Author: Annant Ppangarkar
संगमनेर – शेतकऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळावी, फॉरेस्ट व गायरान जमिनीचे अतिक्रमित पट्टे अतिक्रमणदारांना कायम करण्यात यावे, वाढीव लाईट विलासह महत्त्वाच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचा निर्णय कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी (११ जानेवारी) संगमनेरमध्ये शताब्दी वर्षानिमित्ताने संगमनेर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांसह सामान्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारी धोरणाविरोधात व इतर मागण्यांसाठी निर्णय घेण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अँड. सुभाष लांडे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड डॉ. बन्सी सातपुते यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉम्रेड भिका वाघ, कॉम्रेड अशोक डुबे, कॉम्रेड सयाजी कानवडे, कॉम्रेड लहानू हासे, कॉम्रेड बापू कानवडे, कॉम्रेड दशरथ हासे,…
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल तेरा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातातील मृत आणि जखमी निफाड तालुक्यातील धारणगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला. दरम्यान अपघातातील मृत आणि जखमींची काही नावे समोर आली आहे… मृतांची नावे …
शिर्डी – विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतसुद्धा विजय मिळवायचा आहे, असे फडणवीस म्हणाले. ‘श्रद्धा आणि सबुरी’चा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना ‘श्रद्धा आणि सबुरी’चा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी…
शिर्डी : शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते, त्याला २० फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी द्रोह केला होता. २०१९ ला बाळासाहेबांची विचारधारा सोडली, त्यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर केला. शिर्डी येथे रविवारी भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आक्रमक भाषण करीत विरोधकांना लक्ष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा दिला. विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली…
संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले आहे. यशोधन जवळील मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ पत्रकार…
संगमनेर – भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे हे दोघेही पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तित्व पुढच्या अनेक पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल असे आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले. रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, पुरस्कारार्थी माजी मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संभाजीराव कडू यांच्यासह शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे आमदार…
संगमनेर – आनंदी आणि उत्साही कार्यक्रमात आपले चेहरे खुललेले दिसत नाही. या चेहऱ्यावर जे हास्य आणि आनंद असायला पाहिजे तो आनंद मला कुठेतरी कमी दिसतो. कदाचित काही लोकांना आपली चूकही मान्य झाली असेल. आकाश देखील ज्यांच्या कर्तुत्वाला गवसणी घालेल असे काम भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे. झाड वाढवायला, जगवायला त्याला सातत्याने पाणी द्यावं लागतं. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रात काम करतो. भाऊसाहेबांनी लावलेले हे झाड कधी सुकू देऊ नका, या झाडाला सातत्याने पाणी देत राहा, असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व…
संगमनेर – आपला सहकार, आपलं संगमनेरच जग, सहकाराचे विश्व तीर्थरूप भाऊसाहेबांनी मनापासून रक्ताचे पाणी करून वाढविल आहे. ते पुढच्या कालखंडात काळजीपूर्वक जपण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे. हे लक्षात ठेवावे लागेल. काही मोडण्याचे प्रयत्न नक्की होतील. काही शक्ती असं काम करतील, पण त्यांना कोणत्याही पद्धतीचा थारा न देता आपल्याला हा सहकार, तालुका, राजकारण पुढे न्यायच आहे. त्याकरता तुम्ही सर्वांनी या स्मृतिदिनी भक्कमपणे निश्चित राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, असं आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात…
श्रीरामपूर – लोकहक्क फाउंडेशन श्रीरामपूरच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ज्येष्ठ पत्रकार स्व.अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना जाहीर झाला असल्याची माहिती लोकहक्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार लहू कानडे व समन्वयक माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांनी दिली. लोकहक्क फाउंडेशनच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून स्व. अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार देण्यात येते आहे. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी दै.लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक मोहनिराज लहाडे व दुसऱ्या वर्षी दै. सार्वमतचे वृत्तसंपादक अशोक गाडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यंदा श्री. लंके यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी, ता. १६ जानेवारी रोजी सकाळी ११.३०…
राज्यातील महायुतीचं सरकार सत्तेवर बसून महिना उलटत नाही, त्याआधीच सरकारपुढच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणार्या आंदोलनांनी सरकार बॅकफूटवर असताना आता नितेश राणेंसारख्या मंत्र्यांमुळे सरकारच्या नाकातली नथ जणू जड होऊ लागली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना नाकीनऊ आलेल्या युतीला मोठ्या फरकाने विजय मिळाला खरा, पण तो आनंद फारकाळ टिकला नाही. मंत्रिपदाचं वाटप, त्यानंतर खातेवाटप, पुढे बंगले वाटप या वाटपांनी होता तो आनंदही झोकाळून गेला. सरकार मोठया फरकाने सत्तेवर आल्यावर यापुढे बदला नव्हे तर बदल घडवणारं सरकार देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कधी नव्हे ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजिवांनी फडणवीसांची भेट घेऊन आणि…
