Author: Annant Ppangarkar

मंगळवार, २५ जून जिल्ह्यातील पोलीस आणि पोलिसांच्या विविध पथकांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद करण्याची राळ उठवणाऱ्या मटका किंग मंडळींकडून शहरात मटका जोमात सुरु ठेवण्यात आला आहे. नगर एलसीबीने शनिवारी शहरातील दिल्ली नाका या ठिकाणी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला पकडल्याने शहरातील मटका काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सुरूच असल्याचे समोर आले आहे. बशीर इसाक शेख, (वय ३० वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने मटका मालक आपणच असल्याची कबुली पोलिसांना दिली असली तरी मूळ मालक मात्र कारवाईतून बचावले असल्याचे बोलले जाते. दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाच्या पाठामागे बोळीमध्ये…

Read More

मंगळवार, २५ जून  लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकार मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ ही योजना आणली. त्या निवडणुकीत सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळविले. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मध्यप्रदेशने २९ पैकी २९…

Read More

मंगळवार, २५ जून  नगरजवळ पाथर्डी परिसरात ओडिशा राज्यातून आणण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात व गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. ओडिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर ‘एनसीबी’ने तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. माहितीच्या आधारे एनसीबी आरोपींचा शोध घेत होती. पण आरोपी लपण्याचे ठिकाण, मार्ग, मोबाईल क्रमांक वारंवार बदलत होते. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवून एनसीबीने आरोपींबाबत मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारे नगर येथील पाथर्डीजवळ सापळा रचण्यात आला होता. या कारवाईत १११ किलो गांजा जप्त करण्यात…

Read More

सोमवार, २४ जून नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे नगर मधील प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याला सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. उद्या मंगळवारी शेळके याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. नगर अर्बन बँकेच्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत संचालक, बँकेचे अधिकारी, कर्जदार यांना अटक करण्यात आली आहे. यातच कर्ज फसवणूक केल्या प्रकरणी प्रतिष्ठित डॉक्टर शेळके याला सोमवारी अटक करण्यात आली. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी माझी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अच्युत पिंगळे आदींनी या संदर्भात सातत्याने आवाज उठवत पाठपुरावा केला आहे. राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून…

Read More

सोमवार, २४ जून  अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने ११ महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरण झालेल्या बालकाला संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी येथून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेने स्वानंद आकाश खडसे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. या संदर्भात नगर रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचे अपहरण झालेले बालक संगमनेरमध्ये असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. नगर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक एस. जी. लोणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेर शहर…

Read More

सोमवार, २४ जून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरवात झाली असून खासदारांना शपथ दिली जात आहे. बघा लोकसभा अधिवेशनाचे लाईव्ह (live) कामकाज.. https://www.youtube.com/live/aQZwbc7cHww?si=Nha-iRFq19_FL2Zm https://www.youtube.com/live/YAcRXrrEFZQ?si=v1yDk9KKfrDNj0Kw

Read More

सोमवार, २४ जून  दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे १० वर्षानंतर त्या पुन्हा स्वगृही परततील. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो. नांदेड जिल्ह्यात सूर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. १० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या पाटील यांच्यावर पक्षाने कोणती जबाबदारी दिलेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज त्या मुंबईत पक्ष प्रवेश करण्याची…

Read More

सोमवार, २४ जून  आरक्षण या विषयाकडे राज्य सरकारने अतिशय संवेदनशीलपणे बघण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा विषय असू दे, सरकारने त्यावर लवकर निर्णय घ्यायला हवा. केंद्रात ३०० खासदार असताना देखील महाराष्ट्राच्या आरक्षणाची चर्चा का होत नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ. पण खरं तर आरक्षण या विषयाकडे महाराष्ट्र सरकारने अतिशय संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे. हे सरकार उपोषणाला दहा-पंधरा दिवसांपर्यंत का खेचते? मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही…

Read More

सोमवार, २४ जून अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सकाळी ११ वाजता सुरू होत आहे. आज पहिले दोन दिवस नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीशिवाय NEET-UGC पेपर लीक आणि इतर स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्याप्रकरणीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. ३ जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड बुधवारी होणार आहे, तर गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सातवेळा खासदार भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती…

Read More

रविवार, २३ जून नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा झाली. यावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गोलमाल है भाई, सब गोलमाल है! अशी प्रतिक्रिया एक्स (X) वर व्यक्त केली आहे. तांबे म्हणाले, आज नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा घेण्यात आली, ह्या परीक्षेला १५६३ पैकी ८१३ विद्यार्थीच हजर राहिले म्हणजेच ७५० विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा टाळली, ह्यातूनच नीटमध्ये गोलमाल झाल्याचे सिध्द होते. तांबे यांनी नीट परिक्षेबद्दल भाष्य करत या विषयाला तोंड फोडलं आहे. जवळपास निम्म्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे टाळले असल्याने तांबे यांनी गोलमाल है भाई,…

Read More

रविवार, २३ जून आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पवार यांनी स्वतः एक्सवर (X) दिली आहे. तपास यंत्रणांच्या मदतीने विरोधी पक्षातील नेते फोडायचे ही भाजपची जुनी रणनीती आता भाजपच्या सहकारी पक्षांची सुद्धा सवय बनलेली आहे. त्यातूनच दबाव टाकण्यासाठी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने खोटी कारवाई केली. या कारवाईचा पवार यांनी जाहीर निषेध केला. पवार म्हणाले, माझ्यावरही अशाच प्रकारे प्रदूषण नियंत्रण बोर्ड, इडी (ED) च्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. एवढे होऊनही मी सरकारच्या विरोधात बोलायचे थांबवत नाही म्हणून माझ्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हालचाली…

