Author: Annant Ppangarkar

शनिवार, दि. १८ मे दुचाकीसह दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला भंडावून सोडले असतानाच ११२ क्रमांकावर आलेल्या फोनच्या माध्यमातून संगमनेर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागले. टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी सहा जण मात्र पळून गेले आहे. संगमनेरच्या आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानोडी ते वरवंडी दरम्यान असलेल्या घाटात एम.एच. १७ सी.व्ही. १०८४ या क्रमांकाचा मालवाहू टेम्पो आणि त्यात असलेल्या नऊ लोकांकडे लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर असे साहित्य असून…

Read More

शनिवार, दि. १८ मे  डॉ. ऋषिकेश मालाणी यांचा विद्यावाचस्पती प्रबंध आता ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध झाला असून ही पुस्तक रूपातील प्रबंधाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. डॉ. मालाणी संगमनेरमधील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे कार्यरत आहे. त्यांनी अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्रातील नागरी पतसंस्था व सहकारी संस्थांच्या समस्या व संभावनांचा विस्तारित अभ्यास करून विद्यावाचस्पती प्राप्त केली आहे. या प्रबंधाचे आता ई-पुस्तक रूपात प्रकाशन करण्यात आले. हे ई-पुस्तक अमेझॉन आणि पोती या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यांच्या या शोधनिबंधाचा बँकिंग प्रणाली व सहकारी पतसंस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल नवयुवकांना फायदा होणार आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. मुळे संचालक…

Read More

शनिवार, दि. १८ मे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी आठ दिवसानंतर राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ८ मे रोजी संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे राऊत यांच्याविरुद्ध अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय होती घटना… नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी ८ मे रोजी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती.…

Read More

दाखल गुन्ह्यात सर्रासपणे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केली जाते लाचेची मागणी दाखल गुन्ह्यांचा तपास होणार तरी कसा लाचखोरांकडून शेपन्नास, हजारावरून लाचेची मागणी आता लाखाच्या, कोटीच्या घरात! शनिवार, दि. १८ मे महावितरणमध्ये नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यावर दाखल असलेल्या मीटर चोरीच्या गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी उपनिरीक्षकाने तक्रारदार आरोपीकडे पाच लाखाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय सर्जेराव शेगर असे या लाचेची मागणी करणाऱ्या, गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली असून अँटी करप्शनकडे…

Read More

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करणाऱ्या व न्यायालयीन कोठडीत असलेल्या संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. यामुळे पंडितचा कोठडीतील मुक्काम वाढला असून पंडित याच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र गांधी आणि सून प्रगती गांधी या दांपत्याचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आर्थिक कर्ज घोटाळाप्रकरणी उद्योजक अमित पंडित गेल्या तीन महिन्यापासून कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पंडित याने २६ मार्चला जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून या…

Read More

संगमनेर, शुक्रवार दि. १७ मे केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (CBSE) जाहीर झालेल्या शालांत परीक्षांच्या निकालात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने शंभर टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये भाविन कटारियाने ९८ टक्के तर, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या पाखी दातीरने ८८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात शाळेतील ३० टक्के मुलांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर ८६ टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रथमेश घुले अतिशय खडतर समजल्या जाणार्‍या जेईई मेन्ससाठी पात्र ठरला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलमधील इयत्ता दहावीच्या भाविन कटारियाने ९८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. आयुष सराफ आणि अदिती लाहोटी यांनी प्रत्येकी…

Read More

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे  संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थे पाठोपाठ आता अहमदनगरमधील ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेडचा मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. ठेवीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून ११२ ठेवीदारांची सुमारे सहा कोटी फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह सात संचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड चा अध्यक्ष विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीरचावडी, माळीवाडा, अहमदनगर) याच्यासह उपाध्यक्ष रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहररोड, सावेडी, अहमदनगर), संचालक सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. अहमदनगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी,…

Read More

शुक्रवार, दि. १७ मे एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरी केलेल्या कारवाईत अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडल आहे. यात एक कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीचा समावेश आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या लाचखोरीच्या या प्रकरणात आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घराची अँटी करप्शन विभागाकडून (ACB) झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड, ९७० ग्रॅम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते…

