Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज | रविवार विशेष आजच्या या तरूणी तरी कुठे आहेत हो… ध्यानावर कायम पडीक पडलेल्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर घालून टिचभर कपडे मोकाट फिरती गावभर दाखवून… अंगप्रदर्शन सेल्फी काढती ढीगभर काँलेजच्या नावाखाली पोरांसोबत जाती डेटवर उघड्या बोडक्या होऊन हुदंडती खुशाल बीचवर कुणाचं काही ऐकत नाही जुमानत नाही आईबापाला म्हणे आमची लाईफ स्टाईल तुमी मधे पडता कशाला ! क्षणभंगुर सुखासाठी पोरी लागती कुणाच्याही नादाला आंधळ्या प्रेमापायी बावळ्या मुकतात कायमच्या जीवाला बाँयफ्रेंन्ड, गर्लफ्रेंड ट्रेडच्या नावाखाली चाललाय धिंगाणा जाणती असो वा अजाणती बळी पडत आहे भोगांना… संस्कार, संस्कृती विसरून चालल्या वाहवत विनाशाला सगळ्याचं नाही पण बहुतेक लागल्यात वाईट वळणाला … दोष नाही एकट्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर – भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या वेगाने वाढत आहे. जगात या क्रमवारीत भारताने ब्रिटनला मागे टाकले असून आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे स्व. सुधाकर पुंजाजी भगत यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवारी (ता.१७) चला अर्थ साक्षर होऊयात या अभियानांतर्गत, ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर कडलग बोलत होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रा. राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांच्या ‘माय बापाची कहाणी’ या संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीने सार्यांनाच अचंबित करून सोडलं आहे. राज्याच्या सत्तास्थानी कोण बसेल, मुख्यमंत्री कोण होईल आणि ज्याने राज्यातल्या राजकारणाचा खेळखंडोबा केला त्याच्यावर पश्चातापाची कशी वेळ येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. करावे तसे.. हा वाक्प्रचार या ठिकाणी चपलख बसतो आहे. हा नियतीचा खेळ आहे. नियत बदलली की जसे करावे तसे भरावे. राज्य भाजपच्या आजवर स्वत:ला सर्वेसर्वा समजणार्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या हे संकट ओढावलं आहे. सत्तेच्या सार्या नाड्या आपल्या हाती असताना आज पश्चाताप सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. सत्तेसाठी जे पेरलं तेच उगवू लागल्याचं हे त्यांच्यापुढचं चित्र आहे.…
लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला!
पीडित मुलगी गर्भवती; अकोले तालुक्यातील घटना जर आईच्या घरी गेली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यास यश आले आहे. मात्र या दरम्यान पीडित मुलीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली रा. विरगाव, ता. अकोले, मूळ रा. शेळके वस्ती, नांदुरी दूमाला ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवारी (ता.१८ जुन) सायंकाळी ५ वाजता श्रीरामपुर येथील फातेमा हाऊसिंग सोसायटीत आयोजित केले असल्याची माहिती अन्वर हाजी शब्बीर तांबोळी यांनी दिली आहे. मुस्लिम ओबीसी समाजाचा अहमदनगर जिल्हा मेळावा ऑल इंडिया ओबीसी अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अहेमद अन्सारी यांचे अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष तनवीर तांबोळी, संगमनेर येथील शफीभाई तांबोळी यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अन्वर तांबोळी यांनी केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रक्तदानाची क्षमता हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतात आणि कितीतरी परिवारांना सावरणे शक्य होते. रक्तदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानाचे महत्त्व प्राप्त असून त्याला जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या उद्योग समूहावर नीति आणि सदाचाराचे संस्कार करणार्या दामोदरशेठ यांच्या प्रत्येक स्मृतीदिनी रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्या स्मृतींना खर्याअर्थी उजाळा देणारा असल्याचे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले. मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 48 व्या स्मृती दिनानिमित्त अर्पण रक्त पेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून 127 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे व उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख यांच्या सूचनेवरून या निवडी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये शितल सदाशिव हासे यांना महिला आघाडी तालुका संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. याशिवाय उज्वला कैलास गुळवे (महिला आघाडी तालुका संघटक, साकुर पठारभाग) आशा संदीप केदारी (महिला आघाडी उपजिल्हा संघटक, संगमनेर-अकोले) सुरेखा गुंजाळ (महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस) सुनिता अशोक सातपुते (महिला आघाडी उप तालुका संघटक) सोनाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पबजी खेळाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीतून संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात तरुणी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न असल्याचे घटना समोर आले आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिसांनी पकडलेले दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत. या घटनेमागे सध्या सुरू असलेल्या लव्ह जिहाद सारखा प्रकार आहे का या दृष्टीनेही संगमनेर पोलीस तपास करत आहे. अकरम शहाबुद्दीन शेख व मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर (दोघे रा. अलीनगर, जि. दरभंगा, बिहार) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी – आम्ही मजबूत असून सरकारची काही काळजी करू नका. असे सांगताना “एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होईल एवढी युती कच्ची नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शुक्रवारी थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार संजय भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती एका विचाराने झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई :- काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. बावनकुळे म्हणाले, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनीच अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा काढायला लावला. काँग्रेसने कर्नाटकात धर्मांतर बंदी कायदा रद्द केला असून भविष्यात गोहत्या बंदीचा कायदाही रद्द करतील. त्यामुळे काँग्रेसला दिलेलं एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचं कर्नाटक उदाहरण असल्याचे बावनकुळे म्हणाले. कर्नाटकच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी किमान आता तरी उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून भूमिका स्पष्ट करावी. कर्नाटकमध्ये झालेला प्रकार त्यांना मान्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले | राजेंद्र जाधव महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळख असलेले ५४ शेकरू हरिश्चद्रगड अभयारण्यात आढळून आले यात यात प्रामुख्याने कोथळे, पाचनई, आंबित, कुमशेत या परिसरातील जंगलात त्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले. तर पंधरा दिवसांच्या प्रगणनेत अकोले तालुक्यातील राजूर -हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुंची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे प्रगणनेत दिसून आले वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याकडुन या शेकरूंची मोजतात करण्यात आली. मोजणी दरम्यान ५४ शेकरूनी वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. राजूर वनरिश्रेत्रात येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य हे शेकरुच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरुच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा विकास व शांतता काहींना पहावत नसल्याने जातीय तेढ निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जमावबंदीचा आदेश मोडून आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेची छेडछाड करण्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उमटली असून या सर्व लोकांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संगमनेरकर व काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. राज्यघटना व सर्वधर्मसमभाव हा विचार जोपासत पुरोगामी व वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या आमदार थोरात यांनी संगमनेरमध्ये बंधुभाव व सामंजस्याचे वातावरण राहावे, यासाठी सातत्याने काम केले आहे. मात्र काही समाज विघातक शक्तींनी याला जातीयतेचे रूप देत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याने दुसऱ्याच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येत हा करार मोडला आहे. त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू, असा सूचक इशारा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) मतदान होत आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनल विरोधात त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील भारतनगरमध्ये असलेल्या सरवर हाजी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची टीप पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली. निरीक्षक मथुरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश देताच पोलीस पथकाने घटनास्थळी केलेल्या कारवाईत 1,87,500 रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस मिळून आले आहे. कारवाईची चाहूल लागताच कत्तलखाना चालक सरवर हाजी तेथून पसार झाला. अनेकदा झालेल्या कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यातून दररोज शेकडो गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याचे अनेकदा पोलीस कारवायानंतर समोर आले आहे. कत्तलखाने नामशेष करण्यास प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. संगमनेरातील कत्तलखान्यातून दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने येथील कत्तलखान्यांची राज्यात बदनामी झाली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. लिंगभेदावर भाष्य करणे महाराजांच्या अंगलट आले असून आता न्यायालयाच्या निर्णयामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराजांनी कीर्तनाच्या एका कार्यक्रमादरम्यान लिंगभेद भाष्य करत सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून राज्यभरात गदारोळ उडाला होता. