Author: Annant Ppangarkar

मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 12 हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाच्या सुजय विखे यांना विजयापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) निलेश लंके निकराचा लढा देत आहे. विखे यांनी घेतलेले मताधिक्य तोडण्याच्या दिशेने लंके मतमोजणी पुढे जाताना दिसत आहे. विखे यांचे मताधिक्य घटना ते आता 2457 वर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारात चुरशीचा सामना असल्याचे समोर येत आहे. या मतदारसंघाचा खासदार विखे की लंके हे निवडणूक निकालानंतर समोर येणार असले तरी सध्या सुरू असलेल्या मतमोजणीने दोन्ही प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Read More

मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेग घेत असून या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे भाजपच डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहे. अहमदनगर मधून डॉक्टर सुजय विखे पाटील 12624 तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे 28191 मतांनी आघाडीवर आहे. शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)

Read More

मंगळवार दिनांक ४ जून  अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सुरुवातीपासूनच सुरूच दिसत असून या मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी 9733 मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे…. (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)

Read More

मंगळवार दिनांक ४ जून  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवारांपेक्षा पुढे आहे. तर सत्ताधारी महायुतीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. १ जागेवर काँग्रेस पुढे आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राज्यातील मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातून महाविकास आघाडीला मोठे यश मिळवताना दिसत आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. हजार पाचशे मतांच्या फरकाने काही ठिकाणी उमेदवार झुंज देत असून काही ठिकाणी ५० हजाराच्या पुढे मताधिक्य मिळाले आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या जागांमध्ये मोठी वाढ होताना दिसत असतानाच दुसरीकडे महायुतीतील मित्र…

Read More

मंगळवार दिनांक ४ जून  शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू असून शिर्डीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे १७३८४ मतांनी आघाडीवर असून त्यांना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना शिंदे गट सदाशिव लोखंडे यांच्यासह प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे…. (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)

Read More

मंगळवार, दि. ४ जून गेल्या काही दिवसापासून लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली आहे. मतमोजणीनंतर देशात सत्ता कोणाची हे स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीमध्ये तर, देशात इंडिया व सत्ताधारी एनडीएमध्ये लढत झाली. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर त्या त्या मतदारसंघात राज्यात आणि देशात कोणाचे वारे होते याविषयी मतदारात चर्चा सुरू होती. दरम्यान देशातील सातवे टप्प्याचे मतदान संपल्यानंतर पाठोपाठ विविध सर्वेक्षणाचे एक्झिट पोल समोर आले. आज मात्र या एक्झिट पोलसह सर्वच उमेदवारांचे परीक्षा होणार असून त्याचे निकाले लगेच समोर येणार आहेत. एक्झिट पोल किती खरे किती…

Read More

सोमवार, दि. ३ जून मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून दोन दिवसांसाठी व्हाट्सअप ग्रुपचे सेटिंग ‘Only admin’ करण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने काढली असून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवर देखील कारवाई केली जाणार आहे. भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या नेत्यांवर विविध प्रकारे खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील अशा टीकाटिप्पणीतून वाद उद्भवल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

Read More

सोमवार, दि. ३ जून नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र एकनाथराव विखे पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात आता एकूण पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या मतदारसंघात वेगळी लढत करण्याचे संकेत दिले. कोल्हे यांच्यासह आता भाजपाच्या महसूलमंत्र्यांच्या बंधूंनी अपक्ष दाखल केलेल्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सोमवारी भाजपने नाशिक वगळता उर्वरित तीनही विधानपरिषद मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले असताना या मतदारसंघात आता महायुतीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल. कोल्हे-विखे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे…

Read More

सोमवार, दि. ३ जून पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल २ कोटी २० लाख रुपये किमतीचा ८८३ किलो गांजा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकद्वारे ओरिसा राज्यातून हा गांजा महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. देशभरात गांजा विक्रीला बंदी असली तरी सर्वत्र मुबलक गांजा मिळत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसते. गांजाची राज्यात मोठी बाजारपेठ असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आता पकडलेला गांजा महाराष्ट्रात कोठे वितरित होणार होता याचा देखील शोध पथकाला घ्यावा लागणार आहे. ओरिसा येथून एका आयशर ट्रकद्वारे हा गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर पुणे सीमा शुल्क विभागाच्या एका…

