Author: Annant Ppangarkar
मुंबई | प्रवीण पुरो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दूध भावाच्या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ‘रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’ असा हरीनाम गजर करत महायुतीच्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शन करताना पाहायला मिळाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. “दूध भुकटी…
गुरुवार ४ जुलै महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता मोरे यांनी आंबेडकरांचीही साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ठाकरे गटाकडून मोरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. https://x.com/vasantmore88/status/1808791238285668776?s=19 पुण्याच्या मोरे यांनी इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले आता तेथून खाली उतरत मशाल हाती घेण्याचा नवा राजकीय निर्णय मोरे यांनी घेतला आहे. राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली.…
गुरुवार ४ जुलै संगमनेरमधील प्रख्यात उद्योजक राजेश मालपाणी असल्याचे भासत फोनवरून अज्ञात आरोपीने तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नव्याने बदललेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारासंदर्भात राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी साडेनऊ वाजता मालपाणी हाऊस मध्ये असताना अज्ञात व्यक्तीने एका मोबाईल क्रमांकावरून दुबे यांना फोन करत फोनवर राजेश मालपाणी असल्याचे भासवत तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगितले.…
गुरुवार ४ जुलै काँग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. नागपूर सहकारी जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांच्या शिक्षेला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे केदार आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्यात सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही…
गुरुवार ४ जुलै गेल्या पावसाळी अधिवेशनात नासिक मुंबई मार्गाच्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकल्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ३१ मार्चपूर्वी या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ३१ मार्च उलटून गेल्यानंतर देखील या मार्गाची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक भीषण झाल्याचे वास्तव थोरात यांनी आज पुन्हा सभागृहात मांडल्याने सरकारचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून आले. थोरात यांनी गुरुवारी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय पुन्हा एकदा सभागृहासमोर मांडला. यासाठी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा देखील दाखला दिला. ते म्हणाले, पूर्वी या रस्त्याने मुंबईला येण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागत होता. आता तो सहा ते आठ तासांवर गेला आहे. मागील वर्षी पावसाळी…
गुरुवार, ४ जुलै राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (६ जुलै) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली. बैठकीमध्ये ८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) मार्चअखेर खर्चास मान्यता, सन २०२४-२५ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) व जुनअखेरच्या खर्चाचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
गुरुवार, ४ जुलै भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री ९ वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती…
योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत बुधवार, ०३ जुलै ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील…
सध्याच्या जागेवर होणार शहीद स्मारक बुधवार, ३ जुलै गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ठरलेला आणि संगमनेरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बस स्थानकासमोर उभारणीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. राज्यात हायटेक ठरलेल्या बस स्थानकासमोर निर्माण होणाऱ्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे संगमनेरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे, असे देखील तांबे म्हणाले. तांबे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेरमधील बस स्थानकासमोर व्हावा ही तमाम संगमनेरकरांची मागणी होती. यानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सातत्याने…
बुधवार, ३ जुलै अनेकदा संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केल्यानंतर भेसळखोरीचा आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीला त्यांची संघटना तत्परतेने धावली आहे. आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या खुलाश्या अगोदरच संघटना व्यापाऱ्यांना ‘क्लीन’ सर्टिफिकेट देऊन मोकळी झाली. याशिवाय असोसिएशनने माध्यमांवर देखील या तेल व्यापाऱ्यांचा अपप्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांच्या खाद्य तेलाची पुण्यातील एका नामांकित लॅब मध्ये तपासणी केल्यानंतर खाद्यतेलात भेसळ असल्याचे…
मंगळवार, २ जुलै अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. उपसभापतींनी घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी आणि मनमानी असून विरोधी पक्ष नेत्यांना एका कटाचा भाग म्हणून निलंबित करण्यात आल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सोमवारी गदारोळ झाला. अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवे यांनी माफी मागावी, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी लाड यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी देखील दानवे यांच्या निलंबनाची मागणी सभागृहात केली होती. त्यानंतर उपसभापती नीलम…
