Author: Annant Ppangarkar

बुधवार दि. २० मार्च, अहमदनगर साकुर (ता. संगमनेर) येथील अल्पवयीन मुली सोबत घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “सु-मोटो” दखल घेतली असून या संदर्भात संबंधितांवर कारवाईचे पोलीस प्रशासनाला निर्देश देत लवकरात लवकर यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवतेंनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत या प्रकरणीचा घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना तपासाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. रुपवते यांनी बुधवारी संगमनेरच्या साकुर येथे जात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या महिन्यात २९ तारखेला घडलेल्या या घटनेची दखल पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी घेतली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला. रूपवते…

Read More

बुधवार दि. २० मार्च, संगमनेर साकुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व तिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस यंत्रणेने तातडीने तपास पूर्ण करत आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशनच्यावतीने तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी महिला कार्यकर्त्यांसह पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेत या घटने संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी केली. साकुर येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. उशिराने या…

Read More

अनंत पांगारकर, दि. २० मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने खासदार विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या पहिल्याच भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार विखे यांनी कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सादर केला होता. त्या पाठोपाठ पालकमंत्री विखे पाटील यांनी नाराज असलेल्या आमदार राम शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बंद दाराआड गुप्त खलबते केली. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री असलेल्या विखे पाटलांनी पक्षांतर्गत संवाद मोहीम साधण्यात सुरुवात केली असल्याने त्यांची ही मोहीम कितपत यशस्वी ठरते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. नगर…

Read More

दि. २० मार्च, अहमदनगर १३ मे रोजी अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील १७,८९९ गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाईचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या आराखड्यानुसार शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७ हजारावर पोलीस व ४ हजारावर गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. दोन्ही मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने देखील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईला…

Read More

दि. १९ मार्च, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या साकुरमध्ये दहावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारानंतर तिने बदनामीच्या भीतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. या अमानुष अत्याचाराचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व तालुका काँग्रेस अध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. २९ फेब्रुवारीला घडलेल्या या घटने प्रकरणी सोमवारी तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपीं विरोधात बाल लैंगिक अत्याचारासह (पोक्सो) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष व जय हिंद महिला मंचच्या प्रमुख…

Read More

उमेदवारीवर एकमत होताच पूर्ण ताकदीनिशी पालकमंत्री विखेंना उभे राहावे लागेल नांदगावकरांच्या पाठीशी! दि. १९ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महायुतीला राज्यात नवा सहकारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची नावे राजकीय क्षितिजावरून कायमची हटवा’, असे सांगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मनसेला महायुतीत घेण्याचा निर्णय झाला असून यावर महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री राज ठाकरे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची…

Read More

दि. १९ मार्च, मुंबई अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानी या घटनेतील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले एका दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील संगमनेर शहरात काही…

Read More

दि. १९ मार्च, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रविद्या शाखेंतर्गत विधी विषयाच्या अभ्यास मंडळावर प्राध्यापक डॉ. कपिल चौरपगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक चौरपगार संगमनेरच्या ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये संशोधक मार्गदर्शक आहेत. चौरपगार यांच्या विधी अभ्यास मंडळावरील निवडीबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी आदींनी अभिनंदन केले.

Read More

दि. १९ मार्च, अहमदनगर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील आचारसंहिता अंमलबजावणीच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हा…

Read More

नगर अर्बन बँकेतील २९१ कोटीच्या घोटाळ्यात उद्योजक अमित पंडितचा ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा; पंडितचा भागीदार शुक्लाही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर! दि. १९ मार्च, अहमदनगर २९१ कोटीच्या बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी म्हणून समोर आलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित (वय ५६) याने ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला असल्याचे समोर येत आहे. शनिवारी दुपारी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केलेला पंडित सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून काय समोर येते याकडे सहकारातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. ३३ कोटींच्या घोटाळ्यात उद्योजक अमित वल्लभराय पंडितला नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून…

Read More

दि. १८ मार्च दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ फेब्रुवारीला दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर संगमनेर तालुक्यातील साकुर येथे अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने या मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर दोघे (रा. हिरेवाडी, साकुर), प्रशांत भास्कर भडांगे (भडांगे वस्ती, साकुर), विकास रामदास गुंड (गुंड वस्ती, मांडवे बुद्रुक) व विजय खेमनर (हिरेवाडी, साकुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहावीत शिकणारी मुलगी…

Read More

दि. १७ मार्च, अहमदनगर अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी सुहास मापारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या आचारसंहिता अंमलबजावणी बाबत असलेल्या तक्रारी ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election24@gmail.com या ई-मेल आयडीवर करता येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भातील तक्रारी नागरिकांना आता थेट या स्थापन करण्यात आलेल्या कक्षात दाखल करता येणार आहे.

