Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: कुणीही उठतो आणि उपदेश करतो, सगळा मक्ता मीच घेतला आहे. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी झाडे तोडण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ते चिडले. पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी हे विधान केले. चिंचवडमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. भापकर यांनी पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पांत हजारो झाडे तोडण्यात येत असल्याकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राजापूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही गावातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधक निराधार आरोप करत आहेत. या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालणार नाही, असा स्पष्ट इशारा संदेश देशमुख यांनी दिला आहे. देशमुख म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गावात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. या चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवल्यामुळेच आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली चुकीच्या कामांना विरोध करतच राहणार असल्याच सांगितलं. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे गावातील शेतकऱ्यांना कोणतीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आमदार अमोल खताळ यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन आपल्या भगिनींना दिलं. डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून, कायदा लागू होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनानिमित्त संगमनेर शहर आणि तालुक्यातील अनेक भगिनींनी त्यांना राखी बांधली. यावेळी, प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींना फसवून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करणं, शारीरिक आणि मानसिक छळ, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यांसारख्या घटना वाढत असल्याबद्दल भगिनींनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राजापूर: सोमवारी झालेल्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावच्या ग्रामसभेत महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याकडून होत असलेल्या दडपशाहीची तक्रार समोर आली आहे. सरपंच कुसुमताई पानसरे यांनी, संदेश बाळासाहेब देशमुख हे गावातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केला. या गंभीर आरोपांची दखल घेत, ग्रामपंचायत चुकीचे काम करत असेल तर वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करावी. विकास कामात अडथळे आणू नये, असा निर्णय घेण्यात आला. सरपंच पानसरे यांनी ग्रामसभेत सांगितले की, संदेश देशमुख हे नेहमीच गावाच्या प्रगतीपथावरील कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. केवळ प्रसिद्धीसाठी ते विकासकामांना विरोध करतात. तालुक्याच्या नेतृत्वाने विकासाचा अजेंडा राबवण्याचे निर्देश दिले असतानाही, देशमुख त्यांच्या भूमिकेच्या विरोधात काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात कुरण येथे अवैधपणे सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ४० हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे संगमनेरमधील कत्तलखाने बंद असल्याचा दावा फोल ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संगमनेर तालुक्यातील कुरण येथील नादिर शेख याच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश प्राण्यांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक छापा टाकला. त्यावेळी, पोलिसांनी घटनास्थळी ३ ते ४ इसम गोवंश प्राण्यांची कत्तल करताना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार आहे त्यामुळे, गोंधळलेल्या अवस्थेत न राहता रोखठोक भूमिका घ्यावी ऐनवेळी भूमिका बदलू नये, पराभवानंतरही अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचं सांगत जनतेच्या प्रश्नांवर कठोर आणि ठाम भूमिका घेऊन पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचा सल्ला देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या व जवळपास ११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवरील बदलीचे संकट टळले असले तरी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची शिर्डीच्या साई मंदिरात मंदिर सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांची वर्णी लागली आहे. साळुंखे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे आता नवे पोलीस निरीक्षक असतील. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस दलात फेरबदल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नागपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.जे. राय यांनी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त, त्यांना १०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे नागपूरमधील एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी आले होते. त्यावेळी, हर्षवर्धन जाधव यांनी बैठकीच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु विशेष सुरक्षा विभागाचे निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना अडवले. यामुळे संतापलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पराग जाधव यांच्यावर हात उचलला. या घटनेनंतर, सोनेगाव पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ४० लाखांहून अधिक मतदारांच्या याद्यांमध्ये संशयास्पद बाबी असल्याचं सांगत, त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रातील ४० लाख मतदारांचा घोटाळा? राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ४० लाख मतदार वाढले, जे गेल्या पाच वर्षांतही वाढले नव्हते. निवडणुकीच्या काळात, विशेषतः संध्याकाळनंतर मतदानाच्या टक्क्यांमध्ये झालेली अचानक वाढही संशयास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील परदेशपुरा परिसरात एका १७ वर्षीय मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास रामचंद्र वाघमारे (वय ५३) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर संगमनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुहास वाघमारे हे मूळचे सांगलीचे असून, कामामुळे ते संगमनेरमध्ये राहत होते. घटनेच्या रात्री ते परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोरून जात असताना एका १७…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, दि. ७ – शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे. या कल्याणकारी मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सेवा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध लाभकारी योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. यासाठी https://ananddighekalyankarimandal.org…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील एका सेवाभावी संस्थेची बदनामी करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाच्या युट्यूब चॅनेलच्या चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साळवे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्त धाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्थे’चे कामकाज पाहणारे शिवम राजेंद्र गडगे (वय २१) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव साळवे (पूर्ण नाव माहित नाही रा. अकोले) असे असून, तो ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. गडगे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ पासून साळवे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महीलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक महीला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रीया राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ढोले पाटील लॉन्स येथे तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट, महिला बचत गट कर्ज आणि खेळते भांडवलाचे अनुदान वाटप डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार खताळ यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन जाहीर केले आहे. मागील १८ वर्षांत केवळ ५ कोटी रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत या कामांना गती देण्याची ग्वाही दिली. भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यात नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन लाचखोरी करणाऱ्या एका माजी पोलीस उपनिरीक्षकास न्यायालयाने निवृत्तीनंतर दोन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. भरत गोपाळराव होळकर असे या निवृत्त उपनिरीक्षकाचे नाव असून, तो कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. भरत गोपाळराव होळकर यांनी, कराड पोलीस ठाण्यात दाखल एका अहवालाची प्रत वरिष्ठांना पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB च्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना होळकर यांना २० जुलै २०१४ रोजी रंगेहाथ पकडले. या कारवाईसाठी कराड शहरातील पंचायत समितीजवळच्या एका रेस्टॉरंटसमोर सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर, कराडचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, कसारा दुमाला, समनापूर आणि राजापूर येथील शेकडो कुटुंबांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या जमिनीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघणार असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार खताळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर, मंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे. या भागातील अनेक जमिनींवर आणि घरांवर ‘पोकळीस्त’ किंवा ‘इतर हक्कांतील कब्जेदार’ अशा अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर सरकारी सुविधांपासून ते वंचित राहत होते. तसेच, कौटुंबिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, विशेष प्रतिनिधी: विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची वीस वर्षाच्या कार्यकाळात 23व्यांदा बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या: तुकाराम मुंडे – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई. नितीन काशीनाथ पाटील – विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई. अभय महाजन – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई. ओंकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, प्रवीण पुरो: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर, म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होतील, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिक विभागातील आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा कार्यक्रम आखला जात आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार आहेत, ज्यासाठी ४,९८२ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी ८,७०५ कंट्रोल युनिट्स आणि १७,००० पेक्षा जास्त मतदान यंत्रांची गरज लागेल. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मनुष्यबळाची मोठी कमतरता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर उत्सवा निमित्ताने साई निर्मल सेवाभावी संस्था आणि स्वकुळ साळी समाज (लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट), संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी यांच्या सहकार्याने हे शिबिर दिनांक ०७ ऑगस्टला सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत लक्ष्मी नारायण मंदिर, कॅप्टन लक्ष्मी चौक, रंगारगल्ली, संगमनेर येथे होणार आहे. या शिबिरात रक्तदाब, शुगर, उंची, आणि वजन यांची तपासणी केली जाईल. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजीची सुविधाही उपलब्ध असेल. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचारही दिले जाणार आहेत. साई निर्मल सेवाभावी संस्थेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई विशेष प्रतिनिधी / संगमनेर: संगमनेर शहरातील इंदिरानगर व शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) पुन्हा एकदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात तात्काळ संबंधितांना निर्देश दिले आहे. https://www.facebook.com/share/p/1AMAUE11k8/ या भेटीत आमदार तांबे यांनी, संगमनेर बुद्रुक येथील सर्वेक्षण क्रमांक १०४, १०५, १०६ (४४२) आणि २१९ मधील ‘पोकळीस्त’ आणि इतर हक्कांच्या नोंदी रद्द करून, प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर सात-बारा (7/12) आणि सिटी सर्व्हे अभिलेखात नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची विनंती करत व या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. https://x.com/satyajeettambe/status/1952684256733679652?t=AVPYxI1ZUXjBgZA9uTZ4Ug&s=19 या महत्त्वपूर्ण मागणीवर…