मंगळवार, २ जुलै | अनंत पांगारकर संगमनेरमधील तीन खाद्यतेल कंपन्यातील खाद्यतेल भेसळीचे प्रकरण समोर आले असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये किराणा दुकानांवर छापेमारी करत खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मधील बस स्थानक परिसरातील किराणा दुकान तसेच घुलेवाडी परिसरातील एका किराणा शॉपी मधून या तेल विक्रेत्यांकडून विक्रीसाठी बाजारात आलेल्या तेलाच्या नमुन्याची तपासणी सुरू केली असून उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा यांच्याकडून निर्मिती केल्या जात असलेल्या…
मंगळवार, २ जुलै पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये दानवे यांनी लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली, असा आरोप भारतीय जनता पार्टीने करत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. भाजपकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर…
मंगळवार, २ जुलै राज्यातील महिलांना दिलासा देताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने “मुख्यमंत्री – बहिण माझी लाडकी”योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सतराशे साठ अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर ही योजना नाही ना? असा प्रश्न संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. राज्यभरातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी, तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार १८…
शनिवार २९ जून नगर जिल्ह्यातील पोलीस, पोलिसांची पथके यांच्या सततच्या हप्तेखोरीमुळे संगमनेर शहरातले आणि तालुक्यातले मटका अड्डे बंद करण्यात आले असल्याची राळ उठवत छुप्या पद्धतीने आणि मोबाईल ॲपद्वारे साधारण महिनाभर मटका सुरू ठेवल्यानंतर शनिवारपासून नव्या जोमाने धुमधडाक्यात संगमनेर शहर आणि तालुक्यात मटक्याच्या पेढ्या आणि अड्डे सुरू झाले आहेत. पोलीस आणि संगमनेरातल्या मटका किंगमध्ये पुन्हा जुळवाजुळव झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साधारण महिना भरापूर्वी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आणि एक नंबरचा अवैध धंदा असणाऱ्या काही मटका चालकांकडून पोलीस आणि पोलीस पथकांच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचामुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती. मटका बंद…
मंगळवार, २ जुलै नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲड. महेंद्र भावसार यांचा पराभव केला. कोल्हे दुसऱ्या स्थानी राहिले. दराडे (शिवसेना) यांना तिसऱ्या फेरी अखेर २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून ३२ हजार…
हृदयविकार, कॅन्सर, मूत्रविकार, मेंदू व मनकेविकार शस्रक्रिया पूर्णपणे मोफत तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे मोफत शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया अल्पदरात उपलब्ध सोमवार, ०१ जुलै राज्यात सर्वात मोठ्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच सर्वसामान्य दर्जेदार उपचार मिळावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य साधना शिबिरास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शुभारंभ करत आज एसएमबीटीमध्ये सुरुवात झाली. शिबिरात बाह्य रुग्ण तपासणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हृदय उपचार, खुबा व गुडघा प्रत्यारोपण, सिझेरियन व नॉर्मल प्रसूती पूर्णतः मोफत करण्यात आली. याशिवाय तीन दिवस औषधोपचारासह बाह्य रुग्ण तपासणी देखील मोफत केली जाणार असून राज्यातील सर्वात मोठ्या या आरोग्य शिबिरात सलग तीन महिने…
सोमवार, १ जुलै विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज पाच नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही यात समावेश आहे. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कोणाला संधी द्यावयाची याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू होते. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक इच्छुकांची नावे देखील समोर आली होती. मात्र पक्षात वारंवार डावलले जात असल्याने नाराज असलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील यात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आग्रही मागणी केली जात होती.…
मागणी अयोग्य असेल, लॅबचे रिपोर्ट चुकीचे असतील तर माझ्यासह लॅबवर गुन्हा दाखल करा श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांना पाठीशी कोण घालतंय? सोमवार १ जुलै संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध अनेकदा तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केले आहे. संगमनेरमध्ये खाद्य तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने हे तेल खाण्यास अयोग्य आहे. आर्थिक फायद्यासाठी स्वतःची संपत्ती वाढविण्यासाठी लोकांचे जीव गेले तरी चालतील अशा वृत्तीने येथील व्यापारी खाद्य तेलात भेसळ…
३० टेबलवर होणार मतमोजणी, अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण रविवार, ३० जून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. १ जुलैला केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणीच्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदामात ३० टेबलवर होणार आहे. मतमोजणी केंद्राची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. तसेच मतमोजणी संदर्भातील आवश्यक सूचना त्यांनी यावेळी संबंधित…
