Author: Annant Ppangarkar

सोमवार, ०८ जुलै नुकतेच संगमनेरच्या स्थानिक वृत्तपत्रात बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबद वृत्त प्रसिद्ध झाले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपये मंजूर केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी वृत्तपत्रांना माहिती दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याबरोबरच छत्रपती शिवरांयाच्या स्मारकासाठी एसटी महामंडळाच्या जागेला माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. याचे सर्व श्रेय संबंधितांनी माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. स्मारकाची संकल्पना हीच मुळात माननीय पालकमंत्र्यांची आहे तेव्हा इतरांनी श्रेय घेऊ नये असेही पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.  तर दुसरीकडे संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी देखील या पूर्णाकृती स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न केल्याचा…

Read More

सोमवार, ०८ जुलै  अहमदनगर जिल्ह्यात आज व उद्या (दिनांक ८, ९ जुलै) दुजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने केले हे आवाहन …  मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब,…

Read More

सोमवार, ०८ जुलै हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य…

Read More

सोमवार, ०८ जुलै आई आणि पत्नीच्या कर्ज थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटता परत आल्याने दाखल असलेल्या खटल्यात श्याम दिगंबर मयूर (रा. मयूर ज्वेलर्स, संगमनेर) या आरोपीला संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक वर्ष साध्या कारावासाची आणि १० लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. अधिक माहिती अशी, आरोपी श्याम दिगंबर मयूर यांची आई वत्सलाबाई दिगंबर मयूर आणि पत्नी संगीता शाम मयूर यांनी संगमनेर शहरातील गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेकडून प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीसाठी २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी आरोपी शाम मयूर हा जामीनदार होता. कर्जदार कर्जाची रक्कम भरण्यात अपयशी ठरल्याने ते संस्थेत थकबाकीदार…

Read More

सोमवार, ०८ जुलै आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य दादा! पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजनेअंतर्गत आम्हाला तू दर महिन्याला १५००/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. या बदल्यात तू … गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर. जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईतपण तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा-भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे‌ सगळ्याना…

Read More

सोमवार, ०८ जुलै शीतपेयाच्या खरेदीपोटी व्यापाऱ्याला दिलेले चार चेक न वटल्याने तसेच मागणी करूनही आरोपीने पैसे न दिल्यामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या संगमनेर न्यायालयातील चार वेगवेगळ्या खटल्यात न्यायालयाने आरोपीला मोठी शिक्षा ठोठावली आहे. रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश गिरीश देशमुख यांच्या न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला. आरोपी रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून पेप्सी, पेप्सी कोला इत्यादी पेये विक्रीसाठी खरेदी केले होते. या खरेदी पोटी त्याने कल्याणकर यांना प्रत्येकी ५० हजार, ६० हजार, ५२,६०५, ६० हजार रुपयांचे असे चार चेक दिले होते. मात्र कल्याणकर…

Read More

सोमवार, ०८ जुलै आपल्या शुद्ध आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अद्ययावत असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटतर्फे बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवारी (८ जुलै) होणार असून सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत बालकांना सुवर्णप्राशन संस्कार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या बालकांना मोफत सुवर्णप्राशन करण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सिन्नर-घोटी रस्त्यावर धामणगाव येथे एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे आणि तज्ज्ञ चिकित्सक असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाकडून मोफत सुवर्णप्राशन व विशेष आयुर्वेद चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी…

Read More

रविवार ७ जुलै | अनंत पांगारकर  पोलीस उपअधीक्षक, प्रांत अधिकारी कार्यालय, संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि दारूबंदी विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील शक्तिमान टॉवर्समध्ये अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात गंभीर घटना घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरला अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेने अवैध धंद्यांचा कलंक लागला आहे. शहरातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या एजंट मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण नात्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विविध विकास कामे, मोठी बाजारपेठ आणि सहकारी…

Read More

रविवार, ०७ जुलै  १६ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते. २००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिराळा तालुक्यात काही ठिकाणी हिंसक वळण…

Read More

रविवार, ०७ जुलै दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी यथायोग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले. राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खाजगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल, याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे. मात्र राज्यातील…