Read More

रविवार, २३ जून  चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला ठसे घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीतून (लॉकअप) बाहेर काढलेला आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाला. गजबजलेल्या परिसरात असलेल्या हडपसर (पुणे) पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांसह गुन्हे शाखेची यंत्रणा कामाला लागले आणि अवघ्या दीड तासातच आरोपीला दिवे घाटातून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. गोविंद उर्फ पिंट्या घोडके पसार झालेल्या आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने नंतर पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. घोडके याला हडपसर पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. शनिवारी (२२ जून) दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान त्याला पोलीस कोठडीतून हाताचे ठसे घेण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून चकवा देत…

Read More

आरोपी भाऊसाहेब कुटे न्यायालयीन कोठडीतून ग्रामीण रुग्णालय आणि आता नगरच्या जिल्हा रुग्णालयात… तेथून व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी (?) पुण्याला हलविण्याच्या हालचाली  वैद्यकीय अहवालाबाबत तुरुंग अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षकांचेही मौन, सगळे प्रकरणच बनतय संशयास्पद  आंदोलनादरम्यान पुढाकार घेणाऱ्या ठेवीदारांच्या नेत्यांचेही मौन  रविवार, २३ जून | अनंत पांगारकर  दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला अचानकपणे संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात व तेथून अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान आरोपीला नेमकं काय झालंय याबाबत सर्वच यंत्रणांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे आरोपीला ट्रीटमेंटच्या नावाखाली कोठडीतून बाहेर काढून व्हीआयपी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहे.…

Read More

रविवार, २३ जून  संगमनेर उपविभागात नागरिकांच्या महागड्या मोबाईल चोरीचे प्रमाण मोठे असून अशा चोरी गेलेल्या मोबाईल पैकी १९ मोबाईलचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. त्यातील १२ मोबाईल मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. मोबाईल चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक सचिन धनाड, राम वेताळ…

Read More

देशभरात भारतीय जनता पक्षाची झालेली पिछेहाट ही आपल्या कर्माची फळं आहेत, असं अजूनही त्या पक्षाचे नेते मानायला तयार नाहीत. स्वत: नरेंद्र मोदींची त्यांच्या वाराणसीत झालेली पिछेहाट आणि मोदींच्या सर्वात आवडत्या मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांचा रायबरेलीत झालेला सपाटून पराभव सारं काही सांगून जातं. याच कर्मामुळे चारसौ पारचा नारा कुठल्या कुठे गुंडाळून ठेवावा लागला आणि चक्क पाऊणशे भाजप खासदारांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या आणाभाका मारणार्‍या योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशनेही सत्तेला जागा दाखवली. जिथे रामाची प्रतिष्ठापना झाली तिथे तर पराभव चाखाण्याची वेळ भाजपवर आली. हाती असलेल्या सत्तेचा आतिरेक करतो, हे त्यांना मान्य नाही. सत्तेला अहंकाराने इतकं पछाडलं…

Read More

शनिवार, २२ जून  लोकसभा निवडणूक संपले असले तरी या निवडणुकीचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचे पंटर असलेल्या आणि वरिष्ठांची दिशाभूल करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना अजूनही शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थान का? असा सवाल शिवसेना वाहतूक सेनेचे शहर प्रमुख, माजी उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांनी उपस्थित केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्ष प्रवेश देत उमेदवारी बहाल केली होती. तर विरोधी शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. अटीतटीच्या लढतीत सहापैकी चार मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना तर दोन मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळाले. यात वाकचौरे यांचा विजय झाला असला तरी…

Read More

शनिवार, २२ जून  भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर त्याचे अन्य सहकारी मित्र बचावले असल्याची माहिती मिळते. सद्दाम शेख (वय २६ वर्ष, रा. पुनमनगर, शिर्डी) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. शनिवारी शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी सव्वा दन वाजण्याच्या सुमारास ते धरणाच्या पाण्यात उतरले असता त्यातील एक जण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि मदत कार्य घटनास्थळी पोहोचले. शेख याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला…

Read More

शनिवार, २२ जून  न्यायालयीन सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना साथ रोग सुरू असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज दरवाढी विरुद्ध आंदोलन केले होते. आंदोलना दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केली होती. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा तसेच वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयापुढे सुरू असून या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना देखील राहुल नार्वेकर हे सातत्याने न्यायालयात गैरहजर राहत असल्याने न्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. राहुल…

Read More

शनिवार, २२ जून जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४ लाखापैकी ५० हजार रुपये घेतांना एकाला पकडले आहे. दौलत मधुकर गायकवाड (वय ३५ वर्षे, भूकरमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.) व योगेश्वर राजेंद्र मारणे (वय २५ वर्षे, रा. एरंडवणे, पुणे) या दोन लाचखोर आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या देहूगाव, पुणे येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी लाचखोर आरोपी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचा भुकरमापक दौलत गायकवाड याने…

Read More

शनिवार, २२ जून शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविल्याच्या कारणावरून २१ कोटी ०३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कुकडी (कर्मयोगी कुंडलिकराव जगताप) कारखान्यासाठी हा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यात कोणतीही पाऊले उचललेली नसल्याचे यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. नियमानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे.…

Read More