अ‍ॅसिडसदृश द्रव पदार्थ तिच्या तोंडावर उजव्या बाजूने फेकला.  या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संगमनेरच्या एका मळ्यात घडली. पीडित मुलगी ही आपल्या ओळखीच्या एका घराकडे खाऊ आणण्यासाठी जात असताना, आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने निर्जन ठिकाणी मुलीचा हात पकडून तिला ओढत नेले आणि तिचे कपडे काढून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या ३६ वर्षीय मातेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध…

Read More

शिर्डी, विशेष प्रतिनिधी- तीर्थक्षेत्र शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आस्था सिंग (रा. सतना, मध्य प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव शिवार येथील ‘हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम’मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. पाडव्याच्या दिवशी समोर आलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणे समोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आस्था सिंग आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी बुधवारी या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, त्याच रात्री उशिरा आस्था राहत असलेल्या खोलीतून जोरात ओरडण्याचे आणि…

Read More

नाशिक रोड (प्रतिनिधी): इतिहास सांगतो की ज्या-ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो पुन्हा सावरतो आणि वाढतो. सध्या इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या मनातही चिंतेचे युद्ध सुरू आहे. मात्र, अशा काळात विचलित न होता संयमाने गुंतवणूक सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुमची गुंतवणूक मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीनंतरचे नियोजन अशा दीर्घकालीन ध्येयासाठी असेल, तर युद्धाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मनातील भीतीचे युद्ध थांबवा, असे प्रतिपादन तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. नाशिक रोड येथील जय भवानी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे हॉटेल हरियालीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘म्युच्युअल फंडाद्वारे पेन्शनचे नियोजन व सायबर सिक्युरिटी’ या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रमात…

Read More

आजचे राशीभविष्य: गुरुवार, १९ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होऊन वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने चालल्यास मोठे लाभ होतील. मिथुन: आज तुम्हाला बौद्धिक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक ठरेल.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या भ्याड हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे शिवसेनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये पीडित विद्यार्थिनीला तातडीने उत्तम वैद्यकीय उपचार आणि शासनाकडून भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर भरदिवसा झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी वडगाव पान आणि तळेगाव फाटा परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी महामार्ग अडवत जोरदार ‘रास्ता रोको’ केला आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही संतापजनक…

Read More