Author: Annant Ppangarkar
संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये झालेल्या “आय लव संगमनेर चळवळ” अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात जिल्हाभरातून ७२९० तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या ९१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोक चळवळीच्यावतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा रविवारी पार पडला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर यावेळी उपस्थित होते. या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर…
संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या संगमनेर मधील जोशी स्वीट होम वरील कारवाई टाळण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या युवा नेत्यामार्फत प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.कच्चा आणि शिळा मिठ्ठावडा ग्राहकाला देऊन त्याच्याशी वाद घातल्याचा प्रकरणाचा व्हिडिओ मध्यंतरी समाज माध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर संगमनेर मधील जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. जोशी स्वीट होम मधील मिठाईसह अन्नपदार्थाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी केली होती. तपासणी दरम्यान काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले होते. या तपासणीत काही गंभीर बाबी आढळून आल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर अन्न व औषध…
संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी संगमनेरकर नागरिकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करण्याचे तसेच कारवाई टाळण्याचे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले आहे. कोकरे म्हणाले, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे. मार्च महिना जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे विशेष वसुली अभियानांतर्गत शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी करायची ज्या थकबाकीदारांकडे थकबाकी आहे अशा थकबाकीदारांवर नळ जोडणे तोडण्याची, मालमत्ता जप्तीची, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तसेच शहरातील विविध भागात…
अहिल्यानगर दि. १६ – महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक खासगी दवाखान्यातून रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने दोन्ही योजनांशी संलग्नित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालये संलग्नित करण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अभिलाषा खरसडे, डॉ. अनिकेत भालसिंग, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे, विठ्ठल वांढेकर, हर्षल साळवे, शरद कोंडा आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री दहा वाजता झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला असून १० लोक जखमी झाले आहे. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर भाविक प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यामुळे महाकुंभला जाण्याची अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी आहेत. महाकुंभला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीरा धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर मोठी गर्दी होती.…
दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उधळलेल्या स्तुती सुमनांनी राजकारणातील अनेकांची झोप उडवली आहे. त्यात सर्वाधिक गारद झाली ती अर्थातच महाविकास आघाडीतील शरद पवारांची सोबती शिवसेना. शिंदेंवरील स्तुती शिवसेनेला मानवली नाही. त्यांनी पवारांवर टीका डागली. ज्यांची पत नाही, तेही बोलले आणि ज्यांची आहे त्यांनीही मागचा पुढचा विचार न करता टीकेची झोड उठवली. ज्यांना पवारांच्या अशा भूमिकेची जाणीव आहे, ज्यांना पवारांच्या स्तुतीमागची गणितं ठावूक आहेत, तेच पवारांना ओळखू शकतात. गेल्या चार वर्षांची सोबत असलेल्या उध्दव ठाकरेंना आणि त्यांच्या सेनेच्या नेत्यांनाही ते जमलेलं नाही, हे मान्य करावं…
अहिल्यानगर, दि. १५ – जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली असता, संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत अधिक तपास करताना समितीच्या दक्षता पथकाने अर्जदाराच्या भावाचे जातवैधता प्रमाणपत्र आधीच अपूर्ण कागदपत्रांमुळे नस्तीबंद झाल्याचे निष्पन्न केले. तरीही अर्जदाराच्या वडिलांनी ते प्रमाणपत्र सादर करून समितीची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. समितीने अर्जदार व…
संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी वारंवार झालेल्या कारवाया आणि कधीही बंद न पडलेले संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने दररोज या-ना त्याकारणाने चर्चेत असतात. घारगाव पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने अशीच एक मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये १७ गोवंश जनावरांसह संगमनेर मधील १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ वाहनांसह सुमारे १६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तलखान्याच्या माध्यमातून कत्तल केली जाते. येथील कत्तलखाने देशाच्या बहुतांश भागात प्रसिद्ध आहे. वारंवार कारवाया करून देखील पोलिसांसह नगरपालिका प्रशासनाला हे कत्तलखाने बंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे कत्तलीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची…
शनिवार, दि. १५ फेब्रुवारी – पुणे हॉटेलचे बिल देण्यावरून मित्राच्या कानाखाली मारल्याचा राग मनात धरून मित्राला अंगावर कंटेनर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील वाघोली रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. परमेश्वर बालाजी देवराये (वय ३५ वर्ष) असे अंगावर कंटेनर घालून मारण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. राम दत्ता पुरी (वय २६ वर्ष) असे आरोपी मित्राचे नाव असून पुरी याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोली येथील कटकेवाडी येथे एका हॉटेलमध्ये परमेश्वर देवराये आणि राम पुरी हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे परमेश्वर…
संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी शाळेत आणलेल्या पुष्पगुच्छाच्या किरकोळ कारणावरून शिक्षिकेला शिक्षकाने टोमणे मारत मारहाण केल्याचे घटना शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील शाळेत घडली असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या शाळेत नियुक्तीस असलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस असल्याने तिने पतीला देण्यासाठी शाळेमध्ये गुरुवारी पुष्पगुच्छ आणला होता. या पुष्पगुच्छाच्या कारणावरून शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे यांनी शिक्षिकेला…
संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी मध्यंतरी कच्चा आणि शिळा मिठ्ठा वडा प्रकरणी एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर संगमनेरमधील मिठाई साठी प्रसिद्ध असलेले जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. आता या जोशी स्वीट होमची अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जोशी स्वीट होम अन्न औषध प्रशासनाच्या रडारवर आले असून संबंधित विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. जोशी स्वीट होम मधील अन्नपदार्थांच्या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील त्यांच्या मुख्य दुकानात काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली व या तपासणीचा अहवाल…
अहील्यानगर दि. १५ – पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, महामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे…
# महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी # कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक, एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये # सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत मुंबई, दि १५ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक,…
विशेष प्रतिनिधी / मुंबई शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीच नाही तर बडे नेतेही ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहेत. कोकणातील उद्धव ठाकरेंचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर मराठवाड्यातील नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून का जात आहे, याचे उत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. दानवे यांनी कोणाचे नाव न घेता म्हटले की, समोरचे लोक बाजार मांडून बसले आहेत. पैशांची ऑफर देत आहेत. विकास कामांची ऑफर दिली…
विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीत स्थान दिल्याने साऱ्यांच्या नजरा अजित पवारांकडे एकवटल्या आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या सलगीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा वारंवार केली जात आहे. इतकं असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘कोअर ग्रुप’मध्ये मुंडेना सदस्य करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस…
संगमनेर, दि. १४ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सहा आरोपींना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी गुरुवार आणि शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. नोव्हेंबर महिन्यात साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी…
छत्रपती संभाजीनगर – संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तब्बल आठ-नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधार संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज नाकारल्याने कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुटे याचा नियमित जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर त्याने जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठानेही कुटेला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याचा तुरुंगातील मुक्काम जैसे थे राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी…
संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहू, असा विश्वास संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे आणि अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने खताळ यांचा सत्कार करण्यात आला. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमच खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा…
संगमनेर – प्रतिनिधी बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक, संगमनेर) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक, संगमनेर) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी खंडणी प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे त्यांचे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने…
संगमनेर दि. १३ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे नवे अपर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. अनेक गावांसाठी गैरसोयीचा असलेला हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी होऊन देखील सरकार जर ऐकणार नसेल तर सरकार विरोधात जन आंदोलन उभे करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रस्तावित असलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात अनेक ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतर देखील या प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रभावित गावातील नागरिक व जेष्ठ विधीज्ञांची बैठक माजी…
