Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. यातून या शेतकऱ्यांनी 1754 कोटी रुपयांची केंद्राची मदत लाटली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्याकडून या रकमेची वसुली सुरू केली असून आत्तापर्यंत एक लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू करण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ऑगस्ट पासून राज्य सरकार देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- रविवारी पहाटे पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात केलेल्या कारवाईत साडेसहाशे किलो गोमांस आढळून आले. यावेळी चार जिवंत गोवंश जनावरे देखील कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी या जनावरांची कत्तल होण्यापूर्वीच मुक्तता केली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने जमजम कॉलनी परिसरात जात मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली असता त्यांना एम.एच. 06 जी 3431 या क्रमांकाच्या मॅक्स पिकअप मध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आले. जवळच कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले चार गोवंश जनावरे देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. अद्यापही ही स्थगिती कायम होती. स्थगिती उठवितांना दिलेल्या निधीमध्ये पुन्हा एकदा अजित दादांची ‘दादागिरी’ कायम राहिली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेल्या भरत गायकवाड यांनी आपली पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून सोमवारी पहाटेच्या वेळी हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस दलात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेले गायकवाड पुण्यातील बाणेर परिसरात कुटुंबियासह वास्तव्यास आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गायकवाड यांनी सोमवारी पहाटे चार वाजता पत्नी मोनी गायकवाड (वय 44 वर्षे) व त्यापाठोपाठ दीपक गायकवाड (वय 35 वर्ष) या पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. दोघांची हत्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीशी निगडित नोंदीला हजारो रुपयांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास नोंद होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी तलाठ्यांना, मंडळ अधिका-यांना सूचना करून गावागावात शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलनं करणार असल्याचा इशारा दिला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात बहुतांश गावातील तलाठी आपल्या सज्जामध्ये प्रामुख्याने हजर राहत नाहीत. तर त्यांचे हाताखालील…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्या कामाची पूर्तता करताना नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांच्या सूचनांप्रमाणे योजनेच्या आराखड्यात पुन्हा बदल करा. योजनेच्या यशस्वितेसाठी अधिकाऱ्यांनी सुध्दा जबाबदारीने काम करावे. केवळ ठेकेदारांवर विसंबून योजनेची अंमलबजावणी नको. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्तुस्थिती पहावी, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धडे दिले. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा महसूलमंत्री विखे पाटील यांनी घेतला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून त्यांनी हे वृक्षारोपणाचे मिशन सर्वांना दिले. मागील सतरा वर्षात उघडे-बोडके डोंगर हिरवीगार दिसू लागले असून यावर्षीही जेथे जागा असेल तेथे झाडे लावा. वृक्ष संवर्धन संस्कृती आपल्या तालुक्यात वाढली आहे. वृक्ष जपणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून वनराई असेल तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. पिंपळगाव कोंझिराच्या काळा खडक येथील डोंगरावर जयहिंद लोकचळवळ व अमृतवाहिनी उद्योग समूहाच्या विद्यमाने आयोजित…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडून गद्दार मिंधे गटात सामील झाले असले, तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे समोर दिसत असल्याने राज्यातील भाजपचे सरकार कोणत्याही निवडणुका घेत नाही. उलट निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे, असे असले तरी आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युवा सेनेने देखील काम सुरू केल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर संगमनेरात तोफ डागली. उद्धव ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. संगमनेरमध्ये शिवसेना प्रणित युवा सेनेचा युवा संपर्क…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो कर्माचं फळ काय असतं, हे किरीट सोमय्या यांना आज कळून चुकलं असेल. ते कसं पचवावं याच्या चिंतेत ते गर्क असतील. ते या संकटातून सहीसलामत सुटोत, अशी सदिच्छा त्यांना आपण देऊयात. ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटात माणसाला मदतीचा हात द्यावा. त्याला आणखी खायित लोटू नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अशी आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून जी किरीट सोमय्या या माणसाला कधी कळलीच नाही. कारण डोक्यात अहंकार होता महाराष्ट्राच्या बदनामीचा. महाराष्ट्राच्या बदनामीत या माणसाने इतकं टोक गाठलं की जगातला भ्रष्ट कारभार हा एकट्या महाराष्ट्रातच होत असावा आणि केवळ विरोधकच तो करत असावा, असं…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिवंत गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 76 हजार रुपये किमतीचे गोमांस आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कत्तलखाना चालक जावेद लियाकत शेख (वय 29 वर्षे रा. अलकानगर) याला अटक केली. शहरातील मदिना नगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केल्याची माहिती मिळतात पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, विजय खाडे रोहिदास शिरसाठ व अजित कुर्हे यांनी घटनास्थळी जात छापा टाकला असता तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पथकाने तेथे असलेले गोमांस ताब्यात घेत त्याची मोजणी केली. कारवाई मध्ये पथकाला 76 हजार रुपये किमतीचे 380 किलो गोमांस आढळून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडील पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोकड दुसऱ्या सहप्रवासी महिलेने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथून ब्युटी पार्लर व्यावसायिक महिला उज्वला सातपुते या रिक्षाने जवळ असलेली पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन मैत्रिणीच्या बँक खात्यात एचडीएफसी बँकेत भरण्यासाठी संगमनेरकडे येत असताना ही घटना घडली. सकाळी 11 वाजता त्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरून प्रवासी रिक्षात बसून संगमनेरकडे येत होत्या. यावेळी रिक्षात त्या एकट्याच होत्या. दरम्यान रिक्षा घुलेवाडी जवळील म्हसोबा मंदिराजवळ आल्यानंतर दोन महिलांनी रिक्षाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भाजपा हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष त्यांनी फोडला. