Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि अकोले या सरळ मार्गानेच गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली आहे. जर सरकारने आणि काकोडकर समितीने जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात तीव्र आंदोलन उभारून थेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वे रोखू, असा थेट इशारा तांबे यांनी दिला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा तिढा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून या प्रश्नावरून आता आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनानंतर डॉ. अनिल काकोडकर समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मुंबईत सोमवारी झालेल्या एका अपघात प्रकरणी माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पश्चिम मध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. मुंबईतील खार पश्चिम येथील सीडी रोड-16 वा रोड जंक्शनवर २८ सप्टेंबरच्या सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात बीएमसी कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (४१) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी नॅन्सी (३७) गंभीर जखमी झाल्या. ७१ वर्षीय माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या भरधाव इर्टिगा कारने अय्यप्पन यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ…
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्या तुम्ही लीलया पेलू शकाल. व्यवसायात आर्थिक लाभाचे चांगले योग दिसत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला आनंद मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याची साथ उत्तम राहील, तरीही धावपळीवर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण वाढल्यामुळे मन थोडे अस्वस्थ होऊ शकते, त्यामुळे संयम बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रिय व्यक्तीसोबत मतभेद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ येथील प्राचीन, जागृत व नवसाला पावणारे श्री वरदविनायक मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. परिसरातील अनेक भाविकांनी अनवाणी पायी येऊन श्री वरदविनायकाचे दर्शन घेत नवसपूर्ती केली. अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता प्रभातगीत गायनाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी प्रणव परशुरामी यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. दिवसभर जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची सुरक्षा विचारात घेता, नगरपरिषदेच्या ताफ्यात दोन नवीन अत्याधुनिक अग्निशामक वाहने दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत या वाहनांच्या खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे संगमनेरकरांच्या सुरक्षेत मोठी भर पडली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे होते. हीच गरज ओळखून नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाची क्षमता वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तातडीने राज्याचे नगरविकास मंत्री तथा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जयहिंदचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवात सकाळी १५७ विद्यार्थ्यांची गांधीवेषातील प्रभात फेरी, भजन संध्या आणि दुपारी ‘जवाहरलाल हाजीर हो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता यशोधन कार्यालय येथील मैदानापासून महात्मा गांधींजींची वेशभूषा केलेल्या १५७ विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता संगमनेर बस स्थानक येथे गांधीजींच्या आवडत्या भजनांचा कार्यक्रम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना अलीकडील अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत थोरात आणि त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुजय विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले. सुजय विखे यांनी थोरातांना वाकून नमस्कार केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “पराभूत होऊनही बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही?” हा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून विचारला जात असेल, तर त्याचे उत्तर केवळ निवडणुकीच्या निकालात शोधता येणार नाही, असे मत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांचे वडील, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दिलीप खेडकर यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल १०२ टक्के (दुप्पट) म्हणजे १३ कोटी ३० लाख ९१ हजार ६९६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे. २८ वर्षांच्या कालावधीची चौकशी- दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते व मे २०२३ मध्ये…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी आर्थिक व्यवहारात लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही संयमाने त्यावर मात कराल. आर्थिक बाबतीत थोडे नियोजनबद्ध चालणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांच्या बाबतीत सावध राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल. मिथुन- आज तुम्हाला सर्व क्षेत्रांत यश मिळण्याचे योग आहेत. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांच्या पथकाने तब्बल ९२ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत बारामती येथील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ५०० रुपये दराच्या तब्बल १८४१९ बनावट नोटा, ५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली फोक्सवॅगन कार (MH 14 DF 0365) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश…
