Author: Annant Ppangarkar
सोमवार, १२ ऑगस्ट संगमनेर शहरालगत असलेल्या म्हाळुंगी नदीवरील राजापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट करण्याचे काम पूर्ण होऊन पंधरा-वीस दिवसांचा अवधी उलटला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहे. दूरच्या असलेल्या पर्यायी रस्त्याचा त्यांना वापर करावा लागत आहे. संगमनेर गावठाणातील शाळेतील मुलांना जायला-यायला त्रास होत असून मेडिकव्हर हॉस्पिटल पासून ये-जा करावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांना देखील त्रास होत आहे. सदरचा रस्ता हा संगमनेर (संग्रामनगर)-ढोलेवाडी-राजापूरला जोडला गेलेल्या ब्रिजचा असल्याने व त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने संबंधितांनी याकडे लक्ष घालत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी…
सोमवार, १२ ऑगस्ट अहमदनगर :- २६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे. आजघडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी (१२ ऑगस्ट) नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर…
सोमवार, १२ ऑगस्ट लग्नानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यातच पती-पत्नीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये घडला आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून घारगाव पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरमध्ये आणले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून प्रथम दर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा कयास असून पोलीस या दाम्पत्याने आत्महत्या का केली, की अन्य काही प्रकार आहे याचा शोध घेत आहे. वैभव दत्तात्रय आमले (वय २३ वर्ष) आणि स्नेहा वैभव आमले (वय २० वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवदांपत्याचे नाव असून साकुरच्या मुळा नदीजवळ मांगमळीत रविवारी (११ ऑगस्ट) रात्री काही ग्रामस्थांना त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या…
सोमवार ११ ऑगस्ट | अहमदनगर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेल्या महिलांनी अर्जामध्ये नमूद केलेला बँक खाते क्रमांक आधारकार्डला संलग्न असणे आवश्यक आहे. ज्या महिलांनी योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांनी आपला बँक खाते क्रमांक स्वतःच्या आधारकार्डला तात्काळ संलग्न करून घ्यावा. बँक खाते क्रमांक संलग्न झाला आहे याची खात्री करावी. तसेच ज्या महिलांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी अर्जामध्ये जो बँक खाते क्रमांक नमूद करणार आहे तो बँक खाते क्रमांक आधारकार्डला सलग्न आहे, याची खात्री करूनच तो बँक खाते क्रमांक ऑनलाइन अर्जामध्ये नमूद करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य…
रविवार, ११ ऑगस्ट मुंबईतील काही जणांना माज आला आहे, तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे-जेवढे माजलेले वळू आहेत, त्यांना कात्रजचा घाट दाखवू. त्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे, पण आपण त्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ, असा निर्धार व्यक्त करत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली रविवारी पुण्यात आली. सोमवारी ही रॅली अहमदनगर मध्ये येत आहे. या रॅलीला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून कात्रजमध्ये जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका,…
राहाता बाजार समितीला २५ एकर जमीन हस्तांतरीत राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवार, ११ ऑगस्ट शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आणि उप माहिती कार्यालय राहाता व शिर्डी परिसरात डाळींब व फुलांचे चांगले मार्केट आहे. तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी रूपये मंजूर करत असल्याची व आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी केली. साकुरी-राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री…
रविवार, ११ ऑगस्ट राहाता | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राजकिय आकसापोटी कर्ज नाकारले जात असल्याच्या भावनेतुन श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी व कामगारांचे जिल्हा बँकेच्या विरोधातील सोमवारी (दि. १२ ऑगस्ट) आयोजित केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे पाटील व उपाध्यक्ष विजयराव दंडवते पाटील यांनी दिली. श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२०२५ या हंगामाकरिता कर्ज मागणीचा प्रस्ताव जिल्हा सहकारी बँकेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हा बँकेने राजकिय आकसापोटी नाकारला. मागील हंगामातही ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते, ते मात्र शेवटच्या क्षणी नाकारले होते. याही वेळी कारखान्याने प्रस्ताव दाखल केला, तो नाकारला.…
विद्यार्थ्यांची आंदोलनं चिरडण्यासाठी लोकभावनेचा अनादर करायचा, विरोधकांना तुरुंगात डांबून ठेवायचं, सोशल मिडियावर निर्बंध घालायचे, इंटरनेटवर बंदी आणून जाणून घेण्याचा मार्ग रोखायचा आणि ज्यांनी आवाज उठवायचा त्या मिडियाला हाताशी घेऊन ती एकतर्फी कार्यरत राहील, आपले गुणगाण करेल असे मार्ग अवलंबल्याचा फटका म्हणजे आजची बांगलादेशची स्थिती होय. युनूस यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा दुसर्या बाजूने विचार केला तर भारतात याहून वेगळं काही घडतं असं नाही. बांगलादेशमध्ये खासगीकरणाला नको इतकं महत्व दिल्याने सरकारी नोकर्या राहिल्या नाहीत. खासगी उद्योगांमध्ये आरक्षण हा मुद्दाच नसल्याने तिथे दाद मागायचा अधिकार राहिला नाही. भारतात याहून वेगळं काय सुरू आहे? भारतापासून फुटून निघालेल्या पाकिस्तान या देशाची इंदिराजींच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रसंगी…
★ शिवसेना भगवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक म्हणतात… होय, आम्ही फक्त साहेबांचाच आदेश मानतो…! ★ राज्यात सर्वत्र भगवा सप्ताह आयोजनाच्या बैठका सुरू असताना संगमनेरात अद्यापही शांतता ★ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अखेर शिवसैनिक सरसावले शनिवार, १० ऑगस्ट | संगमनेर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत राज्यात भगवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यात भगवा सप्ताहाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठकांनी वेग घेतला असताना संगमनेरात मात्र अद्यापही शांतता दिसत आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. भगवा सप्ताह काळात विविध सामाजिक उपक्रमाचे…
शनिवार, १० ऑगस्ट शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी तीन गॅस रिपेरिंग सेंटरवर छापे टाकले. या दोन्ही ठिकाणाहून भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन गॅसच्या घरगुती वापराच्या टाक्यांसह, एक मारुती ओमनी कार, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे पंधरा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरातील अलकानगर परिसरात हावडा ब्रिजच्या पाठीमागे एका लोखंडी टपरीमध्ये व जोर्वे नाका या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत मोहसीन रफिक शेख, वय ३५ वर्ष, इम्रान रऊफ शेख वय ३८ वर्ष, व इम्तियाज रफिक शेख (तिघे रा. अलकानगर, संगमनेर) या तिघांवर तर दुसऱ्या कारवाईत सोहेल शकील शेख वय ३४ वर्ष, रा.…
