Author: Annant Ppangarkar

बुधवार १३ नोव्हेंबर  संगमनेर – सोमवारी तालुक्यातील साकुर येथे भरदिवसा कान्हा ज्वेलर्सवर दरोडा टाकून संपूर्ण दुकान लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. या दोन्ही आरोपींना बुधवारी पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अन्य तीन प्रमुख आरोपींसह चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांचे कसब पणाला लागणार आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या साकुरच्या बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या कान्हा ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीनदा हवेत गोळीबार करत दुकानदाराला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रकार घडला होता. या दरोड्यात ५० लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी…

Read More

राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशत आणि दडपशाही असल्याचे मला सांगितले गेले. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर कोणी दहशत आणि दडपशाही करत असेल तर ती उध्वस्त करण्याची ताकद तुम्हा मतदारांमध्ये आहे. इथल्या दहशतवादाला घाबरू नका, या दडपशाहीचा बंदोबस्त करावाच लागेल असा इशारा देतानाच निळवंडे धरणाचे काम फक्त बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच झाले. नगरच्या विकासात जर कोणाचा हात असेल तर तो बाळासाहेब थोरात यांचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवार यांची बुधवारी दुपारी राहाता येथे सभा झाली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब…

Read More

बुधवार, १३ नोव्हेंबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरं जावं, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरू नये, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली…

Read More

बुधवार १३ नोव्हेंबर  संगमनेर मतदार संघात स्वतःला टायगर संबोधणाऱ्यांनी या मतदारसंघातील दहशतीचा मुद्दा समोर आणत परिवर्तनासाठी साद घातली आहे. मात्र त्यांची परिवर्तनाची साद ही केवळ सत्तेच्या लालसेने असून आमची परिवर्तनाची साद सामान्यांच्या, वंचितांच्या हक्कासाठी असल्याचे वंचितचे संगमनेर विधानसभेतील उमेदवार अजीज वोहरा यांनी म्हटले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या दोन मोठ्या शक्ती विरोधात, आर्थिक बलाढ्य उमेदवारांविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून अजीज वोहरा निवडणूक लढवत आहे. एकीकडे सहकाराच्या माध्यमातून निर्माण केलेले मोठे साम्राज्य सत्ता कायम राखण्यासाठी तर दुसरीकडे प्रवरेची यंत्रणा तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढे सरसावली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील उमेदवार देऊन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने…

Read More

बुधवार, १३ नोव्हेंबर पुणे – ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल, तर नागरीकांना १०० रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तशा सूचना देखील मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे दस्तऐवज करण्यासाठी ५०० रुपयांचाच स्टॅम्पपेपर वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. परंतु, बाजारात आता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे समोर येत आहे. ५०० रुपयांचा स्टॅम्प वापरण्याचा निर्णय सरकारने अचानक पणे घेतल्याने शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद झाले आहे. मात्र या स्टॅम्प पेपरची मोठ्या प्रमाणात छपाई झाले असल्याने शिल्लक…

Read More

संगमनेरचा वाघ राज्यात गर्जना करतो यांना मतदारसंघाच्या बाहेर पडता येईना आ. थोरात यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याची आवाहन संगमनेर – प्रतिनिधी  आमदार बाळासाहेब थोरात यांची सुसंस्कृत नेता म्हणून राज्याला ओळख आहे. दडपशाही करणाऱ्यांना आम्ही दक्षिणेत झटका दिला आहे. वाघाची झुल मांजराने अंगावर घेतल्याने कोणी वाघ होत नाही. तो टायगर नव्हता. खरा टायगर हा संगमनेरमध्ये असून येत्या विधानसभेत संगमनेरमधील खबरीलालचा राजकीय कडेलोट करा. थोरात यांना दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले. युवक काँग्रेस व महाविकास आघाडीच्यावतीने तळेगाव दिघे येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार डॉ.…

Read More

मंगळवार १२ नोव्हेंबर  संगमनेर – भरदिवसा दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील साकुरच्या गजबजलेल्या बस स्थानक चौकातील कान्हा ज्वेलर्सवर गावठी कट्टाचा भाग दाखवून तसेच हवेत फायर करून दुकानात दरोडा टाकत पन्नास लाखाहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या पाचपैकी दोघा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरोडा प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाळासाहेब वावरे, (वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) व स्वप्नील किशोर येळे, (वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे…

Read More

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १ हजार २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण मंगळवार, १२ नोव्हेंबर  संगमनेर – मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. वसंत लॉन्स येथे संगमनेर विधानसभा मतदार संघातील १ हजार २४२ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे उपस्थित होते. हिंगे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे गरजेचे आहे. यावेळी मतदान यंत्राची जोडणी, मतदान यंत्र हाताळणी, घोषणापत्र व फॉर्म अचूक…

Read More

मंगळवार, १२ नोव्हेंबर  पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याजवळ सोमवारी रात्री काढली. जखमी पोलीस उपनिरीक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश अभिमान नेमाणे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे. अशी घडली घटना……

