Author: Annant Ppangarkar

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून स्फोटक पदार्थ वाहून नेत असताना हा स्फोट झाला असून, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण अकोले परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप उत्तम ताजने (रा. औरंगपूर) हा व्यक्ती आपल्या दुचाकीवरून स्फोटक पदार्थ घेऊन जात होता. औरंगपूर फाट्याजवळ अचानक या स्फोटक पदार्थांचा तीव्र स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण आणि थरारक होता की, स्फोटाच्या तीव्रतेमुळे संबंधित दुचाकी तब्बल ५० फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडाली. धक्कादायक बाब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. अध्यात्माला बदनाम करू नका. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसेच मानवाचे जीवन अध्यात्माशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले. स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्या, त्याग, योगसाधना आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण आढावा घेत उपस्थित भाविकांचे प्रबोधन केले. नंदकुमार पोवार म्हणाले की, गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक आत्मा पावन होतो. कृतज्ञता व्यक्त करताना कधीही कमीपणा वाटून घेऊ नये. महाराजांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भास्कर देवराव तनपुरे (वय ५०, व्यावसायिक शेतकरी) आणि सार्थक गणेश निमसे (वय १६, इयत्ता दहावीचा विद्यार्थी) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही मृतांना धार्मिक कार्याची प्रचंड आवड होती. मिळालेल्या माहितीनुसार, जुने भालगाव येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात दर सोमवारी कीर्तन व भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. सोमवारी या धार्मिक कार्यक्रमाच्या स्वयंपाकात आणि तयारीत दोघांनीही उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघे नदीत पोहण्यासाठी गेले, मात्र ते घरी परतलेच नाहीत. ते कीर्तनासाठी थांबले असावेत असे वाटल्याने रात्रीपर्यंत कोणाच्या लक्षात आले नाही.…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील आणि जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी जपून राहावे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे आज गतीने पूर्ण होतील. व्यवसायात नवीन फायदेशीर करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांचे कंबरडे मोडण्यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली असताना, संगमनेर तालुक्यात मात्र याचे साधे पडसादही उमटलेले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कारवाईचा दणका सुरू असताना, संगमनेरच्या अन्न व औषध प्रशासनाला नेमकी कोणती ग्लानी आली आहे, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. संगमनेरमधील या संशयास्पद शांततेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, येथील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमर कतारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संगमनेरमधील विदारक स्थितीवर थेट बोट ठेवले आहे. संगमनेरमधील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड योजनेची सुविधा अधिक प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी ८६०५३२११६७ या संपर्क क्रमांकावर संवाद साधावा, असे यशोधन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नियोजनातून तालुक्यातील नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी यशोधन कार्यालय सातत्याने कार्यरत असते. या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून आजवर अनेक ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात आला असून,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: संगमनेर न्यायालय परिसरात एका अटक आरोपीच्या समर्थनार्थ बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस काँस्टेबल चंद्रकांत विठ्ठल सदाकाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (८ जून) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी शिवार येथील संगमनेर न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी पोलीस अधिकारी हे एका आरोपीला न्यायालयात हजर करत असताना, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी अटक आरोपीचे व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी न्यायालय परिसरातच गैरकायदेशीर घोळका तयार करून गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता, आरोपीला न्यायालयाबाहेर आणले जात असताना या जमावाने “आयेगा तो अपना राज,…

Read More

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांना प्रतिवर्ष मिळणाऱ्या ९ सिलिंडरऐवजी केवळ ४ सिलिंडरच अनुदानित दराने मिळतील. या चार सिलिंडरसाठी लाभार्थ्यांना ६४२ रुपये मोजावे लागणार असून, त्यापुढील उर्वरित सिलिंडर खरेदीसाठी त्यांना अधिकची बाजारभावाप्रमाणे रक्कम द्यावी लागणार आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमालीचे भडकले असून गॅस सिलिंडरच्या अनुदानावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढता खर्च आणि तोटा लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यातच…

Read More

‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी! संपादकीय:- जागतिक घडामोडींचे कारण पुढे करत केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांना दिलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत ९ वरून थेट ४ वर कपात केली आहे. आधीच महागाईच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य आणि गरीब कुटुंबांच्या जखमेवर हा निर्णय म्हणजे मीठ चोळण्यासारखाच आहे. निवडणुकीच्या काळात ‘अच्छे दिन’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देणाऱ्या सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या घरातली शेगडी पेटणार कशी, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये झाली, तेव्हा वर्षाला १२ अनुदानित सिलिंडर दिले जात होते. गेल्या वर्षी हा कोटा ९ वर आणला गेला आणि आता तो थेट ४ वर…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष: ​आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे गती घेतील. आर्थिक आघाडीवर धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचे वातावरण राहील, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. ​वृषभ: ​आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे, परंतु कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड करू नका. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे संपन्न झालेल्या ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट २०२६’ मध्ये बँकेला देश पातळीवरील सर्वोच्च ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. या मुख्य पुरस्कारासोबतच बँकेला इतर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या समिटमध्ये अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना ‘बेस्ट चेअरमन’, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना ‘बेस्ट सीईओ’ आणि बँकेने सातत्याने राखलेल्या शून्य टक्के नेट एनपीएबद्दल ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसाम राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: अकोले व संगमनेर परिसरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड आणि महाकाय वटवृक्ष या ठिकाणी तिसऱ्या अभ्यास सहलीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम पार पडला. सकाळी संगमनेर बसस्थानकातून या अभ्यास सहलीला प्रारंभ झाला. पेमगिरी येथे पोहोचल्यानंतर सहभागी सदस्यांनी शहागडाचा इतिहास, तेथील स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. यावेळी इंजिनिअर नानासाहेब खर्डे यांनी प्राचीन ते…

