Author: Annant Ppangarkar

संगमनेर, दि.२९ मार्च – प्रतिनिधी संगमनेर येथील कृषी कार्यालयात एका कृषी सहाय्यकाने मंडळ कृषी अधिकाऱ्याला शिवीगाळ करून खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी (दि. २८) सकाळी १०:१५ वाजता ही घटना घडली. कृषी सहाय्यक लक्ष्मण मनोहर जुंधारे यांना मोजमाप पुस्तिकेतील नोंदी दुरुस्त करण्यास सांगण्यात आले होते. या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी मंडळ कृषी अधिकारी धनेश सखाराम कोते यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्यांनी कोते यांना खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर धनेश सखाराम…

Read More

संगमनेर, दि. २९ मार्च – प्रतिनिधी राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी १५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांवरील शास्तीकर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली. सध्याच्या शास्तीकर धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे यांनी संगमनेर शहरातील ३९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “या घरांमध्ये कोणताही व्यावसायिक उपक्रम नाही. तरीही या रहिवाशांवर शास्तीकर लादणे अन्यायकारक आहे. सरकारने त्यांना दिलासा द्यावा आणि शास्तीकर पूर्णपणे माफ करावा.” सध्या ६०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ आहे, तर ६०० ते…

Read More

संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी  इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना फी साठी वेठीस धरले जात असल्याचा तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मधील शिक्षण सम्राटांनी विद्यार्थी पालकांना फी साठी वेठीस धरू नये, अन्यथा अशा शिक्षण संस्थांमधील भानगडी बाहेर काढण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला आहे. कानकाटे यांनी म्हटले आहे की, सध्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू आहे. यादरम्यान संगमनेर मधील इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणारे काही शिक्षण सम्राट, संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य नागरिकांना मुलांच्या फी करिता वेठीस धरत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून दादागिरीच्या पद्धतीने बोलत जर फी भरली नाही…

Read More

अहिल्यानगर, दि. २८ मार्च –  राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राहुरी येथे दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांसमवेत…

Read More

संगमनेर, दि. २८ मार्च – प्रतिनिधी संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित मोक्का खटल्याचा गुरुवारी (२७ मार्च) निकाल लागला. या खटल्यातील सर्व चारही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी संतोष शिवाजी जाधव, चंदर दादाभाऊ गाडे, संजय दत्तू धांडे आणि शरद बन्सी निचित यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या आधारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१),(२), ३(४) प्रमाणे या आरोपींविरोधात कारवाई केली होती. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, तत्कालीन निरीक्षक निघोट यांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले…

Read More

अहिल्यानगर, दि. २८ मार्च –  अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ एप्रिल २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता राखण्यास…

Read More

मुंबई, दि. २८ मार्च – प्रतिनिधी मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘मंत्रालय सुरक्षा प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात चेहऱ्याद्वारे ओळख पटवून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ (Visitor Management System) म्हणजेच अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागतांना प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी: * अभ्यागतांना ज्या विभागामध्ये काम आहे, त्याच विभागात आणि दिलेल्या वेळेत प्रवेश दिला जाईल. * मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे कोणतेही एक…

Read More

नाशिक, दि. २७ मार्च –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील ॲग्री हायटेक शाखेतील तत्कालीन शाखाधिकारी सुभाष विठ्ठल कौटे (वय ४०, रा. संगमनेर) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल ५ कोटी ५५ लाख ६६ हजार ५१३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता ती स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. कौटे यांनी ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाची रक्कम…

Read More

संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी  मार्च अखेर ऊन चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यासह इतर भागातून संगमनेर मध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहराध्यक्ष रवींद्र कानकाटे यांनी केली आहे. संगमनेर नगर परिषदेने एका खाजगी एजन्सी मार्फत शहरात बहुतांश ठिकाणी शुद्ध आणि थंड पाण्याचे एटीएम बसविले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे एटीएम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध होत नाही. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना अल्प दरात शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध…

Read More

सोलापूर, दि. २७ मार्च –  प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही वडिलांना दरमहा १० हजार रुपयांची पोटगी न देणाऱ्या मुलाच्या नावावरील २२ गुंठे जमीन पुन्हा वडिलांच्या नावे करण्यात आली आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायद्यातील विशेषाधिकाराचा वापर करून ही कारवाई केली आहे. अरण (ता. माढा) येथील २२ गुंठे जमीन मुलाच्या नावे करूनही तो आई-वडिलांना सांभाळत नव्हता. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी अरण येथील सोपान वासुदेव राऊत (वय ७०) यांना दरमहा १० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. पण, त्यावेळी देखील तो सुनावणीला हजर राहत नव्हता. निकालानंतर मुलाने सहा महिन्यात कधीही पोटगीची रक्कम न दिल्याने सोपान राऊत यांनी तत्कालीन प्रांताधिकारी कार्यालयात…