Read More

मंगळवार, १२ नोव्हेंबर सर्वधर्म समभावाचे आणि शांतता असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असताना काही राजकीय शक्ती फक्त राजकारणासाठी विनाकारण दोन समाजात वाद पेटवत आहे. सोमवारी मारहाण झालेल्या घटनेतील साधू आणि मारहाण करणारे दोन्ही हिंदू समाजाचे असून केवळ बुद्धिभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी साधूना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. संगमनेर शहर हे शांतता प्रिय आहे. परंतु काही शक्ती संगमनेर शहरात तणाव निर्माण करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून आपली…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे भासविणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक गाठला आहे. महायुतीच्या काळात उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात पळविले जात हाताला काम नसल्याने सामान्य माणसाचे जीवनमान अवघड बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष असून तोच आश्वासनपूर्ती करेल, यासाठी राज्यातील मतदार, संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले आहे. कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत उमेदवार अजीज वोहरा यांनी तालुक्यातील मतदारांचे संपर्क करत आपली भूमिका…

Read More

मंगळवार १२ नोव्हेंबर अहिल्यानगर – अहिल्या नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २४ नोव्हेंबर २०२४ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. राज्यभरातील…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – शहरातील नवीन नगर रस्त्यालगत असलेल्या जठार हॉस्पिटल पाठीमागे सोमवारी दुपारी चार साधूंना दोन जणांनी मारहाण करण्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साधू वेश्यातील चार लोक जठार हॉस्पिटल पाठीमागून नवीन नगर रस्त्याकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात आढळून मारहाण केली. मारहानीनंतर आरोपी…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर बटेंगे तो कटेंगे म्हणविणाऱ्यांनी महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार काटला आहे. महायुतीचा निवडणूक जाहीरनामा नुकताच अमित शहा यांनी जाहीर केला आहे. पंधरा लाख रुपये हा निवडणूक जुमला होता, असे सांगणारे हेच ते अमित शहा आहे. त्यामुळे महायुतीचा हा जाहीरनामा म्हणजे नवा जुमला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. महाविकास आघाडीचे संगमनेरमधील उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ खासदार कोल्हे यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवकांच्या या मेळाव्यात खासदार कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख, नगर दक्षिणचे खासदार…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – राजकारणाच्या हल्लीच्या बजबजपुरीतील नेत्यांची ओळख टक्केवारीमुळे होत आहे. मात्र संगमनेरच्या नेतृत्वाची ओळख राज्यभरात कर्तुत्वाने होत आहे. राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व असलेल्या आमदार थोरात यांनी सततच्या विकास कामातून तालुक्याचा कायापालट केला आहे. सुसंस्कृत नेत्यांची परंपरा जपणारे हे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी काँग्रेस, महाविकास आघाडीच्या वतीने देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या युवक निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ.…

Read More

संगमनेर हादरले, सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्सवर दरोडा  दुचाकीवरून आले पाच दरोडेखोर… सोमवार, ११ नोव्हेंबर  संगमनेर – संगमनेरच्या साकुरमधून खळबळ माजविणारी घटना समोर आली आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकत दागिन्यांची लूट केली आहे. साकुर मधील सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स या दुकानात दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी दुकानासमोर हवेत…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर  संगमनेर – मोहसीन शेख राज्यात विविध समाज त्यांच्या हक्कासाठी वाटत असताना मुस्लिम समाजाने देखील निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असल्याची जाणीव ठेवत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे ताकद वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी संगमनेर मधून मुस्लिम समाजाने वंचितला मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापिताविरोधात वंचित बहुजन आघाडीने अब्दुल अजीज वोहरा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीलाच वोहरा यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला.…

Read More

सोमवार, ११ नोव्हेंबर  मुंबई – विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राज्यातील २१ जणांवर काँग्रेस पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये अहमदनगर शहरमधून मंगल विलास भुजबळ यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत १६ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या सर्व बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. या बंडखोर उमेदवारांवर झाली निलंबनाची कारवाई… (कंसात मतदार संघ) आनंदराव गेडाम,…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी  निंबाळे येथील घटने संदर्भात पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची घटनाही वाहनांचा कट लागल्याच्या कारणावरून घडली आहे. सद्यस्थितीत शांतता असून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घटनेबाबत कोणती अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संगमनेरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ सुखदेव शिंदे (रा. वाघापूर, ता. संगमनेर) हे एम.एच. १७ ए.ए. ८८५ या वाहनातून त्यांच्या मुलीस संगमनेर बस स्टैंडवर सोडण्यात…

Read More

रविवार, १० नोव्हेंबर  संगमनेर – संगमनेरलगत असलेल्या एका गावामध्ये तीस वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्यात पीडीत महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. बलात्काराची ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली असून या संदर्भात पीडित महिलेच्या सासूने ८ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी नामदेव मच्छिंद्र चव्हाण (रा. महादेव वस्ती, सुकेवाडी, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला शौचासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये गेली असताना तेथे आलेल्या नामदेव चव्हाण यांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे…

Read More