Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर, दि. १५ – जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली असता, संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत अधिक तपास करताना समितीच्या दक्षता पथकाने अर्जदाराच्या भावाचे जातवैधता प्रमाणपत्र आधीच अपूर्ण कागदपत्रांमुळे नस्तीबंद झाल्याचे निष्पन्न केले. तरीही अर्जदाराच्या वडिलांनी ते प्रमाणपत्र सादर करून समितीची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. समितीने अर्जदार व…
संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी वारंवार झालेल्या कारवाया आणि कधीही बंद न पडलेले संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने दररोज या-ना त्याकारणाने चर्चेत असतात. घारगाव पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने अशीच एक मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये १७ गोवंश जनावरांसह संगमनेर मधील १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ वाहनांसह सुमारे १६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तलखान्याच्या माध्यमातून कत्तल केली जाते. येथील कत्तलखाने देशाच्या बहुतांश भागात प्रसिद्ध आहे. वारंवार कारवाया करून देखील पोलिसांसह नगरपालिका प्रशासनाला हे कत्तलखाने बंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे कत्तलीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची…
शनिवार, दि. १५ फेब्रुवारी – पुणे हॉटेलचे बिल देण्यावरून मित्राच्या कानाखाली मारल्याचा राग मनात धरून मित्राला अंगावर कंटेनर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील वाघोली रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. परमेश्वर बालाजी देवराये (वय ३५ वर्ष) असे अंगावर कंटेनर घालून मारण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. राम दत्ता पुरी (वय २६ वर्ष) असे आरोपी मित्राचे नाव असून पुरी याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोली येथील कटकेवाडी येथे एका हॉटेलमध्ये परमेश्वर देवराये आणि राम पुरी हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे परमेश्वर…
संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी शाळेत आणलेल्या पुष्पगुच्छाच्या किरकोळ कारणावरून शिक्षिकेला शिक्षकाने टोमणे मारत मारहाण केल्याचे घटना शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील शाळेत घडली असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या शाळेत नियुक्तीस असलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस असल्याने तिने पतीला देण्यासाठी शाळेमध्ये गुरुवारी पुष्पगुच्छ आणला होता. या पुष्पगुच्छाच्या कारणावरून शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे यांनी शिक्षिकेला…
संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी मध्यंतरी कच्चा आणि शिळा मिठ्ठा वडा प्रकरणी एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर संगमनेरमधील मिठाई साठी प्रसिद्ध असलेले जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. आता या जोशी स्वीट होमची अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जोशी स्वीट होम अन्न औषध प्रशासनाच्या रडारवर आले असून संबंधित विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. जोशी स्वीट होम मधील अन्नपदार्थांच्या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील त्यांच्या मुख्य दुकानात काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली व या तपासणीचा अहवाल…
अहील्यानगर दि. १५ – पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, महामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे…
# महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी # कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक, एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये # सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत मुंबई, दि १५ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक,…
विशेष प्रतिनिधी / मुंबई शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीच नाही तर बडे नेतेही ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहेत. कोकणातील उद्धव ठाकरेंचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर मराठवाड्यातील नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून का जात आहे, याचे उत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. दानवे यांनी कोणाचे नाव न घेता म्हटले की, समोरचे लोक बाजार मांडून बसले आहेत. पैशांची ऑफर देत आहेत. विकास कामांची ऑफर दिली…
विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीत स्थान दिल्याने साऱ्यांच्या नजरा अजित पवारांकडे एकवटल्या आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या सलगीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा वारंवार केली जात आहे. इतकं असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘कोअर ग्रुप’मध्ये मुंडेना सदस्य करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस…
संगमनेर, दि. १४ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सहा आरोपींना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी गुरुवार आणि शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. नोव्हेंबर महिन्यात साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी…
छत्रपती संभाजीनगर – संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तब्बल आठ-नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधार संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज नाकारल्याने कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुटे याचा नियमित जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर त्याने जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठानेही कुटेला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याचा तुरुंगातील मुक्काम जैसे थे राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी…
संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहू, असा विश्वास संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे आणि अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने खताळ यांचा सत्कार करण्यात आला. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमच खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा…
संगमनेर – प्रतिनिधी बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक, संगमनेर) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक, संगमनेर) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी खंडणी प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे त्यांचे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने…
संगमनेर दि. १३ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे नवे अपर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. अनेक गावांसाठी गैरसोयीचा असलेला हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी होऊन देखील सरकार जर ऐकणार नसेल तर सरकार विरोधात जन आंदोलन उभे करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रस्तावित असलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात अनेक ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतर देखील या प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रभावित गावातील नागरिक व जेष्ठ विधीज्ञांची बैठक माजी…
विशेष प्रतिनिधी / प्रवीण पुरो मुंबई – ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम आणि आगाऊपणाची भाषा राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांनी वापरली आहे. नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे. भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने संकटात सापडलेले शिवसेनेचे कोकणचे कट्टर सैनिक राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र हे करताना त्यांनी एसीबी कारवाईविषयी ब्र न काढता पक्ष सोडण्याला विनायक राऊत कारणीभूत असल्याचं सांगत आपली कातडी वाचवली आहे. सुमारे चार कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचं निमित्त करत एसीबीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही कारवाईची टांगती तलवार उगारली होती. एकीकडे बेहिशेबी मालमत्तेचं प्रकरण डोक्यावर असताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच त्यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची…
अहिल्यानगर दि. १३ – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अहिल्यानगर, दि. १३ – शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर-मनमाड रोडवरील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक दि. ११ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२५ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर.बी.एल. बँक चौक, नगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर.बी.एल. बँक चौक १८ मीटर रिंगरोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नगर-मनमाड हायवे (पश्चिम बाजू)…
संगमनेर, दिनांक १३ – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली असून, या संदर्भात दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे भेट घेतली. या भेटीत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. रेल्वेमंत्री यांनी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. आमदार खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जावा याबाबतचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या…
संगमनेर – दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याच्या गावात पीडितेला न्याय मिळावा तसेच जिहादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी आरोपीच्या पुतळ्याचे दहन केले. अनुसूचित जातीच्या एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शेजारीच राहणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याने घराच्या छतावर जाऊन, पीडित मुलगी आंघोळ करत असतानाचा व्हिडिओ काढल्याचे घटना मंगळवारी घडली होती. आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन पीडितेला याची जाणीव होताच तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी घरात असलेले आई-वडील धावत मुलीकडे आले. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला. परंतु घटनेनंतर गावातील काही बड्या नेत्यांनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र…
