Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान अन्य सहा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गस्त घालत होते. याच दरम्यान, जमजम कॉलनीतील सरकार लॉन्सजवळील एका मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याची आणि…

Read More

भाऊ चासकर – NEET पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयी यांच्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटीईटी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा कारभार यापूर्वीही वादग्रस्त राहिला आहे. पेपरफुटी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. काही अधिकाऱ्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. तरीही त्यातून परीक्षा परिषदेने कोणताही धडा शिकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. शालेय कामकाज, दैनंदिन अध्यापन, विविध उपक्रमांचे फोटो व माहिती अपलोड करणे, असंख्य लिंक भरणे आणि तत्सम इतर अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत, विविध आजारांना सामोरे जात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर जवळील कासारा दुमाला येथील भोलेनाथ दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्वच मुलांना स्कूल बॅग, वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. या सामाजिक उपक्रमासाठी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेश गुंजाळ यांनी संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. संस्थेच्या स्थापनेला ४४ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे सहा कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संस्थेचे दैनंदिन दूध संकलन सुमारे ४५००…

Read More

अकोले: चांगले शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मुख्य पाया असून, शिक्षकांचे समर्पित योगदान आणि त्याला लाभलेली ग्रामस्थांची भक्कम साथ यांमुळेच शिंदेवाडी शाळा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी काढले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे श्री व श्रीमती रामनारायणजी बुब ट्रस्टच्या वतीने शाळेसाठी अत्याधुनिक इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड व ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच अनिकेत बॅटरी हाऊसकडून शाळेला इन्व्हर्टर बॅटरी देणगी म्हणून देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पण व वाटप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अनिल गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच संतोष आंबरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून…

Read More

भांडुपचे एकेकाळचे अनभिषिक्त नेते, ज्यांच्या नावावर गिरणी कामगारांच्या असंख्य चळवळी झाल्या; जे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील काही मोजक्या नेत्यांमधील एक होते, अशा दिना बामा पाटील यांची पुण्याई अनेक वर्षे त्यांचे पुत्र खासदार संजय पाटील यांच्या कामी आली. सत्तरीच्या दशकात मुंबईत विशेषत: भांडुप, मुलुंड आणि पूर्व उपनगरात सामान्यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिना बामा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख मोठा होता. या विभागाचे आमदार म्हणून त्यांनी १९८५ मध्ये निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. शिवसेनेसारख्या बालेकिल्ल्यात एक काँग्रेसचा कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, हे तेव्हा दिनांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. इतकी लोकप्रियता या नेत्याची होती. मुंबईची कामगार चळवळ असो की गिरणी कामगारांची…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: व्यावसायिक पातळीवर चढ-उतार पाहायला मिळतील, मात्र त्यामुळे खचून न जाता धैर्याने काम करावे. भविष्याचा विचार करता आज घेतलेले आर्थिक निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यासाठी संबंधितांशी संवाद साधावा लागेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांकडून सुखद वार्ता समजेल. वृषभ: आज एखादा महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जुन्या कष्टांचे योग्य फळ मिळाल्याने समाधान लाभेल. घर किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय कौटुंबिक संमतीने यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर:  महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने नियोजित परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. या अत्यंत संतापजनक प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आणि कष्टावर पुन्हा एकदा पाणी फिरले असून, यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत घणाघात केला आहे.  वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे तरुणांचे भविष्य पूर्णपणे धोक्यात आले असून, या गैरप्रकाराला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पेपरफुटी ही जणू नित्याचीच बाब बनली असून, कोणतीही भरती प्रक्रिया किंवा पात्रता परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: NEET परीक्षांमधील गोंधळानंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर उद्या होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या तब्बल ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा अन्याय झाला असून, राज्यातील ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश यातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याची घणाघाती टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी ‘परीक्षा पद्धत’ झाली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत आमदार तांबे यांनी सरकारवर निशाणा साधला. सातत्याने होणाऱ्या अशा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर ‘दुहेरी निष्ठा’ दाखवल्याचा आरोप करत, त्यांना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदू संमेलनात उपस्थित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यांच्या संस्थापकांची स्तुती करणाऱ्या नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ आणि केवळ पोलीस दलाच्या कर्तव्याशी आणि निष्पक्षतेशीच असायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यात भरवली जाणारी हिंदू संमेलने ही वरकरणी अराजकीय दाखवली जात असली तरी त्यामागे निश्चितपणे राजकीय हेतू…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कोणत्याही नवीन योजनांवर विचार करताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील, मात्र मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नवीन गुंतवणूक करताना घाई गडबड करू नका. ​वृषभ: व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय लाभदायी ठरेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि पूर्वी घेतलेले कष्ट आता सार्थकी लागतील. प्रगतीचा वेग वाढल्यामुळे काही प्रमाणात अतिरिक्त भांडवलाची गरज भासू शकते. नोकरदार वर्गाला नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ​मिथुन: तुमच्या…

Read More