Author: Annant Ppangarkar

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीष भवर यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. गुरुवारी (३ सप्टेंबर) गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून हे छापे मारले. या कारवाईदरम्यान कोपरगाव…

Read More

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ असून कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, परंतु घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळावे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आज आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अचानक खर्च वाढल्यामुळे मन थोडे चिंताग्रस्त होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांशी जुळवून घेणे फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळच्या वेळी कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवता येईल, ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहील. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी यश…

Read More

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी रुग्णालयात जाऊन अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राहुल पांडे यांनी अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. अण्णांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समजताच त्यांनी समाधान व्यक्त करून त्यांच्या निरामय आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपचारादरम्यानही अण्णा हजारे यांनी मुख्य माहिती आयुक्तांशी राज्यातील माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सुमारे दहा मिनिटे संवाद साधला. या कायद्यांतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील प्रगती पाहून महाराष्ट्रातील काम खरोखरच लोकाभिमुख असल्याचे सांगत…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ‘मेफेनटर्माईन सल्फेट’ या इंजेक्शन्सच्या ४० बाटल्या कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गांधी मैदान परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रताप अशोक अकोलकर (वय २१, रा. करंजी, पाथर्डी), तेजस गंगाधर वारुळे (वय २१, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) आणि तेजस अमित उळागड्डे (वय २२, रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही नियमित व्यायामशाळेत (जिम) जाणारे आहेत. त्यामुळे या घातक इंजेक्शन्सचा वापर व्यायामपटूंकडून केला जात असावा,…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पाथर्डी, एम.आय.डी.सी. आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी एकूण ५ लाख ३० हजार १४६ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ११ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ठोंबरे, अतुल लोटके, राहुल द्वारके, सागर ससाणे, रोहित येमुल, गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजित जाधव,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली आहे. वैजापूरकडून पुणतांबा फाटा रोडने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा ट्रकवर छापा टाकून पोलिसांनी २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीष भवर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणतांबा फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी संशयित टाटा कंपनीचा हायवा (क्र. MH-43-Y-0520) थांबवला.…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, परंतु अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला संयम आणि धैर्याने काम करावे लागेल. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना वाणीवर ताबा ठेवा, अन्यथा विनाकारण मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मनातील सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील.…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. सध्या ग्रामीण भागात बिबट्यांचे वाढते हल्ले व दहशत अत्यंत चिंताजनक असून, यावर वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने व कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. जळगाव, धुळे, पुणे आणि नाशिक दौऱ्यावरून परतल्यानंतर आमदार थोरात यांनी तातडीने जवळेकडलग येथे जाऊन वसंत पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करत घरातील सदस्यांची आपुलकीने चौकशी केली व संपूर्ण कुटुंबाला धीर दिला. कृष्णाच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच थोरात यांनी सोशल…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींचे अपील संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी अकोले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली २ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडाची कारवाई कायम ठेवणारा निकाल दिला आहे. रामदास खंडू भांगरे, दामू खंडू भांगरे आणि विष्णू खंडू भांगरे (सर्व रा. चांदगिरवाडी, अकोले) अशी शिक्षा कायम झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ७ फेब्रुवारी २००४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपींनी जमिनीच्या जुन्या वादावरून फिर्यादी तुळशीराम भांगरे यांच्या घरासमोर…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर चाप लावण्यासाठी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर आणि राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण २० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीष भवर यांच्या…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  लेखणीला विचारांची दिशा देणारे, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची हिंमत बाळगणारे, संगमनेर तालुक्याच्या पत्रकारितेचा मानदंड असलेले संवेदनशील ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेस परिवाराच्यावतीने आज हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला. पांगारकर सर म्हणजे केवळ एक पत्रकार नाहीत, तर ते एक विचार आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या काळात अनेक वेळा पुण्यनगरीसह राज्यातील नामांकित दैनिकांचे विभागीय प्रतिनिधी, उपसंपादक, ब्युरो चीफ म्हणून जबाबदारी सांभाळत, वंचित, शोषित, पीडितांच्या व्यथेला वाचा फोडली. त्यांच्या लेखणीत नेहमीच पुरोगामी महाराष्ट्राची, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची झलक राहिली आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याची आणि समाजाच्या शेवटच्या घटकासाठी लिहिण्याची त्यांची भूमिका आजच्या काळात…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पवित्र श्रावण महिन्यात एकीकडे नागरिकांचे धार्मिक विधी, गृहप्रवेश, भंडारा आणि पूजा-अर्चा यांसारखे कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे संगमनेर शहर व ग्रामीण भागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोणताही वादळ-वारा किंवा पाऊस नसताना महावितरणचा निष्क्रियपणा उघड झाला असून, अखंडीत वीजपुरवठा देण्यास वीज महामंडळ पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे. सध्या ग्रामीण भागात तीन-तीन तास भारनियमन (लोडशेडिंग) सुरू असून संगमनेर शहरातही विजेचा लपंडाव कायम आहे. अचानक वीज गायब…

Read More

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न होतील. घरातील वातावरणात आनंद राहील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा काळ अत्यंत शुभ आहे. आरोग्याची उत्तम साथ लाभेल, परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या धनलाभाचे योग बनत आहेत. वृषभ – आज आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण खर्च वाढल्यामुळे काहीसा ताण निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. कौटुंबिक बाबींमध्ये संयम बाळगावा लागेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांच्या सहवासात मन प्रसन्न होईल. आरोग्याच्या दृष्टीने…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांच्या देखत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे समर्थक संदेश बाळासाहेब देशमुख यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (वय २८, रा. खांडगाव) या तरुणाच्या गालावर चापटा मारून दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संदेश देशमुख यांच्याविरुद्ध एनसीआर (N.C.R.) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास खांडगाव येथील शेतकरी प्रसाद गुंजाळ हे नेहमीप्रमाणे खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरील पटांगणात बसलेले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीस संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.  ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाकडून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. आरोपी काशिनाथ रामनाथ गिऱ्हे हा दारूच्या नशेत फिर्यादी इंदुबाई बारकु गिऱ्हे यांच्या घराच्या दारात आला होता. “तुझ्या पतीने मला गावातून येताना आईवरून शिवीगाळ…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारने मान्यता दिल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोजापूर पूर चारीद्वारे तालुक्यातील अवर्षण प्रवर्षण भागातील जलसाठे भरून देण्याच्या निर्णयामुळे ३५ पाझर तलाव भरले जाणार असून, असल्याने लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाकरीता वरदान ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याबाबत मंत्री…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला प्रत्येक कामात संयम बाळगण्याची गरज आहे. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनात लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमल्यामुळे मानसिक…

Read More

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ आज आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या संयमाने तुम्ही त्यावर मात कराल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगतीची नवीन संधी मिळू शकते. मित्रांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. प्रवासाचे योग बनत आहेत. कर्क कामाच्या ठिकाणी तुमच्या…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न विचारात घेऊन संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे पाझर तलावातून पाणी सोडण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोहारे-कासारे परिसरात गेल्या काही दिवसांपासून खरीप पिकांना पाण्याची अत्यंत गरज भासत होती. तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला होता. यामुळे संतप्त व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा वसंत पवार या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने पळताना शेततळ्यात पडल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुःखाकुल पवार कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या अत्यंत कठीण प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाकडून मिळणारी सर्व आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. कृष्णाच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात…

Read More