Author: अनंत पांगारकर
मुंबई : महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. वेगवेगळे निर्णय घेत प्रशासनावर एकहाती अंमल बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशातच त्यांच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्तीच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मंत्र्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यावेळेस त्यांनी या सर्व आमदारांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली अशा कामापासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना अद्यापही या योजनेचे मानधन मिळालेले नाही. या मानधना संदर्भात प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शास्त्र भारतीय संघटनेच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. सहभागी बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास छात्र भारती संघटनेच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शेतात आईवडील कापुस वेचत असताना जवळच शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथे बुधवारी (ता. १५ जानेवारी) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यात खळबळ उडाली आहे. महेश सिद्धार्थ आखडे असे घटनेत मुत्यु झालेल्या शेतमजूर मुलांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोरख चव्हाण यांच्या कविटखेडा शिवारातील गट क्रं १३३ मध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. कविटखेडा शिवारात शेतातील कामे करण्यासाठी मध्यप्रदेश येथील शेतमजूर सकाळी कापूस वेचणीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा महेश हा शेतातच खेळत असताना दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप…
संगमनेर – राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यासंदर्भातील निवेदनदेखील त्यांनी सरकारला दिले होते. बिबट्यांच्या नसबंदीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितले. ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे.…
जामखेड – शहरालगत असणाऱ्या जांबवडी रस्त्यावर बुधवारी भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५) अशी ह्या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चौघेही अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत होते. अपघातग्रस्त बोलेरो जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गेल्याने बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक…
संगमनेर दि. १५ – एका गावाहून दुसऱ्या गावी थेट मटणाचे जेवण करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांनी मटन खाताना मटणाचे पीस हे बोकड मटण नसून दुसऱ्या प्राण्याचे पीस आहे, असा संशय घेतल्याने हाणामारी आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार झाल्यानंतर एकमेकाविरोधात ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकूर येथील हॉटेल आसरा या ठिकाणी संगमनेर तालुक्यातीलच अंभोरे गावातून आदिनाथ तुकाराम मोरे (वय २४ वर्ष, धंदा मजुरी, रा. अंभोरे, ता. संगमनेर) हा मित्र केतन याच्यासमवेत आसरा हॉटेलमध्ये मटणाचे जेवण करण्यासाठी गेले होता. जेवणात दिलेले मटणाचे पीस हे बोकडाचे नसल्याचे संशय आला व त्यामुळे मित्राला उलट्या झाल्या. या…
संगमनेर – राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सहकारमहर्षी T- 20 क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व अंतिम सामन्यासाठी शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी चार वाजता भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे उपस्थित राहणार आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एक जानेवारीपासून राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून यामध्ये ३२ संघांचा सहभाग आहे. यावर्षी या स्पर्धेत रणजी…
अहिल्यानगर दि. १५- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २२ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिर्डी, दि. १५ – शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण (एटीसी) टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो. शिर्डी विमानतळ परिसरातील २५ किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात. सहज हाताळता येणाऱ्या (हॅंड हेल्ड लेझर) उपकरणाची कमी किंमत व बाजारातील सहज उपलब्धतेमुळे अशा…
मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी संदर्भात महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधी सरकारने बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आता सुमारे ६० लाख महिलांचे या योजनेतील अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र असलेल्या महिलांना स्वतःहून नावे मागे घेण्यास सांगितले होते. जर बहिणींनी स्वतःहून या योजनेतून नाव काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण…