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी न्यायालयात देखील धाव घेतली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीची दखल घेत कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इंदुरीकर यांच्यावतीने जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज असं म्हणतात, “मारने वाले से बचाने वाला हमेशा बड़ा होता हैं ” या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा संपूर्ण जगाने घेतली आहे. ही घटना आहे कोलंबिया देशात घडलेली. ज्या घटनेने संपूर्ण जगाला एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. १ मे २०२३ रोजी एक आई आपल्या ४ मुलांना घेऊन कोलंबिया देशामधल्या अमेझॉनच्या जंगलात असलेल्या अराराकुआरा या गावातून सॅन जोस डेल ग्वाविअरे इकडे एका प्रायव्हेट विमानाने निघाली. १ पायलट, १ लोकल लिडर आणि १ या मुलांची आई मॅग्डालेना मुकुटुय व्हॅलेन्सिया अशी ३ प्रौढ माणसं आणि तिच्या सोबत असलेली ४ मुलं ज्यात १३ वर्षाची लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय आणि तिची ९ आणि ४…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आमदार थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेले पत्र व केलेल्या पाठपुराव्यातून या पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीवरील पूर पाण्याने खचला होता. हा पूल घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा महाविद्यालय, गंगामाई घाट, साईनगर या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचा होता. हा पूल खचल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…
महाराष्ट्र संवाद न्यूज बँकेने साधलेली प्रगती, संचालक मंडळ आणि बँकेच्या कर्मचार्यांनी हातात हात घालून केलेल्या सांघीक कामाचा परिपाक म्हणून नूतन संचालक मंडळाची निवडही बिनविरोध झाल्याने बँकेच्या प्रगतीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन व्यापारी एकता मंडळाचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी केले. संगमनेरच्या उद्योग क्षेत्राची कामधेनू समजल्या जाणार्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या संचालकांची निवड बिनविरोध झाली, त्या निमित्त सभासदांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व्यापारी एकता मंडळाने आभार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी मालपाणी बोलत होते. व्यासपीठावर बँकेच्या गेल्या 58 वर्षांच्या इतिहासात चेअरमनपद भूषविलेल्या माजी संचालकांची उपस्थिती होती. मालपाणी म्हणाले, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील काही मोठ्या बँका अवसायनात गेल्या. काहींवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अनेक दिवसांच्या परिश्रमातून कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निव्वळ उद्घाटनाच्या हौसेपायी पाण्याची उशिरा चाचणी करावी लागली. कालव्यांमधून पाणी सुटले आणि दुष्काळी भागातील जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. कालव्यांच्या शेजारी जमिनी असलेल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांची समजूत काढून, उपाययोजना करून हे पाणी सुरू ठेवता आले असते. मात्र असे काहीही न करता घाईघाईने कालव्यांमधील पाणी बंद करण्याचे कारण काय? असा सवाल निळवंडे धरण व कालव्यांचे जनक, जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निळवंडे कालव्यांमधील पाणी बंद केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांची कामे…
राहात्यामध्ये प्रचंड विराट सभा गणेश परिसराच्या विकासाचा प्रामाणिक हेतू : थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश चांगला कसा चालवणार. त्यांची दडपशाही झुगारून सभासद व जनतेचा मोठा पाठिंबा या निवडणुकीत मिळवला असून ही निवडणूक गणेश परिसरातील शेतकऱ्यांची अस्मिता व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. आमचा हेतू हा स्वच्छ व प्रामाणिक असून शेतकरी व कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या परिसरातील हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचा छावा सदैव तुमच्यासोबत असेल असे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे राहता येथे श्री गणेश परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ सभेत ते…