शनिवार, १० ऑगस्ट अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची शुक्रवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील तब्बल सात लाख आठ हजार महिलांचे अर्ज आले असून त्यापैकी २५ हजार महिलांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे या संकेत मोठ्या संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत. दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास २५ हजार अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून या सर्वांना योजनेचा फायदा घेण्यासाठी नव्याने अर्ज भरावे लागणार आहे. त्यानंतर या अर्जांची पुर्नपडताळणी केली जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांची संख्या…
शनिवार, १० ऑगस्ट मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे सोमवारी नगर शहरात शांतता रॅली काढणार असल्याने या रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून तसे परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. जरांगे यांच्या शांतता रॅली वेळी होणाऱ्या गर्दीचा विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संयुक्तपणे नगर शहर व उपनगरातील शाळांना पाठविले. जरांगे सोमवारी पुण्याहून नगर मध्ये येत आहे. यावेळी केडगाव उपनगरात त्यांचे स्वागत करण्यात येणार असून तेथून माळीवाडा, बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला…
शनिवार, १० ऑगस्ट मुंबईतील दोघा व्यावसायिकांनी अहमदनगरमधील एका व्यावसायिकाची ७५ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीतून पाठविलेल्या प्लायवूड आणि पार्टिकल बोर्डच्या मालाचे पैसे न देता ही फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात नगरमधील व्यावसायिक सुरेंद्र मोतीलाल लोढा (रा. माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटल मागे, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीकिसन भट्टड आणि ब्रिजेश भट्टड (पूर्ण नाव माहित नाही दोघे रा. १०४, बालाजी भवन, नरिमन पॉईंट, मुंबई) अशी फसवणूक करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या मुंबईतील व्यावसायिकांची नावे आहे. लोढा यांचे एस. मोतीलाल इंडस्ट्रीज नावाची कंपनी…
शनिवार, १० ऑगस्ट लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण शरद पवार यांच्यावर काही बोलू नये, अशी विनंती पुण्यात केली होती, पण मोदींनी प्रचार सभेत शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका महायुतीला बसला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थित त्यांना निवडणुकीवेळी घडलेला हा किस्सा सांगितला. बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत चर्चा झाली. एका विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून महायुतीच्या…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. राज ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली होती. त्यानंतर, राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये संवादही झाल्याचं पाहायला मिळालं. आता, हिंगोलीतून राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला असता, शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट संगमनेर – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान महसूल मंत्री यांनी संगमनेरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांच्या वितरणाचा कार्यक्रम ठेवला. मात्र या कार्यक्रमात लाभार्थी आणि नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली, कार्यक्रमाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक करून कार्यक्रम करणे चुकीचे असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे याबाबत पत्रकाद्वारे दिवटे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेच्या असतात. सरकार हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसते. मात्र अहमदनगर जिल्ह्यात संपूर्णपणे चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. पालकमंत्र्याच्या नावाखाली भाजपचे काही कार्यकर्ते संगमनेरमध्ये दमदाटी करत आहेत. अशा वर्तनामुळे महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला लाभार्थी व नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली असल्याचे म्हटले आहे. काही…
शुक्रवार, ९ ऑगस्ट चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावात झालेल्या वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. भूषण कांताराम वाळे (वय २३, रा. झोळे, ता. संगमनेर) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी झारखंड कनेक्शन समोर आले आहे. ५ ऑगस्टला सकाळी झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७ वर्ष) यांची झोपेत अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याने त्यांचा मृतदेह पहाटेच्या वेळी आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट मुंबई : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे म्हणत संत तुकारामांनी वृक्षवल्लींचे महत्त्व साऱ्या जगाला कित्येक वर्षापूर्वी कथन केले होते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेत झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे, मात्र काही जण विनापरवाना वृक्षतोड करतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून बदलत्या हवामानाला प्रचंड होणारी वृक्षतोडही कारणीभूत आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यास आता ५० हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरित आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४’ अन्वये १ हजार…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा सेनेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) व ३७(३) नुसार १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे किंवा जमा करणे. कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आरोप पत्र दाखल झाल्यानंतर पहिल्याच तारखेला आरोपी भाऊसाहेब कुटेने न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतानाच माझ्याविरुद्ध सक्षम पुरावा नसल्याने मला आरोपातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही अर्जांवर न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मागविले आहे. दरम्यान गुरुवारी (८ ऑगस्ट) न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाऊसाहेब गुंजाळ व भाऊसाहेब कुटे या दोघांसह लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते व अमोल प्रकाश क्षीरसागर हे आरोपी न्यायालयात उपस्थित होते. भाऊसाहेब कुटेच्यावतीने न्यायालयात ॲड. राहुल जामदार यांनी वकीलपत्र दाखल केले असून आरोपीला नियमित जामीन मिळावा तसेच फौजदारी…
