Author: अनंत पांगारकर

संगमनेर:-  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या विविध योजनांमधून उपलब्ध झाला असून, यामुळे तालुक्यातील गावांमध्ये रस्ते, तीर्थक्षेत्रे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा मोठा भाग रस्ते विकासासाठी वापरला जाईल. सुमारे १.५० कोटी रुपये गावांतर्गत रस्ते आणि शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत. शिवाय, ५० लाख रुपयांच्या निधीतून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाईल. उर्वरित १.५० कोटी रुपये गावातील मूलभूत सोयीसुविधांसाठी देण्यात आले आहेत.  वर्ष २०२५-२६ या अंतर्गत…

Read More

संगमनेर-  एका तथाकथित कीर्तनकाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात आता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावातील पूर्वापार चालत आलेली पुरोगामी आणि वारकरी संप्रदायाची चांगली परंपरा जपण्यासाठी, तसेच समाजात विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला आहे. गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी मिळून गावातील सलोखा आणि शांतता टिकवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला.यावेळी, सत्य बाजूने उभे राहिलेल्या वारकरी संप्रदायातील मान्यवर, कीर्तनकार, पत्रकार आणि समाज प्रबोधनकारांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले. गावात अशांततेचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते, असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. गावाची विकासाची वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…

Read More

देशाच्या लोकशाहीला झालंय काय, असा प्रश्‍न पडण्यारख्या असंख्य घटना उघडपणे घडत आहेत. या लोकशाहीला बळकट करण्यासाठीच्या निवडणूक प्रक्रियेत प्रचंड घालमेल करणारं मतचोरीचं प्रकरण एकीकडे आवासून उभं असताना आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या गुजरातमध्ये राजकीय पक्षांच्या नावावर 1400 कोटींची लूट करण्यात आल्याचा नवा घोटाळा पुढे आला आहे. यंत्रणांच्या नावावर देशवासीयांचे पैसे लुटून खाणार्‍या या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असं ना देशाच्या निवडणूक आयोगाला वाटत ना केंद्रातल्या मोदी सरकारला. गुजरात राज्य सरकार तर आमचा त्याच्याशी काय संबंध, असं सांगून हात वर करून मोकळंच झालं आहे. मतचोरीच्या घटनांचा मागोवा घेता घेता हा नवा घोटाळा बाहेर येऊनही निवडणूक आयोग मख्ख आहे. आयोगाने याची दखल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मिथुन (Gemini): आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कल्पना इतरांना प्रभावित करतील. नवीन लोकांशी संपर्क साधाल. नातेसंबंध दृढ होतील. कर्क (Cancer): आज तुम्ही थोडे भावूक राहाल. कामामध्ये लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. शांत राहण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.…

Read More

नाशिक –  पोलीस असल्याचा बनाव रचून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. अशाच एका घटनेत, पाथर्डी फाटा परिसरात एका वृद्धाला रोखून ‘आम्ही अँटी करप्शनवाले आहोत’ असे सांगत, त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम हातचलाखीने लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी आनंदराव सोनार (वय ६६, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आनंदराव सोनार दुपारी ३ वाजता त्यांच्या पत्नीसोबत पाथर्डी फाटा येथून पायी जात असताना, एका व्यक्तीने त्यांना थांबवले. काका, तुम्हाला खूप वेळ झाला आवाज देतोय, ऐकू आलं नाही का? असे म्हणून त्याने त्यांना बाजूला बोलावले. त्यानंतर त्या भामट्याने, आम्ही अँटी करप्शन विभागाचे अधिकारी आहोत.…

Read More

अहिल्यानगर –  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशा राज्यातून तस्करी करून आणलेला तब्बल १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वडगाव गुप्ता परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी गांजासह एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून दोघांना अटक केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाची मोठी खेप अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणली जात होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. रोडवर वडगाव गुप्ता गावाजवळ हॉटेल किनाराजवळ पोलिसांनी एक संशयित ट्रक (एम.एच. १४ जी. यु. २१११) थांबवला. यावेळी ट्रकची तपासणी केली असता, त्यात नवनाथ अंबादास मेटे…

Read More

अहमदनगर जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र; संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा आणि महादेवाचा देखावा ठरणार मुख्य आकर्षण संगमनेर –  गेल्या 11 वर्षांपासून खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करत, यंदा मालपाणी उद्योग समूहाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक अधिक भव्य आणि शाही असणार असून त्यात विविध प्रकारच्या 22 पथकांचा समावेश करण्यात आला आहे. ही मिरवणूक मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता मालपाणी लॉन्स येथून सुरु होणार आहे. मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या एक दशकाहून अधिक काळ ही मिरवणूक काढली नव्हती. परंतु यंदा पुन्हा एकदा जुनी परंपरा सुरू…

Read More

आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशात वाढवा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात ‘आय लव संगमनेर’ ही चळवळ संगमनेरची संपन्नता वाढवणारी – आमदार सत्यजित तांबे महावादन सोहळ्यातून स्थानिक कलाकारांचा गौरव संगमनेर –  शुक्रवारी गणेशोत्सवाच्या उत्साहात संगमनेर शहर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेले. ‘आय लव संगमनेर’ या चळवळीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महावादन सोहळ्यामध्ये तब्बल ४०० हून अधिक कलाकारांनी एकत्र येत अप्रतिम सादरीकरण केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, गिरीश मालपाणी, दिलीप पुंड, डॉ. मैथिली तांबे, नितीन अभंग यांच्यासह ‘आय लव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आज तुमच्यात भरपूर ऊर्जा असेल, जी तुम्ही कामात चांगल्या प्रकारे वापरू शकता. आर्थिक बाबींमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबत खास आणि मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि गोडवा जाणवेल. वेळेवर समस्या सोडवल्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. वृषभ (Taurus): आज तुम्हाला शांत आणि समाधानी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्थिर गतीने जबाबदाऱ्या सहज पूर्ण कराल. प्रियजनांसोबतचे क्षण तुम्हाला मानसिक शांती देतील. पैशांच्या बाबतीत घेतलेले योग्य निर्णय आत्मविश्वास वाढवतील. आरोग्यासाठी आराम करणे आणि नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल. मिथुन (Gemini): आज तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील बदल तुमच्यात सर्जनशीलता निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर –  बुधवारी रात्री शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित संगमनेर फेस्टिवल कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. तर पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करत असून आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे? आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपी गुंजाळ याला 2 सप्टेंबर पर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी दिल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर…

Read More