Read More

गुरुवार, दि. १६ मे  देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यातील निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटात मोठी फूट पडणार असल्याचा भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणूक राज्यात शेवटच्या टप्प्याकडे जात असताना निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. त्यातच कंबोज यांनी समाज माध्यमातून केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडत आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळाला ४ जूनच्या निकालाचे वेध लागण्यापूर्वीच कंबोज यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा…

Read More

गुरुवार, दि. १६ मे बँक अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवत तक्रारदार आणि साक्षीदाराकडे तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक गुन्हे शाखेचा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर आणि व्यापारी कुशाल प्रवीण जैन अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड येथील जिजामाता मल्टीस्टेट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून पोलीस अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. व्यापाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. कुशाल प्रवीण जैन…

Read More

बुधवार, दि. १५ मे शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच घेणारा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) बुधवारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सतीश सुरेश चौधरी (वय ५२ वर्ष, रा. शांतीनगर, नंदुरबार) असे लाचखोर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे नाव असून ते नंदुरबार येथे कार्यरत आहे तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका हद्दीत मालमत्ता क्रमांक ८२६, सिटी सर्वे क्रमांक ६२४, पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नम्रता हॉटेल सुरू करावयाचे असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL३ परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण…

Read More

बुधवार, दि. १५ मे बांधकाम कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या नायब तहसीलदारासह नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविकाचा पती आणि एका व्यापाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या यांचा आहे समावेश… गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी नगरपंचायतीमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीची कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या वडिलांनी गोंदिया लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तेजराम किसन मडावी (वय ६६ वर्ष, नगराध्यक्ष), सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ वर्ष), नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती आश्लेष मनोहर अंबादे (वय ३५…

Read More

मंगळवार, दि. १४ मे  घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत…

Read More

मंगळवार, दि. १४ मे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातील मतदान संपताच मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेत मोठी फूट पडली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील निवडणूक पार पडताच पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफुस समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. पुण्यात महायुतीकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून आहे. निवडणुकी दरम्यानही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत नाराजी होती. मात्र निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये वेगळा मेसेज…

Read More

मंगळवार, दि. १४ मे शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातील दोन अशा चार जागांवर निवडणूक आयोगाकडून १० जूनला निवडणुक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला असून नाशिकसह चारही मतदार संघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहे. ७ जुलै २०२४ रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे, मुंबई विभाग शिक्षक मतदार संघातील आमदार कपिल पाटील यांच्यासह विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा कार्यकाल संपत असल्याने या चारही मतदारसंघात निवडणुकीचा निवडणूक आयोगाने ८ मे रोजी कार्यक्रम जाहीर केला होता. त्याचबरोबर…

Read More

मंगळवार, दि. १४ मे मुंबई : कांदिवली येथे व्यावसायिकाची पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी ६० लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर व्यावसायिकाची सुटका केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी व्यावसायिकाच्या चालकासह तिघांना अटक केली. तक्रारदार बोरिवली येथील रहिवासी असून त्यांचे अंधेरी येथे कार्यालय आहे. बुधवारी ८ मे रोजी काम संपवून मित्रांसह कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. कांदिवली येथे त्यांचा मित्र मोटरगाडीतून उतरला. गाडीचे दरवाजे बंद करण्यापूर्वीच दोन तरुण आले व ते जबरदस्ती गाडीमध्ये बसले. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून मोटरगाडी दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. तेथे व्यावसायिकाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. अखेर व्यावसायिकाने…

Read More

सोमवार, दि. १३ मे  सोमवारी राज्यात अकरा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यात प्रामुख्याने अहमदनगरमध्ये ६१% तर शिर्डीमध्ये ६२% टक्के सरासरी मतदान झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा…

Read More

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राम शिंदे, उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.४% मतदान अहमदनगर लोकसभेसाठी ५.६८% मतदान सोमवार, दि. १३ मे  लोकसभा निवडणुकीसाठी १० राज्यातील ९६ मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ११ जागांचा समावेश आहे. अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.…

Read More

निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा शिर्डी, रविवार दि. १२ मे  निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १ हजार ७०८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने…

Read More

रविवार, दि. १२ मे दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा चार किलोमीटरपर्यंत चक्क वडाची २८४ झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवल, आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण “थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन” असं केलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्कासारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण…

Read More