Read More

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या दोन महत्वाच्या भाषणांवरचं देशाचं लक्ष आजही सरत नाहीए. त्यात एक होतं ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं तर दुसरं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. या दोन भाषणांची तुलना करायची तर एक झकास आणि दुसरं भकास, असंच म्हणता येईल. संसदीय कार्यपध्दतीत सरकारवर होणार्‍या आरोपांना मुद्देसूद उत्तरं देणं ही उत्तर देणार्‍याची जबाबदारी असते. ती त्याने पार न पाडली तर संसदीय प्रणालीला ते मारक मानलं जातं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून संसदीय कार्यपध्दतीचा पुरता हिरमोड झाला आहेच. लोकसभेतील विरोधी पक्ष खासदारांची संख्या अगदीच मर्यादित झाल्याचा फायदा घेत मोदींच्या सरकारने नको…

Read More

शनिवार, ०६ जुलै  जिल्ह्याच्या विकासाचे सातत्य टिकवून ठेवताना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक विकास कामे करण्याचे व विकास कामांमध्ये अधिक गतिमानता आणण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणांचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री विखे यांनी हे निर्देश दिले. यावेळी सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई राज्याची राजधानी असलेली मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली जात असल्याचा गंभीर आरोप व मुंबईला अदानीपासून वाचवा. तसेच जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमापुढे केला. विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी अदानी कंपनीला मुंबई विकली जात असल्याचा आरोप केला. अदानी पूर्ण मुंबई गिळंकृत करीत असताना अदानीला राज्याचे प्रमुख पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपाचे नेते याविरोधात सांगत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.…

Read More

शनिवार, ०६ जुलै  संजय गांधी निराधार योजनेचे जून महिना अखेर पर्यंतचे २ कोटी ४८ लाख ०४ हजार ८०० रुपयांचे अनुदान शनिवारी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. असे आहे अनुदानाचे वाटप –  संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्याना ७७ लाख ७६ हजार ६०० रुपये जून महिन्याचे अनुसूचित जातीसाठीचे ५६२ लाभार्थ्याना ८ लाख ३५ हजार २०० रुपये एप्रिल, मे आणि जून महिन्याचे अनुसूचित जमातीसाठीचे २२६ लाभार्थ्यांना १० लाख ०८ हजार रुपये जूनचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनत सर्वसाधारण ५३११ लाभार्थ्यांना ७९ लाख ६६ हजार…

Read More

शनिवार ६ जुलै  फायनान्स कंपनीकडे वारंवार केल्या जात असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांना त्या दृष्टीने तपास करावा लागणार आहे. दरम्यान या संदर्भात आश्वी (संगमनेर) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण फायनान्स कंपनीला वारंवार पैसे दिले मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचारी आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे या मागणीला कंटाळून आपण आत्महत्या करत…

Read More

प्रवीण पूरो / मुंबई विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि नंतर विधानभवन येथे सत्कार केला. राज्य सरकारच्यावतीने भारतीय टीमला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाशे कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तब्बल ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज…

Read More

शनिवार ६ जुलै  खरीप हंगामातील पर्जन्यमान चांगले झाले असल्याने जिल्ह्यातील सर्व भागात पेरण्यांची कामे पूर्णत्वास जात आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असून खतांची मागणी जास्त असल्याचे पाहून काही खत कंपन्या आणि विक्रेते हे एका खतासोबत दुसरे खत किंवा औषधे घेण्याची शक्ती शेतकऱ्यांना करत आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राजस्व सभागृहामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील खत विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे,…

Read More

प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन शुक्रवार ५ जुलै थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ शनिवारी ६ जुलैपासून करण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आयोजित १८ व्या दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ…

Read More

गुरुवार, ५ जून  संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून सुविधा निर्माण करून दिली असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. इंद्रजीत थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सहा वर्षाच्या कृषीमंत्री पदाच्या काळात अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या असून याच कालावधीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक शेती उत्पन्न करणारे राज्य ठरले होते. कृषी विद्यापीठ बांधावर, महापीक अभियान, मागेल त्याला शेततळे, शिवार फेरी असे अनेक उपक्रम आमदार थोरात यांच्या कार्यकाळात राबवले गेले. शेती संबंधीच्या…

Read More

शुक्रवार, ५ जुलै  कर्जाच्या हप्त्यापोटी बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या धनादेशावरील रकमेत फेरफार करून धनादेशाची रक्कम स्वतःच्या खात्यावर गोठवून घेतल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली असून सोबत बावीस हजार रुपयांचा दंडही सुनावला. अजिज महंमद शेख (रा. महात्मानगर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली. याबाबत अधिक माहिती अशी, राधाकिसन धीरुराम धांजल (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी टाटा फायनान्सचे कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी आरोपी शेख यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या पंचवटी शाखेचे ३३ धनादेश तयार करण्यास सांगितले होते.…

Read More