– बाळासाहेब घोडके महाराष्ट्र शासनाने २०२६ चा कोरडा दुष्काळ जाहीर केला. बरं झालं. कारण या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण या दुष्काळापेक्षाही मोठे नुकसान काही राजकीय नेत्यांचे, पुढाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण दुष्काळ कोणताही असो, खरे नुकसान यांचेच होते आणि याचा खरा लाभही यांनाच मिळवता येतो. जाऊ द्या. पण काल-परवा अहिल्यानगरच्या राजकारणात एक आगळी-वेगळी घटना घडली. काही कार्यकर्त्यांसाठी ती सुखद आणि सकारात्मक असेल, तर काहींसाठी नकारात्मक आणि दु:खदही असेल. असणारच. कारण नाण्याला दोन बाजू असतात. आणि जेव्हा त्या दोन्ही बाजू जोडल्या जातात, एकत्र येतात, तेव्हाच ते नाणे चालते, त्याला किंमत मिळते…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला योग्य वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल. आर्थिक बाबतीत नफ्याचे योग आहेत, तरीही अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची साथ उत्तम लाभेल. वृषभ- आज दिवसभर मन शांत आणि समाधानी राहील. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल. जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. अचानक लहान प्रवासाचा योग येऊ शकतो, जो…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही चौथी मूलभूत गरज बनली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे घरातील संवाद संपला असून गोष्टी सांगणे पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे आजच्या काळात विद्यार्थ्यांऐवजी पालकांसाठीच संस्कार शिबिर घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे,” असा घणाघाती टोला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी लगावला. संगमनेर येथील मातोश्री लॉन्सवर आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह प्रसाद मिरासदार, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, डॉ. नितीन संगमनेरकर, प्रा. बाबा खरात, संगमनेर शाखेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, अनिल सोमणी, अरविंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एलसीबीने अटक केलेल्या तौसिफ ताहीर कुरेशी याच्या पोलीस कोठडीत पुन्हा दुसऱ्यांदा बुधवारपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीच्या पुढील तीन दिवसात तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. ड्रग्स प्रकरणी स्थानिक पोलिस अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासिफ असद कुरेशी याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. पोलिसांचा हा कथित कारनामा समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांची कंट्रोल रूमला बदली केली. सावंत यांना कंट्रोल जमा केल्यानंतर श्रीरामपूरचे अपर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होत असून, पुढील १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संगमनेरमध्ये आयोजित करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत, असा महत्त्वपूर्ण मानस संमेलनाच्या स्वागताध्यक्ष, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, संगमनेर यांच्या संयुक्तवतीने मातोश्री लॉन्स येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये घेण्याच्या घोषणेनंतर उपस्थित साहित्यिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या उत्स्फूर्त कडकडाटात या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या आणि गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुसक्या आवळल्या आहेत. अंकुश उर्फ अर्जुन नामदेव पवार (वय २९, रा. प्रगती शाळेसमोर, राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, रमीजराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड आणि जालींदर साखरे यांच्या पथकाने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम केली होती. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कोतवाली आणि राहुरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांत फरार…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन “राजकारणात सूडबुद्धी आणि स्वार्थ हाच अंतिम शब्द नसून, तिथे संवेदनशीलतेचा आणि महाविकास आघाडीच्या धर्माचा अनोखा अध्यायही जपला जाऊ शकतो, याचा प्रत्यय संगमनेरमधील एका भावूक प्रसंगाने दिला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय औदार्याचा व संवेदनशीलतेचा आलेला वैयक्तिक अनुभव समाज माध्यमावर मांडत थोरात साहेबांना ‘देव माणूस’ असे संबोधले आहे. राजकीय वैर बाजूला सारून एका सामान्य कार्यकर्त्यासाठी न्यायालयात जाऊन साक्ष देण्यापासून ते वैयक्तिक दुःखात पाठीशी उभे राहण्यापर्यंत बाळासाहेब थोरात यांनी जपलेली माणूसकी आणि महाविकास आघाडीचा धर्म आज तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.”…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे पार पाडाल. नवीन योजना आखण्यासाठी किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळल्यास फायदा होईल. आरोग्याची साथ उत्तम राहील, पण आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात, परंतु संयम आणि समंजसपणा दाखवल्यास सर्व प्रश्न सुटू शकतील. व्यवसायात मोठे व्यवहार करताना घाईगडबड करू नका. जोडीदाराशी असलेले नाते…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना येथे रविवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी निवडणूक टाळण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रापुढील गंभीर आव्हाने लक्षात घेता अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा बँकेने नेहमीच सहकाराची राजकारणविरहित वाटचाल जपली आहे. हीच परंपरा पुढे नेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या बँकेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतात टोमॅटो तोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारी, विनयभंग आणि दंगलीत झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी (पिंपळगाव देवा) येथे घडली आहे. गुरुवारी (२४ सप्टेंबर) घडलेल्या या घटनेप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO), ॲट्रॉसिटी आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी शेतात काम करत असताना आरोपी कानिफनाथ वाळूंज याने महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेचा विनयभंग करण्यात आला तसेच तिच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला अश्लील भाषेचा वापर करत धमकी देण्यात आली. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील सुमारे…