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकार मान्य झालेल नाही. राज्यघटना व लोकशाहीवर विश्वास असलेल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळ चांगला आहे. फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती. मात्र याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या रणखाबवाडी ते कुंभारवाडी वरवंडी व दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – योगाला क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाला आहे. यापुढील काळात योग हा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आगामी काळामध्ये अधिक प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. संगमनेर महाविद्यालयात क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनचे सेक्रेटरी इन जनरल नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ. मालपाणी बोलत होते. क्रीडा संवर्धन समिती सदस्य नरेंद्र चांडक, रवींद्र पवार, संदीप चोथवे यांच्यासह श्रमिक ज्युनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. मालपाणी म्हणाले, नियमित अभ्यासासोबत मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आणि योगसाधना आयुष्याला दिशा देण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी – राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोणी बुद्रुक मधील पाथरे रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पाच-सहा वर्षे वयाचा नर बिबट्या शुक्रवारी रात्री जेरबंद झाला. विखे पाटील यांच्या शेतात जेरबंद झालेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. लोणी परिसरामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. या परिसरात आतापर्यंत जवळपास 15 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथरे रस्त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शेती आहे. मोठ्या लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या या शेतामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे दिसून आल्याने या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने मंत्री विखे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोणत्याही व्यवसायाच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट मानव जातीसाठी व्यापक असायला हवे. त्यासाठी अंतर्मनातून आवड असायला हवी. केवळ पैसा हे एकमेव उद्दिष्ट समोर न ठेवता त्यातून समाजहित साधले जायला हवे. पैशांऐवजी जर आपण उद्दिष्टांसाठी व्यवसाय करणार असाल तर त्या क्षेत्रामध्ये आपण व्यापक यश प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व एमएफडी सुनील कडलग यांनी केले. येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित संगमनेर व नाशिक गोदावरी चॅप्टर यांच्यावतीने शुक्रवारी (दि.२१ जुलै) सायंकाळी आयोजित ‘गोष्ट अर्थ साक्षरतेची’ या उपक्रमाअंतर्गत कडलग यांनी अर्थ साक्षरता वृद्धीसाठी दिलेल्या योगदानाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. संदीप गुंजाळ यांनी ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 18 व्या वर्षाचा शुभारंभ रविवारी (दिनांक 23 जुलै) सकाळी 9 वाजता पिंपळगाव कोंझिंरा येथील कनकेश्वर डोंगर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात व अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून व जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचे हे 18 वे वर्षे आहे. आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवरती बिजारोपण, वृक्षारोपण करण्यात आले आहे. यातून तालुक्यात हिरवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. बदल्यांच्या आदेशात सरकारच्या नेहमीच रडारवर असलेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांचा देखील या बदल्यांमध्ये समावेश आहे. एकाच महिन्यात त्यांची पुन्हा दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. अठरा वर्षात 22 बदल्यांचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला. मराठी भाषा विभागाचे सचिव असलेले मुंढे आता मंत्रालयातच कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विभागांचे सचिव असतील. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने नव्याने काढलेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये अनेक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आल्यापासून अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी विमानतळासंदर्भात आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात आज अनेक प्रश्न उपस्थित केले. चार महिन्यांपूर्वी नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊनही नाईट लँडिंग का सुरू झाली नाही? https://twitter.com/bb_thorat/status/1682328034324656128?s=19 टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला नेमकी कधी गती येणार? रोजगार देताना स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी दिली पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विमानतळावर असलेल्या समस्यांबाबत कबुली शिर्डी विमानतळाचे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही.
महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – अतिक्रमणासंदर्भातील एका जनहित याचिकेमध्ये कारवाईचा अहवाल न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले. अहमदनगरच्या शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी या ग्रामपंचायतीकडे बांधकाम व्यावसायिकांच्या परवान याबाबत माहिती मागितली होती. ग्रामपंचायतीने अनेक बांधकाम व्यावसायिकांना कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती दिली होती, त्यामुळे विनापरवाना अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाईसाठी त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिकारीच्या शोधात पहाटेच्यावेळी रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृद्धावर हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी संगमनेर तालुक्यात समोर आला. बिबट्याच्या आल्यात जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द गावाच्या शिवारात असलेल्या शिंगोरे वस्ती जवळ शुक्रवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून चाललेल्या पोपट उर्फ रामा कारभारी पर्बत (वय 65 वर्ष) यांच्यावर बिबट्याने अनपेक्षित रित्या हल्ला चढविला. हल्लेखोर बिबट्याने त्यांना जवळच्या झुडपात ओढण्याचा प्रयत्न केला मात्र पर्बत यांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या दोघांनी त्यांच्या मदतीसाठी येत बिबट्याला हुसकावून लावले. ऐनवेळी उद्भवलेल्या प्रसंगात हे दोघे वृद्धाच्या…