Read More

दिनांक १७ मार्च, अहमदनगर नगर अर्बन बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संगमनेरमधील अमृतवाहिनी बँकेचा माजी अध्यक्ष आणि उद्योजक असलेल्या अमित पंडित याला न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पंडित यांच्याकडून नेमकी काय माहिती समोर येते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या महा घोटाळा प्रकरणात बँक बुडविण्यास कारणीभूत ठरलेल्या १०५ आरोपींपैकी एक असलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित याने घेतलेल्या कर्जाची रक्कम पंचवीस कोटीच्या घरात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अशा बड्या कर्जदारांविरुद्ध आपला फास आवळण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते. शनिवारी दुपारी बँकेला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. १७ मार्च, मुंबई अँड. असीम सरोदे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून सरोदे यांना दोन दिवसात माफी मागा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सरोदे या प्रकरणी काय भूमिका घेता याकडे लक्ष लागले आहे. काय आहे प्रकरण… चंद्रपूर येथील ‘निर्भय बनो’ सभेत बोलताना ॲड. सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांबद्दल एक मोठ विधान केलं होतं. या विधानाचे पडसाद शिंदे गटात उमटले आहे. सरोदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा परतणार असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी या बारा आमदारांची नावे देखील वाचून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. १७ मार्च, मुंबई काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर होऊन निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज रविवारी मुंबईत खासदार गांधी यांच्या जाहीर सभेने होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. मुंबईत शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. राहुल आज, रविवारी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढणार आहेत. दोन महिने ६२०० किलोमीटरचा प्रवास करत…

Read More

१७ मार्च, देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या आठवड्यात मोठा धक्का बसला. आपल्याच होम ग्राऊंडवरच्या म्हणजे बारामतीत बोलवलेल्या व्यापार्‍यांच्या मेळाव्याला यायला तिथल्या व्यापार्‍यांनी पवारांना अधिकृतरित्या नकार दिला. उभ्या आयुष्यात असा प्रकार बारामतीत पवारांपुढे व्यापार्‍यांनीच काय कोणीच केला नव्हता. अगदी राजकीय आणि सामाजिक जीवनात पवारांना दुषणं देणारेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना अनेकांनी पाहिलं आहे. व्यक्तीगत म्हणून एखाद-दुसरा व्यापारी पवारांनी बोलावलेल्या मेळाव्याला गेला नाही, असं होऊ शकतं. पण सारा व्यापारी वर्गच पवारांना नकार कळवतो, त्यांना एकाकी पाडतो हे पवारांनाच काय पवारांच्या विरोधकालाही पटणारं नाही. उभ्या हयातीत ज्यांच्यासाठी पवारांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या व्यापार्‍यांना शुन्यातून उभं…

Read More

दि. १६ मार्च, संगमनेर नगर अर्बन बँकेतील अडीचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मोठा कर्जदार व आरोपी असलेल्या संगमनेरमधील अमृतवाहिनी बँकेचा माजी अध्यक्ष व उद्योजक असलेल्या अमित वल्लभराय पंडित याला शनिवारी दुपारी संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक अटकेला हुलकावणी देणाऱ्या असलेल्या पंडित याला अखेर नाट्यमयरित्या अटक झाल्याने ठेवीदार सुखावले असून सहकारात मात्र खळबळ उडाली आहे. नगर अर्बन बँकेतील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत. काही आरोपी अटकेत असतानाच आता आर्थिक गुन्हे शाखेचे वक्रदृष्टी मोठ्या कर्जदारांवर देखील पडली आहे. या कर्जदारांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. आता अमित पंडित याला अटक केल्याने त्याच्या चौकशीत काय निष्पन्न…

Read More

दि. १६ मार्च, नवी दिल्ली यंदाची १८ वी लोकसभा निवडणूक देशभरात १९ एप्रिल ते २ या कालावधीत सात टप्प्यात घेतली जाणार असून ४ जूनला देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून देश कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार असून राज्यात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली आहे. करण्यात आले आहे. मोदी सरकारचा कार्यकाळ येत्या ६ सहा जूनला संपुष्टात येत असून निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशभरातील ५४३ जागांवर १९ एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार असून ७ टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यात येणार असल्याचे…

Read More

दि. १६ मार्च, नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीची घोषणा काही तासांवर आली असताना भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. शनिवारी दुपारी सव्वा वाजता त्यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा मुख्यालयात पार पडला. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची व देशातील लोकसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याच्या काही तास आधीच यांनी केलेल्या भाजप प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. ९० च्या दशकात बॉलीवूड आणि भक्ती गीतांनी चहा त्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अनुराधा पौडवाल नावलौकिक प्राप्त गायिका असून त्या ६९ वर्षाच्या आहेत. एस. डी. बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार असलेल्या अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचा १९६९ मध्ये विवाह झाला होता.

Read More

दि. १६ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तासांचा कालावधी असताना राज्य सरकारने शनिवारी निर्णयांचा धडाका लावत १७ महत्वपूर्ण निर्णय घेतले. प्रशासकीय निर्णयाबरोबर आदेश काढण्याचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी तब्बल २०५ शासन निर्णयाची घोषणा राज्य शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे… राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी (उद्योग विभाग). तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार (वैद्यकीय शिक्षण विभाग) मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास, दंड सुद्धा वाढविला (गृह विभाग) १३८ जलद गती न्यायालयाच्या वाढीव खर्चाला मान्यता (विधी व न्याय विभाग) संस्कृत, तेलगू, बंगाली…

Read More