Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तात्काळ माहिती दिली नाही याचा राग येऊन ग्रामसेवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या आरोपीस संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, तालुका अकोले) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. करंडे गावचे ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे, पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे सर्व ग्रामपंचायत करंडी येथे कार्यालयात दैनंदिन काम पहात होते. रोजगार हमी योजनेचा फेर सर्व्हे करावयाच्या असल्याने कृषी सहाय्यक अनिल फापाळे यांच्यासोबत या सर्वांना जायचे होते. त्याचवेळी गावातील दत्तात्रय…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे… शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला हॅप्पी हायवेवर आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाला असून संगमनेरकरांच्या आनंदात भर पडली आहे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व संगमनेरकरांनी एकत्र येत हॅप्पी हायवेचा लोकार्पण सोहळा भर पावसात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. यामध्ये शहरातील बालक, नागरिक, युवक, युवती, महिलांनी अत्यंत आनंदाने सहभागी होऊन रस्त्याच्या दुतर्फा सजावट करून सर्वांनी रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात व भर पावसात फटाक्यांच्या आतिषबाजीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये झुम्बा डान्स, लेझीम, कबड्डी, लावणी नृत्य, पारंपारिक ड्रेपरी, तायकोंदो ,रांगोळी अशा विविध स्पर्धांमधून अनेकांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण मागितले, मात्र हॉटेल मालकाने जेवण दिले नाही या कारणावरून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, वॉचमन यांना मारहाण करून हॉटेलमध्ये गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक करीत हॉटेल मालकाची सोन्याची चैन आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या चौघा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे डमाळे व दीपक रणसुरे (पूर्ण नाव पत्ते माहित नाही सर्व रा. संगमनेर) अशी चौघा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघा जणांविरोधात हॉटेल व्यवसायिक अंकुश सुरेश अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 394, 452, 427, 323,…
गोवंश कत्तलीसाठी कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याचे शेड केली नेस्तनाबूत! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांनी लक्ष घातलेले बेकायदेशीर कत्तलखाने आता चोरी-चुपके सुरू आहेत. अशाच एका कत्तलखान्यावर बुधवारी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे पोलिसांना आढळून आले. तब्बल तीन हजार किलो गोवंश जनावरांच्या कत्तल केलेल्या मांसासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याची शेड प्रथमत:च या कारवाईमध्ये नेस्तनाबूत करण्यात आली आहे. पोलिसांच्या शेकडो कारवायानंतर देखील सुरू संगमनेर मधील कत्तलखाने सुरूच…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे यांच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदार-खातेदार शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण करणार आहे. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावच्या शिवारात एका बेकायदेशीर डिझेल विक्री केंद्रावर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा सोमवारी टाकण्यात आला. या छाप्यात या डिझेल पंपाच्या माध्यमातून अवैधरित्या, असुरक्षित अवैध चोरटी डिझेल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नासिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी शिवारात असलेल्या हॉटेल पांडुरंग समोर एका बंद ढाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. नासिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ‘संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज’ या हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र हा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत, पथदिवे सुरु करण्यात अडचणी असतील तर या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पथदिवे लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर एकही दिवस हे पथदिवे सुरु झालेले नाहीत. ही बाब भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी केंद्र सरकारने निधीची उपलब्धतता करुन दिली आहे. पथदिव्यांचे कामही पूर्ण झाल्यामुळे याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतू उद्घाटन झाल्यानंतर पथदिवे…
सरकारच खेळतय सामान्यांच्या जीवाशी.. ही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी… वर्षभरात असे काय घडले की ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरू लागली? महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले, ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून सत्य समोर मांडावे, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. थोरात यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सर्वसामान्य माणसाकरीता उपलब्ध असलेले नगरपालीकेचे कॉटेज रुग्णालय ज्यांनी बंद पाडले, ज्यांना अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालय तालुक्यात सुरू करता आले नाही, त्यांना महायूती सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधीकार नाही. तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण अशा रुग्णालयांची उभारणी करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन आ. थोरात यांनीच आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी केली आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मागणीचा समाचार घेताना, जावेद जहागिरदार यांनी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे सता असताना तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणाने उडाला त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या राजीनाम्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ जागतिक टपाल दिन विशेष लेख आज ०९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन… टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्वित्झर्लंड राजधानी बर्न या शहरात २२ देशांनी एकत्र येऊन करारावर सही केली होती. १ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. या वर्षी युनिव्हर्सल पोस्टल युनियनने “टुगेदर फॉर ट्रस्ट” या थीमवर जागतिक टपाल दिनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतभर हा आठवडा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पूर्ण आठवड्यात पोस्टाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज कळस – हिंदु तरुणांना धर्मरक्षणासाठी एकत्र करण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे. यासाठी व्यायामशाळा व वाचनालय सुरु करावे. तेच युवक आपले मंदिरे वाचवतील, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थान येथील प.पू. सुभाष पुरी महाराज व माता वैष्णवी देवी दर्शन घेण्यासाठी आले. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला. कळसेश्वर टेकडीचा प.पू. सुभाष पुरी महाराज यांनी केलेला कायापालट पाहून कालीचरण महाराज भारावले. यावेळी ईश्वरदास महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, सचिव गोपीनाथ पाटील ढगे, ट्रस्टचे उपाध्यक्ष विष्णु वाकचौरे, विश्वस्त प्रदीप वाकचौरे आदी उपस्थित होते. कालीचरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केला आहे. या निधीतून लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार असले तरी राज्यातील अहमदनगर जिल्हा आणि मुंबई शहराच्या वाट्याला एक रुपयाचाही निधी वितरित करण्यात आलेला नाही. राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या योजनेचे लाभार्थी निधीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. विधानसभा कामकाजा दरम्यान 22 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश दिले गेले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या संदर्भात शासन निर्णय झाला असून या निधीचे वाटप करण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : शिर्डी विधानसभा मतदार संघात शासकीय योजनांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा, परित्यक्ता यांच्यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही, पालकमंत्र्यांनी शेजारच्या तालुक्यात जाऊन गुरगुर करण्यापेक्षा राहता तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. पंकज लोंढे यांनी व्यक्त केले. राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शासकीय योजना मिळविण्यात लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लोंढे यांनी भूमिका मांडली. लोंढे म्हणाले, पालकमंत्री नेतृत्व करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा बोजवारा उडालेला आहे, त्याचा मनस्ताप हकनाक लाभार्थ्यांना सहन करावा लागतो. संजय गांधी निराधार योजना, श्रावण…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगरच्या विळद घाटामध्ये असलेल्या डॉ. विखे पाटील महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीमध्ये एका वीस वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्विनी सोमनाथ जाधव (वय २० वर्ष, रा. ढोकी चिंचोली, जि. लातूर) असे या युवतीचे नाव असून ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. ३ ऑक्टोंबर) घडली. अश्विनी जाधव डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. ती वसतिगृहाच्या खोलीत राहत असे. मंगळवारी तिने आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काही विद्यार्थिनींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती वस्तीगृहाच्या प्रशासनाला दिली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दमण येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला देल्टीन रिसॉर्ट दमन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते पुरस्कार अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक राजेंद्र काजळे, श्रीकांत गिरी तसेच बँकेचे सीईओ अंबादास वाणी यांनी स्वीकारला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू…
रविवार विशेष @ प्रवीण पुरो सत्ता मनसोक्त भोगता आली पाहिजे, यासाठीचे प्रयत्न फोल ठरू लागले की राजाला काही सूचत नसत. तो कासावीस होई. ज्यांच्या सहकार्याने सत्ता राबवायची प्रसंगी त्यांचेच गळे त्याने घोटले. असे गळे घोटत मध्यवर्ती सरकारच्या राजाने सहकार्यांचं अस्तित्वच नाकारलं. एकेका राजकीय पक्षाची पाळेमुळे नेस्तनाबुत झाल्यावर राजाने बोरुबहाद्दरांच्या मुळावर घाव घालायला सुरुवात केली. विरोधकांची मुस्कटदाबी करून कोणीही मान वर करणार नाही, असा प्रयत्न राजाने करून पाहिला. त्यात तो यशस्वीही झाला. अनेक हौसे, नवसे, गवसे राजाला जाऊन मिळाले. राज्यातल्या सत्ता त्याने मस्तीच्या जीवावर आपल्याकडे घेतल्या. तरी राजा समाधानी नव्हता. अपेक्षित असलेला सत्तेचा फायदा मिळू न शकल्याने प्रजाही नाराज होती. दिलेला…
कॅशियर उत्तम लांडगे याला ११ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी तपासात फारसी प्रगती होत नसतानाच या घोटाळ्यातील एक आरोपी पोलिसात हजर झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिसांनी उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑक्टोंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा आपल्या कुटुंबीयांसह फरार आहे. तर पंधरा मुख्य आरोपींपैकी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक देऊन जखमी केल्याच्या कारणावरून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोर्ट ऊठेपर्यंत व पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई जखमी पोलीस कर्मचाऱ्याला देण्याची शिक्षा ठोठावली आहे. अमोल मारुती शिंदे वय 29 वर्ष (रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिंदे याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 333, 353, 279, 337, 338, मोटार वाहन अधिनियम कलम 184, 134 (अ) (ब) सह 177 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल…