Read More

संगमनेर | मोहसीन शेख  मुंबईवरून संगमनेरकडे परतत असताना समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरीडोरवर रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील रावसाहेब रेवजी काकड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती शरद नाना थोरात, विनोद गिरी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोर्वे येथील हे सर्वजण स्विफ्ट गाडीने मुंबईहून संगमनेरकडे परतत होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घोटीच्या जवळ आले असता अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका तीव्र होता की, गाडीमधील रावसाहेब रेवजी काकड यांचा…

Read More

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलो वजनाचे २४ कॅरेट सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली असून, सोने तस्करीचे मोठे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी डीआरआयने भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आणि मुंबई विमानतळ कर्मचारी असलेला अजित आचरेकर याच्यासह सात जणांना अटक केली आहे. ६ जून २०२६ रोजी पहाटे विमानतळाजवळील ‘हॉटेल फेअरमॉँट’ परिसरात डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने विमानतळाबाहेर पोहोचवण्याचा कट होता, मात्र गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहात पकडले. अटकेत…

Read More

बुलढाणा: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या जळगाव जामोद येथील कथित ‘फेक मर्डर केस’ प्रकरणात तपासात गंभीर हलगर्जीपणा केल्या ठपक्यावरून तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तपास अधिकारी नितीन पाटील या दोन अधिकाऱ्यांना अमरावती पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर धरण परिसरात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वी आणि डीएनए अहवाल येण्याआधीच पोलिसांनी तो मृतदेह ‘शिवानी’ नावाच्या तरुणीचा असल्याचा दावा केला. धक्कादायक बाब म्हणजे, शिवानी प्रत्यक्षात जिवंत असतानाही पोलिसांनी तिला मृत घोषित केले आणि तिच्या कथित हत्येच्या आरोपाखाली तिच्या वडील व भावाला अटक केली. पोलिसांनी आपल्याला उलटे टांगून मारहाण केली…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही लीलया पेलून न्याल. आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची भक्कम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग दिसून येत आहेत. घरात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याची रूपरेषा ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधूर होतील. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयम…

Read More

पुणे: पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात शनिवार मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल ‘प्रोजेक्ट एक्स’ हाऊस पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात पोलिसांनी हा छापा टाकला. या हाय-प्रोफाईल हाऊस पार्टी प्रकरणात पोलिसांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल केला असून, आयोजकांसह तब्बल ७८ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकूण ७ आयोजकांनी मिळून या पार्टीचे आयोजन केले होते. या धडक कारवाईमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read More

संगमनेर: अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली असून, या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सप्ताह समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या गावभेटी आणि अहोरात्र परिश्रमांमुळे या सोहळ्याचे वारे संपूर्ण तालुक्यात वाहू लागले आहेत. भक्ती, अध्यात्म, संस्कार, कृषी, ज्ञान आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या सप्ताहाबद्दल भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विश्वगौरव विभूषित महायोगी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा यंदा ८ ते १५ जून या कालावधीत राजापूर रोड येथील जयवंतराव व बाळासाहेब गुंजाळ पाटील गुंजाळवाडी मळा येथे मोठ्या थाटात पार पडणार आहे. सप्ताह समिती, गगनगिरी…

Read More

मुंबई:  मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अद्याप सर्वदूर सक्रिय झालेला नाही. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात कुठेही समाधानकारक आणि सार्वत्रिक पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन…

Read More

गेल्या काही वर्षांपासून भारताची एकूणच परिस्थिती गंभीर आणि वेगळ्या वळणावर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी केलेल्या आवाहनाकडे पाहता, आगामी काळात देशावर पुन्हा एकदा लॉकडाऊनची आफत येऊ शकते असं दिसतं. आजवर केलेल्या ‘देश मजबुती’च्या बाता फोल ठरल्याचं हे लक्षण आहे. देशापुढील संकटाची चाहूल आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. कोव्हिड काळात लोकांच्या मदतीला सरकार होतं, कारण तेव्हा ते जागतिक संकट होतं. मात्र, हे संकट आपण स्वतः ओढवून घेतलं असल्याने, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता लोकांना स्वतःच तयार व्हावं लागणार आहे. अन्नधान्य साठवून ठेवण्याबरोबरच मुलांच्या नोकऱ्या राखण्यासाठीही आतापासूनच प्रयत्नाला लागलं पाहिजे. कंपन्यांनी कामगार कपातीचा सपाटा लावला आहेच, पण जिथे हे शक्य…

Read More