Read More

सोमवार, दि. ३ जून (अनंत पांगारकर) लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून उद्या मंगळवारी देशभरात मतमोजणी होत आहे. ही रणधुमाळी आटोपत असतानाच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत असून नाशिक वगळता उर्वरित तीन मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार सोमवारी जाहीर केले. ट्विस्ट… कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाअखेर नासिक पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट बघायला मिळत असताना नाशिक वगळता उर्वरित तीन जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. यांना संधी… कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाने…

Read More

विशेष लेख ★★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★★ तो उगवतो आणि अंधाराला हटवतो. उगवताना सौम्य, दुपारी प्रखर तेजाने, जगाला लख्ख करून टाकतो,  तो एक सूर्य ह्या जगती असतो. असाच एक क्रांतिसूर्य,  त्याचे जन्मामुळे आणि कार्य कर्तृत्वामुळे  दुःखाचा अंधार बाजुला सारून  सुखाचा प्रकाश दारात आला. अनाथाचे “नाथ ” बनून, दीनदुबळ्यांचा उत्कर्ष केला. महान नेत्यांचे कार्याची आठवण म्हणून कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा.  गोपीनाथ मुंडे साहेबांचा जन्म नाथ्रा गावी परळी तालुक्यात बीड जिल्ह्यात १२ डिसेंबर १९४९ साली पांडूरंग मुंडे आणी लिंम्बाबाई मुंडे या वारकरी आणि अध्यात्मावर प्रेम असणाऱ्या दांपत्याच्या पोटी झाला. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी अंबेजोगाई येथे घेतले. साहेबांनी पुढे कायद्याचे शिक्षण पुणे येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत…

Read More

सोमवार, दि. ३ जून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करीत असताना सर्वप्रथम पोस्टाने आलेल्या मतांची (पोस्टल बॅलेट्स) मोजणी केली जावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे केली. आघाडीच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मागील काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. पोस्टल बॅलेट हे निकालात महत्वाची भूमिका बजावत असतात. पोस्टल बॅलेटची सर्वप्रथम मोजणी केली जावी, हा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे चार तारखेला निकालादरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोस्टल बॅलेटची आधी मोजणी करण्याचा मुद्दा आयोगाने त्यांच्या…

Read More

सोमवार, दि. ३ जून  परमपूज्य आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य जिन शासन गौरव परमपूज्य सुनंदाजी म. सा. यांच्या प्रेरणेने आश्वी येथील सुशील भंडारी यांची इंजिनीयर कन्या मुमुक्षु कु. प्रतीक्षा ही जैन भगवती दीक्षा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्हमविजाप्रणेता उपाध्याय प्रवर प. पू. श्री. प्रवीणऋषीजी म. सा., प्रखर व्याख्याता प. पू. लोकेशऋषीजी म. सा., मधुरकंठी आतापणा साधक प. पू. तीर्थेशऋषिजी म. सा., उपप्रवर्तिनी साध्वीरत्ना प. पू. संन्मतिजी म. सा., वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा., कैवल्यधाम प्रेरक प. पू. कैवल्यरत्नाश्रीजी म. सा., स्वाध्याय प्रेमी प. पू. श्री प्रियदर्शनाची म. सा., मधुरव्याख्याता प. पू. विश्वदर्शनाची म.…

Read More

रविवार, दि. २ जून शिर्डीतील सागर शेजवळ हत्याप्रकरणी कोपरगाव सब जेलमध्ये असलेला आरोपी रुग्णालयात घेताना पोलीस कर्मचाऱ्याला चकवा देत पसार झाल्याचे घटना रविवारी पहाटे घडली. योगेश सर्जेराव पारधे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिर्डी येथील २०१५ मध्ये झालेल्या सागर शेजवळ हत्याकांडातील नऊ आरोपीपैकी एक आरोपी योगेश पारधे हा कोपरगाव कारागृहात आहे. पारधे याला शनिवारी रात्री रक्ताच्या उलट्या झाल्याने कारागृहातून त्याला पोलीस हेड कॉन्स्टेबल ढाकणे आपल्या दुचाकीवरून मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. तहसील कार्यालयाच्या आसपास ते आले असता एका वळणावर दुचाकीचा वेग कमी झाल्याची संधी साधून आरोपी पारधे याने पोलीस कर्मचारी ढाकणे यांना चकवा देत पळ काढला.…

