Author: अनंत पांगारकर
सोमवार, ०२ सप्टेंबर वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे रविवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणावेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. यातून मुस्लिम समाजाच्या भावना देखील मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या आहेत. नितेश राणेंनी मुस्लिम समुदाय विषय केलेले वक्तव्य त्यांना भोवले असून सामाजिक कार्यकर्ते आसिफ चांदसाहब शेख त्यांच्या तक्रारीवरून नगरच्या तोफखाना पोलीस…
गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ सोमवार, दि. २ सप्टेंबर पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली असून रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान आंदेकर यांचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आंदेकर यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचा देखील तपास केला जात असून या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते.…
जाणून घ्या… आजचे राशीभविष्य सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४ मेष – आज भाग्येश शनी कर्म स्थानात असल्याने बऱ्याच दिवसानंतर अडकलेली कामे मार्गे लागतील. आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराबरोबर सहलीचा आनंद घ्याल. वृषभ – व्ययेश मंगळ धनस्थानी असल्याने अचानक प्रवासाचे योग. अचानक खर्च वाढतील. ओळखीचा कोणालाही फायदा घेऊ देऊ नका. मिथुन – जन्मस्थानी असलेल्या मंगळामुळे आज तुमच्या स्वभावातील शांतता भंग पावेल. कर्क – अचानक धनलाभाचे योग येतील. आज जोडीदार तुम्हाला समजून घेईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक समस्या दूर होतील. सिंह – जन्मस्थानी असलेल्या सूर्य चंद्रामुळे नोकरीच्या ठिकाणी प्रकर्षाने आपला प्रभाव जाणवेल. अडकलेली कामे पूर्णत्वास न्याल. कन्या – आर्थिक फसवणूक होऊ…
निळवंडे धरण, कालवे नक्की कोणी केले हे जनतेला माहिती सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा उत्साहात रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम केले, मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता फोटो काढत आहे. मात्र वस्तुस्थिती तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. भेदभाव निर्माण करत चांगल्या वातावरणात काही लोक विष कालविण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करत दहशत निर्माण करत आहे. मात्र अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांचा पुढील काळात बंदोबस्त करू, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विरोधकांना फटकारले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – फॅब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बाप-लेकाची न वटणाऱ्या धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दोन खटल्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. ईश्वर देविदास फापाळे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देविदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी दीड लाखाचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स १३८ प्रमाणे ॲड. राजेश भुतडा यांच्यामार्फत…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – कायद्याची पायमल्ली करत, राजरोसपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाखाची पिकअप जीप जप्त केली आहे. गेल्या काही दिवसातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार झाला आहे. सादिक मुनीर शहा (वय २५ वर्ष, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपीचे नाव असून कारवाई केलेल्या कत्तलखान्याचा चालक असलेला कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा.…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर तालुका दूध संघासह तालुक्यात गाव पातळीवरील संस्थांवर सौर ऊर्जा युनिट बसविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत १२५० गाईंचा गट करून २५ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणीसह गाय भरणीसाठी दूध संघाच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध) वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार थोरात यांच्या उपस्थितीत आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ.…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर जगाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणारे, हिंदवी स्वराज्याचे कर्तेधर्ते, महाराष्ट्राचं अराध्य दैवत, राजाधिराज, योगीराज छत्रपती शिवाजी महाराज जिथे असतील तिथे आज काय म्हणत असतील? ज्या राज्याच्या आणि देशाच्या कल्याणासाठी जिवाचं रान केलं त्या राज्यात होत असलेल्या अवहेलनेने राजे निश्चितच अश्रू ढाळत असतील. ते आज आहेत, अशी साधी कल्पनाही या सत्तेला चिरडून टाकण्याला कारण ठरली असती. ज्या छत्रपतींच्या अवमानतेची एकही संधी ज्यांनी सोडली नाही, ते आज चार-चारदा माफी मागायचं ढोंग करत आहेत. माफी मागितली म्हणजे सारी पापं धुवून निघाली, अशी त्यांची धारणा झालेली दिसते. यामुळे कोणीतरी चिरकूट वरळीत गोविंदांच्या नाच्यांमध्ये महाराजांची माफी मागतो. ह्यांना जनाची नाहीच पण मनाचीही…
आजचे राशीभविष्य रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ मेष – दशमेश स्वस्थानी असल्याने उत्साही दिवस. राहू नेपच्यून अचानक लांबचे प्रवास योग दर्शवतात. सगेसोयरे, नातलग आज तुमच्यावर अतिशय खुश असतील. वृषभ – जन्मस्थानी असलेले हर्षल गुरु आज भरभरून आर्थिक लाभ दर्शवतात. सप्तमेश मंगळ धनस्थानी डोळ्याला इजा दर्शवितो. डोळ्यांबाबत सावध राहा. मिथुन – आज कटकटीचा दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे व्यवहार सुरळीत होतील. धनस्थानातील चंद्र, बुध आर्थिक समस्या सोडवतील. कर्क – जन्मस्थानी असलेले चंद्र बुध मानसिक शांतता प्रदान करतील. भाऊबंद, सगेसोयरे मात्र आजच्या दिवशी त्रास देण्याची शक्यता. सिंह – स्वस्थानी असलेला रवी व सप्तमात असलेला शनि मंद गतीने प्रगती दर्शवितो. आजच्या दिवशी…
शनिवार, दि. ३१ ऑगस्ट संगमनेर – चुलत भावांमधील वादातील शेत जमीन नांगरल्याचा राग येऊन रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने वार करत तर अन्य आरोपींनी काठ्या, लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका आरोपीला दोषी ठरवत पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य पाच आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर या अन्य आरोपींचा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शनिवारी या…