स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची व समाजकार्याची आवड होती. त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचे वातावरण स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेले होते. देश स्वतंत्र्यलढ्यासाठी एकवटला होता. सर्वच तरुण देश प्रेमाने आणि देशासाठी त्याग करण्याच्या उद्देशाने भारावून गेले होते. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात भाऊसाहेबांनी भाग घेतला त्यावेळेस त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते. अत्यंत साहसी व धाडसी वृत्तीने त्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. मात्र आजच्या तरुणांना असे वाटते आहे की राजकारण हे आपले क्षेत्र नाही परंतु असे नाही चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले राजकारण गरजेचे असते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाऊसाहेबांनी डावी व साम्यवादी विचारसरणी जोपासत…
अहिल्यानगर – शेअर ट्रेडिंग व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिर्डी येथील सेवानिवृत्त व्यक्तीची ‘कांचन’ नावाच्या महिलेने सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात कांचन नावाच्या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० सह आयटी ॲक्ट कलम ६६(ड) नुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीमध्ये संबंधित कांचन नावाच्या महिलेचा व्हाट्सअप नंबर नमूद करण्यात आला आहे. समाज माध्यमातील शेअर ट्रेडिंगच्या माहितीवरून संपर्कात आलेल्या अनोळखी महिलेने ही फसवणूक केली आहे. फिर्यादी महावितरण विभागातून सेवानिवृत्त झाले असून शिर्डीतील रहिवासी आहे. फसवणुकीचा हा प्रकार १२ एप्रिल २०२४…
अहिल्यानगर – युवतीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या तरूणासह त्याला मदत करणाऱ्या पती-पत्नीविरोधात अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या संदर्भात नगर शहरातील पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. रोहिदास तुपे (रा. मातुलठाण, ता. श्रीरामपूर), हर्षदा तुपे व अभिषेक कानडे (दोघे रा. वळणपिंप्री ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हर्षदा व अभिषेक पती-पत्नी असून त्यांनी फिर्यादी युवतीची रोहिदाससोबत ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो फिर्यादीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. रोहिदास वारंवार फिर्यादी युवतीला त्रास देत होता. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहे.
विशेष प्रतिनिधी / मुंबई खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उडी घेतली आहे. यामुळे पोलीस आणि सीआयडी तपासाची सारी माहिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला द्यावी लागणार आहे. खा. बजरंग सोनावणे यांनी दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मस्साजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. संतोष देशमुख कुटुंबीयांना मदत मिळवून देणेबाबत आयोगाला त्यांनी विनंती केली. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोश देशमुख यांची महिन्याभरापूर्वी म्हणजेच ९ डिसेंबरला अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा आपल्या पद्धतीने सर्व…
पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले. या खटल्याची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वाद सातत्याने माध्यमांत चर्चिला जातो. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा…
शिर्डी, दि.१० – भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात झाली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.…
संगमनेर – स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरने नुकतेच दिव्यांग शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये २२८ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यातील १३६ व्यक्तींना आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी (६ जानेवारी) रोटरी आय केअर हॉस्पिटल येथे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांमधून १३६ दिव्यांग व्यक्तींना १६२ प्रकारचे साहित्य वाटण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये आरएनसीटी अत्याधुनिक पाय, एल एन ४ प्रोस्थेटिक हात, जयपुर फुट, कुबडी आदि साहित्याचे वाटप करण्यात आले, या साहित्याची अंदाजीत रक्कम सुमारे १…
मुंबई – उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार तांबे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित मंत्र्यांकडून विविध विषयांचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे. आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मांडणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या कामांचा आढावा ते आपल्या मतदारांना समाज…
संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (१२जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन शेजारील मैदानावर सुरू असून या तयारीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. यशोधन जनसंपर्क कार्यालयाशेजारील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज व विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या…
शुक्रवार, १० जानेवारी छत्रपती संभाजीनगर: जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या आरोपी मुलास सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना जालना जिल्ह्यातील पारेगाव येथे १ मे २०२३ रोजी रात्री घडली. आरोपी राहुल गौतम गोवकवाड (२७, रा. पारेगाव, ता. जि. जालना) याला न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. पीडिता व आरोपी हे नात्याने मायलेक असून, १ मे २०२३ रोजी रात्री ८ वाजता आरोपी व पीडिता हे जेवण करून घराबाहेर अंगणात झोपलेले होते. आरोपीने घरात जाऊन घरातील लाईट बंद करून अंधार केला. मोबाईलची बॅटरी…