Read More

अहिल्यानगर दि. २६ मार्च –  अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी कारवाई करत सचिन पांडुरंग खताळ या दुय्यम निबंधकाला ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११७१ मधील ५ हेक्टर ६८ आर क्षेत्रापैकी २८ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी तक्रारदारांनी दुय्यम निबंधक सचिन खताळ यांच्याकडे दिला होता. खताळ यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर, २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने आणखी एका जमिनीच्या विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी खताळ यांच्याकडे दिला. यावेळी खताळ यांनी या…

Read More

नाशिक, दि. २६ मार्च –  रोजगार हमी योजनेतील देयके मंजूर करण्यासाठी २ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. त्यांच्या नाशिक येथील घरातून २ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. त्यांची २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांची देयके प्रलंबित होती. ही देयके मंजूर करण्यासाठी पोतदार यांनी तक्रारदाराकडे २ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, विभागाने सापळा…

Read More

संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले मेंढवण गावचे सुपुत्र हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) यांच्यावर आज (दि. २६ मार्च) संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद रामदास बढे यांचे पार्थिव आज सकाळी मेंढवण येथे आणण्यात आले. त्यानंतर लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट आणि पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद बढे यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद रामदास बढे अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. शहीद रामदास बढे यांचे…

Read More

संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम तसेच अन्य नागरी सुविधांची कामे होणार आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने या विकास कामांसाठी हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार खताळ म्हणाले, तालुक्यातील १९ रस्त्यांसाठी ३ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले…

Read More

संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी  परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत संगमनेरच्या मालपाणी लॉन्सवर भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथा भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या माध्यमातून संगमनेर शहर लवकरच एका भव्य धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहे. १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगमनेरकरांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य मिळणार आहे. या कथेदरम्यानच राधाकृष्णजी महाराज यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनाचा देखील आनंद लुटता येणार आहे. श्रीराम कथा श्रवणाच्या माध्यमातून श्रोत्यांना जीवनातील जगण्याचे…

Read More

मी संपूर्ण राज्याचा मंत्री आहे या तत्वाने वागणारे नेते, राजकारणातील तत्वनिष्ठ, ऋषितुल्य जीवन जगणारे, शेवटपर्यंत काँग्रेसचे, गांधीचे विचार जपणारे, गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारे, कुठलीही अपेक्षा न बाळगणारे तत्त्वनिष्ठ राजकारणी, पाटबंधारे मंत्री म्हणून महाराष्टात अनेक धरणाचे शिल्पकार परंतु हे मी केलं अस कधीही न सांगणारे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, संगमनेर साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक परंतु मी केलं किंवा माझं नाव द्या अस न सांगणारे राजकारणी, माजी आमदारांची मुलगी असतानासुध्दा आपल्या पत्नीला राजकारणात न आणणारे तत्वनिष्ठ पुढारी, माझ्या पुण्याईवर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणात या असा सल्ला आपले मुलं, नातवंडे यांना देणारे तत्वनिष्ठ पालक, मी सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून स्वतःच्या नातेवाईक अथवा जवळच्या…

Read More

मुंबई, दि. २५ मार्च – विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. दानवे म्हणाले, “हे सरकार कोत्या मनोवृत्तीने चालवले जात आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंदवले गेले आहेत. अमरावती विभागात दंगलीचे ५६४ गुन्हे घडले आहेत, नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या आहेत, आणि पुण्यात ५०६ गुन्हे घडले आहेत. तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ असताना ४३ हजार…

Read More

संगमनेर, दि.२५ मार्च – प्रतिनिधी  जम्मू-काश्मीरमधील तंगधार येथे कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास साहेबराव बडे (वय ३८) यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. रामदास बडे हे जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रामदास बडे हे ३४ एफ रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या निधनाने मेंढवण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद रामदास बडे यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार, २६ मार्च) दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी, मेंढवण येथे शासकीय…

Read More

अहिल्यानगर, दि. २५ मार्च येत्या काही दिवसात संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संगमनेर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तर प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी…

Read More

मुंबई, दि. २५ मार्च – प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार नाही. त्याऐवजी, त्यांना विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घ्यावे लागतील. या वर्गांमध्ये, विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करून शिकवले जाईल. ३० जूनपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्याला या विषयांमध्ये प्रवीण करणे हे शिक्षकांचे ध्येय असेल. हे विशेष वर्ग शालेय शिक्षण विभागाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाचा भाग आहेत. या अभियानाचा उद्देश राज्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढवणे आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने शिकवावे लागेल. या उपक्रमात, राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान ७५% विद्यार्थ्यांना भाषा…

Read More