Author: अनंत पांगारकर

प्रवीण पुरो | मुंबई गुरुवारी (ता. २५ जुलै) पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असताना हवामान विभागानेही धडकी भरणारी शक्यता वर्तवली आहे. २६ जुलैची आठवण करून देणारा पाऊस आज होत आहे. शुक्रवारी (ता. २६ जुलै) सकाळपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ ला आलेल्या पुराची आठवण ताजी होऊ लागली आहे. या दिवशी मुंबईकरांनी पावसाचे रौद्ररुप पाहिले होते. त्या दिवशी मुंबईत दुपारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. तेव्हा संपूर्ण मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी जलमय…

Read More

गुरुवार, २५ जुलै  ५५ वर्षीय आजोबासह तीन वर्षीय नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संगमनेरमध्ये सातत्याने शेततळ्यात बुडून मृत्यूच्या वेदनादायक घटना समोर येत आहे. शिवाजी आत्याबा सोनवणे व समर्थ नितीन सोनवणे असे शेतात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या आजोबा-नातवाचे नाव आहे. गुरुवारी दुपारच्या वेळी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील शेततळ्यालगत औषध फवारणी करत होते. याच दरम्यान त्यांच्या घरी पाहुणे आले म्हणून त्यांचा तीन वर्षाचा नातू समर्थ हा त्यांना बोलाविण्यासाठी शेततळ्याजवळ आला होता. तेथे खेळता खेळता तो शेततळ्यात पडला. पाठोपाठ त्याला वाचविण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही पाण्याने पूर्ण भरलेल्या…

Read More

गुरुवार, २५ जुलै  अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) भ्रष्टाचाराविरोधात कारवाईच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या खासदार निलेश लंके यांच्या उपोषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यामुळे चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे. लंके यांनी एलसीबी विरोधात आवाज उठविल्याने नगर पोलिसांचे विविध कारनामे समोर आले होते. एलसीबीतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारवाईवर तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या खासदार निलेश लंके यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एलसीबीच्या भ्रष्ट कारभाराचे रेटकार्डच जाहीर करत महिन्याकाठी तब्बल ३० कोटी रुपयांची बेकायदा वसुली करणाऱ्या या शाखेच्या इज्जतीचा पुरता पंचनामा जिल्ह्यात झाला होता. चार…

Read More

गुरुवार, २५ जुलै  नागरिकांना मूलभूत गरजांची पूर्तता करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य काम आहे. मात्र शहरालगत असलेल्या घुलेवाडीतील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नवश्याचा मळा येथील ग्रामस्थांना वेगळाच अनुभव येत असून मूलभूत गरजांसाठी त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. या भागातील नागरिक केल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामपंचायतीकडे रस्ता पाणी आणि वीज या संदर्भात पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत या नागरिकांकडून आवश्यक कर घेत असली तरी त्यांना सुविधा देण्यास मात्र असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ग्रामपंचायत प्रशासनाला शेवटचा इशारा देत एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत जर ग्रामपंचायतीने काम हाती घेतले नाही तर संघर्ष सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन उभे…

Read More

गुरुवार, २५ जुलै  नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे रविवारी (२८ जुलै) शपथ देणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

Read More

गुरुवार, २५ जुलै विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून २००९ मध्ये आरोपी अनिल साबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात सरकारी वकील राहुल शेळके यांनी पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर…

Read More

हप्तेखोर एलसीबी दरमहा करतेय २७ कोटी ६० लाखाची हप्ते वसुली! दोन टक्के हप्तेखोरांमुळे जिल्हा पोलीस दलाची नाचक्की, जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का?  गुरुवार, २५ जुलै  जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विशेषत: अहमदनगर एलसीबीच्या हप्तेखोरी विरोधात उपोषणास बसलेल्या खासदार निलेश लंके यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नगरचे पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्याचे रेटकार्डच जाहीर केले. नगर एलसीबीकडून तब्बल २७ कोटी ६० लाख रुपयांचे हप्ते दरमहा गोळा केले जात असल्याची धक्कादायक माहिती खासदार लंके यांनी दिली. खासदार लंके यांनी दिलेली माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाचे डोळे पांढरे होतील अशी धक्कादायक आहे. कोणत्या व्यवसायातून किती रुपयांच्या हप्ते नगरच्या वादग्रस्त एलसीबीकडून गोळा केले जातात याची सविस्तर…

Read More

गुरुवार, २५ जुलै  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यापासून संगमनेर तालुक्यात फक्त ५०% महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात गुरुवार व शुक्रवारी (२४ व २५ जुलै) सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्येक गावामध्ये विशेष मोहीमेअंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र महिलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा दीड हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला आहे. या…

Read More

बुधवार, २४ जुलै एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषणाला बसले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचा अधिकार मला नसून मी फक्त अहवाल पाठवू शकतो. कारवाईचा अधिकार वरिष्ठांना असल्याचे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान खासदार लंके यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार लंके यांच्या उपोषणा संदर्भात बोलताना पोलीस अधीक्षक ओला म्हणाले, पोलीस निरीक्षकांविरुद्ध ज्या काही तक्रारी आहेत त्या मला लेखी स्वरूपात द्याव्यात. आंदोलकांचा जर अधिकाऱ्यांवर…

Read More

बुधवार, २४ जुलै  आधीच जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि त्या विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केलेल्या नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच लुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप चव्हाण असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्याची तत्कालीन नेमणूक अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली होती. चव्हाण सध्या नगरच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहे. लाच लुचपतच्या नासिक पथकाने ही कारवाई केली असून लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व…

Read More