Author: अनंत पांगारकर

आजचे राशिभविष्य ​मेष – आज बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही अवघड कामेही सहज सोपी कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनाची एकाग्रता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कामात चुका होणार नाहीत. ​वृषभ – आज तुमचे मन थोडे विचलित राहू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. पैशांची देवाणघेवाण करताना किंवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ​मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. तुमच्या प्रभावी बोलण्याने लोक प्रभावित होतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. अचानक धनलाभ होण्याचे योग असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  श्रीरामपूर:  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवरिुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सन २०२५ व २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील एकूण ६८ सराईत आरोपींवर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार मानवी जीवितास किंवा मालमत्तेस भय, इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ व ५६ च्या तरतुदीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर:  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज, (मंगळवारी ७ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून हे आदेश जारी केले आहेत. हवामान विभागाने अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तालुक्यामध्ये आधीच काही भागांत अतिवृष्टी झाली असल्याने निर्माण झालेली स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आज (मंगळवारी) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या महामार्गावरील मलबा हटवण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे घाटातील मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या येणारी-जाणारी वाहने एकाच बाजूने वळविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या रस्त्यावरील मोठे दगड आणि मलबा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले असून भंडारदरा, मुळा आणि कुकडी समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या सरींचे तांडव सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. भंडारदरा धरण आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने धरणाचा साठा ३० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भंडारदरा आणि मुळा पाणलोटातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर- भंडारदरा धरण क्षेत्रात रविवारी आणि सोमवारी झालेल्या तुफान…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज चंद्र बाराव्या स्थानी असल्याने आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. इतरांच्या कामात नाहक हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी आणि कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार आज करू नयेत. ​वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. चंद्र लाभ स्थानात असल्यामुळे धनवृद्धी आणि नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी नवीन करार किंवा सौदे यशस्वी होतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. ​मिथुन – नोकरी आणि व्यवसायामध्ये आज आपल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामगिरीवर प्रसन्न राहतील, ज्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोठ्या प्रमाणावर चोरी (अपहार) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद उमटत आहेत. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संगमनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, याप्रकरणी संगमनेरमध्ये ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात २५ जून २०२६ रोजी या दान चोरीप्रकरणी एफआयआर क्रमांक ९०/२०२६ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, हा गुन्हा केवळ अयोध्येपुरता मर्यादित नसून यामुळे संपूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच शंभर टक्के मुक्तता होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आणि मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष केंद्राचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी…

Read More

अनंत पांगारकर- कचऱ्याचे साम्राज्य, जागोजागी पडलेले ढीग आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकलेल्या एखाद्या शहराचे रूप पालटून त्याला राज्यातील एक प्रगतशील, स्वच्छ आणि ‘झाडांचे शहर’ बनवणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असते. मात्र, जेव्हा एखादी महिला आपल्या शहराला केवळ एक भौगोलिक क्षेत्र न मानता स्वतःचे मोठे घर मानते, तेव्हा तिथे परिवर्तनाची एक नवी आणि सोनेरी पहाट उजाडते. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नेमका हाच अद्भूत चमत्कार संगमनेर शहरात करून दाखवला आहे. म्हणूनच, ‘कचऱ्यात हरवलेली बाई’ अशी स्वतःची प्रांजळ आणि सार्थ ओळख करून घेत, त्यांनी कचरा निर्मूलनाचा आणि शहर सौंदर्यीकरणाचा जो वसा घेतला, तो आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – या राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले गेल्याने भविष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आज तुमची काही कठीण कामे सुलभ होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ – आज आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उत्तम दिवस असून जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेले प्रकल्प गतीने पुढे सरकतील. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी कानावर आल्याने घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः…

Read More