Read More

रविवार, दि. २ जून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाचे नाव न येण्याकरिता २० हजार रुपयांची मागणी करत १२ हजार रुपयाची लाच घेतांना श्रीरामपूर पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॅान्स्टेबल रघुनाथ खेडकर व खासगी इसम राजू शामकुमार श्रीवास्तव एसीबीच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ आश्रुबा खेडकर (वय-५५ वर्षे, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, ह.रा. पोलीस वसाहत, घुलेवाडी, संगमनेर जि. अहमदनगर मु. रा. चिंचपूर इजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर) व खासगी इसम राजू शामकुमार श्रीवास्तव (वय-४६ वर्षे, धंदा- चहाची टपरी, रा. के. व्हि. रोड, भैय्या गल्ली, श्रीरामपूर ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) या दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री…

Read More

रविवार, दि. २ जून भाजप खासदार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या या गोळीबारातून खासदार यादव सुखरूप बचावले आहेत. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार व विद्यमान खासदार रामकृपा यादव यांच्यातर्फेवर गोळीबार करण्यात आल्याची घटना मसौढी येथील कणेरी परिसरात घडली. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात झाली आहे. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रामकृपाल यादव व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांच्या कन्या मिसा भारती यांच्यात लढत झाली. गतवेळच्या निवडणुकीत यादव यांनी मिसा भारती यांचा पराभव केला होता. दरम्यान या प्रकरणी एसआयटीकडे तपास सोपविण्यात आला असून एसआयटीने…

Read More

          हिंदीमध्ये एक चांगली म्हण आहे, सौ चुवे खाके बिल्ली चली हज… या उक्तीला साजेसं वर्तन आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींचं सुरू आहे. सारी पापं धुवून काढणारं ध्यान साधनेचं अध्यात्मिक तंत्र त्यांनी अंगिकारलं आहे. डोळ्यावर चष्मा आणि शेकडो कॅमेरामनच्या साक्षीने त्यांनी ध्यानाला सुरूवात केली आणि ४५ तासात ती संपलीही. या अध्यात्मिक तंत्राचा लोकांच्या मनावर बसेल असा उपयोग त्यांनी करून घेतला. लोकसभा निवडणुकीचा आपल्या सोयीचा सातवा टप्पा पार पडण्याआधी मोदी ध्यानसाधनेत मंत्रमुग्ध झाले. ‘नयनेन्ं यत्रम्ं…’ असल्या बेफिकीर आणि अश्‍लाघ्य अशा स्वत:च बनवलेल्या संस्कृत श्‍लोकाचा आधार घेत लोकांना वेडं बनवणार्‍या आपल्या पंतप्रधानाला सत्ता प्रचंड प्यारी आहे. सत्तेसाठी कोणताही मार्ग…

Read More

शनिवार, दि. १ जून  देशभरातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ४ जून) होत आहे. नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेची मतमोजणी अहमदनगरच्या एमआयडीसीमधील (नागापूर) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून होत आहे. या मतमोजणीसाठी सुमारे १,५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.३ मध्ये होणार आहे. अशी आहे तयारी… एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल – अहमदनगर लोकसभा मतदार…

Read More

शनिवार, दि. १ जून  नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या ऐवजी आता ॲड. संदीप गुळवे ठाकरे गटाचे उमेदवार असतील. काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव काँग्रेस नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेने नाशिक मतदार संघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांचा पत्ता कट करत आपला उमेदवार जाहीर केला. गुळवे आता…

Read More

शनिवार, दि. १ जून  ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून सर्व परिचित झालेल्या, आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक भूमिका साकारणाऱ्या लोक कलावंत प्रभा शिवणेकर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच शुक्रवारी (दि. ३१ मे) त्यांची प्राणज्योत मालवली. अविवाहित असलेल्या प्रभा शिवणेकर आपल्या बहीण व भावांबरोबर राहायच्या. त्यांच्या भावंडांनीच त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. ‘गाढवाचे लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या नाटकाला केंद्र सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. संगीत नाट्य अकादमीने त्यांना १९७४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित…

Read More