Author: Annant Ppangarkar
शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना एसएमबीटी रुग्णालयातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. रामनवमी उत्सवावेळी शिर्डीमध्ये झालेल्या पाळणा दुर्घटनेमध्ये साळवे आणि साबळे या सर्वसामान्य कुटुंबातील पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या कुटुंबीयांची माजी मंत्री थोरात यांनी भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी तातडीने धामणगाव येथील एसएमबीटी या सेवाभावी रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे.…
शिर्डी, महाराष्ट्र संवाद न्यूज सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहाता पंचायत समितीचे…
राज्यघटनेच्या विरुद्ध विचार मांडत जातीभेद निर्माण करून राजकारण..! माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज विविध भाषा, वेशभूषांच्या या देशांमध्ये संविधानाने सर्वांना एकत्रित ठेवले आहे. संविधानाचे तत्व जपण्याचे प्रत्येकाची जबाबदारी असताना काहीजण मात्र या राज्यघटनेच्याच तत्त्वाच्या विरुद्ध विचार मांडत आहे. आपसात जातीभेद निर्माण करून राजकारण केले जात आहे. एका विशिष्ट समाजाचे राज्य निर्माण करण्यासंदर्भातील विधाने दुर्दैवी असून सर्वांचा विकास आणि समता असलेला राज्यघटनेचा विचार शाश्वत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.…
अहमदनगर – महाराष्ट्र संवाद न्यूज दुबईहून आलेले तीन दहशतवादी मुंबईत घुसले आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, अशी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अहमदनगरमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यासिन सय्यद (वय ४७) असे आरोपीचे नाव असून त्याला महाराष्ट्र एटीएसने अहमदनगर येथे कारवाई करत ताब्यात घेतले. व्यक्तिगत वैमनस्यातून आरोपीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये ७ एप्रिलला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. आरोपी सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईत दहशतवादी घुसल्या संदर्भात माहिती दिली होती. दुबईहून आलेले तिघे दहशतवादी शुक्रवारी सकाळी मुंबईत घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असे…
मुंबई – महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर राजकीय वातावरण तापलेल असतानाच फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक जण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक जण आमच्याकडे भाजपात आले. संपर्काच्या नात्यांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर संगमनेर शहरातील चार मोठ्या बँकांना बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच आता मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात श्री. कुलस्वामीनी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघां…
मुंबई| महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त लाभला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जिल्हा युवा अधिकारीपदी अमित रामकिसन चव्हाण (संगमनेर, अकोले, राहाता) यांची फेरनिवड करण्यात आली. युवा सेनेच्या नव्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकार्यांचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज वरदहस्त आणि आर्थिक हितसंबंधांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या वाळू तस्करीचा विषय गंभीर बनल्याने ती थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसताना मंगळवारी सकाळी प्रवरा नदी काठावर मॉर्निंग वॉक करणारे पर्यावरण प्रेमी अचानक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करताना तस्करांच्या वाळूने भरलेल्या शेकडो गोण्या पुन्हा नदीपात्रात रिकाम्या केल्या. इतिहासात हा प्रकार प्रथमत:च घडल्याने राजरोसपणे नदीपात्रातून सुरू असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. प्रवरा, मुळा, म्हाळुंगी अशा नद्यांचा नदी काठ लाभलेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वाळू तस्करीमध्ये गुंतल्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.अतिवृष्टीने प्रत्येक पीकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष डाळींब…
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी केली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
महाराष्ट्र संवाद न्यूज वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. आमदार थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी येथील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी नुकसानग्रस्त…
शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी महाराष्ट्र संवाद न्यूज | अहमदनगर पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी (९ एप्रिल) वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिले. वनकुटेमधील पडझळ झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना…
महाराष्ट्र संवाद न्यूज लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन ३ किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय ३० वर्ष ते ९२ वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या…
विसावं शतक मागे टाकून 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच माहिती तंत्रज्ञान उदयास आले आणि मानवी जीवनाची स्पर्धा तंत्रज्ञानाशी सुरू झाली. त्यामुळे स्पर्धा आणि गतीच्या विळख्यात मानवी जीवन अडकले. अनेक बदलांना सामोरे जात संभ्रमांच्या वर्तमानातून मार्ग काढत संघर्ष आणि अनेक स्पर्धांचं आव्हान पुढच्या पिढ्यांना झेलायची आहेत. खरंतर अनेक स्वप्न घेऊन आपण एकविसाव्या शतकात प्रवेशिलो. परंतु माध्यमक्रांतीमुळे संधीसोबत प्रचंड अशा संघर्ष आणि स्पर्धेच्या युगात त्या स्वप्नांची पडझड होतांनाचा हा काळ म्हणजे कोलाज ही कादंबरी होय. डॉ. अशोक लिंबेकर यांनी आपल्या सभोवतालचा काळ जोखताना भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचा स्वर एकत्र करत समाजवास्तवाचा आरसा आजच्या तरुणांसमोर ठेवला आहे. कादंबरीतील नायक हा ग्रामीण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ○ कृषी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’ राबविण्यात येत आहे. पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. पिकांची व्याप्ती वाढविणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषी आणि फलोत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज कोविड कालावधीनंतर वर्क फ्रॉम होम आणि विद्याथ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती व त्यातून कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो, असे प्रतिपादन संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार यांनी केले. दत्त विद्यालय, जवळे कडलग येथे ‘सायबर क्राइम’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, व्यासपीठावर मुख्याध्यापक सूर्यकांत सुर्वे , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य भास्करराव शेळके उपस्थित होते. खैरनार म्हणाल्या, आपले चुकून पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी दिल्यास किंवा तसे केल्यास त्याविरुद्ध आयटी अॅक्ट…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणार्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कोविड संक्रमणात अडचणीत आलेल्या व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याबरोबरच संस्थेने आजपर्यंत सुमारे ७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले असून ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या वर्षभरात संस्थेने अतिशय पथदर्शी कारभार केल्याने संस्थेच्या ठेवींमध्येही जवळपास ३६ टक्क्यांनी वाढ झाली असून ठेवींचा आकडा १०० कोटींच्या पार गेल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सीए कैलास सोमाणी व व्हा. चेअरमन योगेश रहातेकर यांनी दिली. संगमनेरातील पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या महेश नागरी पतसंस्थेने स्थापनेपासूनच शहरातील व्यापार-उदीमाची भरभराट…
महाराष्ट्र संवाद न्यूज, शिर्डी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत विश्वासघाताचे राजकारण केले आहे, अशा विश्वासघाती राजकारणाला भारतीय जनता पक्षात अजिबात थारा नसल्याने भाजप व ठाकरे पुन्हा एकत्र येण्याबाबत शंका असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आलेले बावनकुळे शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयावर टीका करण्यास हरकत नाही मात्र आम्ही कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही. जाणीवपूर्वक टीका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार, अजित पवार सरकारवर टीका करतात तो त्यांचा अधिकार आहे. भाजप आणि शिवसेनेचे काम बघून २०२४ मध्ये अनेकजण आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी सभागृहात अर्थसंकल्प वाचत होते, त्यावेळी विरोधकांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे, प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय वेगळे नसल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे. नांव न घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. ते म्हणाले, देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौऱ्याला नावं…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अदानी उद्योग समूहाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य करत असताना अदानी उद्योग समूहाच्या कथित गैर कारभाराबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात असताना आता पवार यांच्या समर्थनार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांचा एकत्र फोटो ट्विट करत पवारांवर टीका केली होती. त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत जोरदार टीका केली आहे. लांबा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो ट्विट केला आहे. “भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या…
रविवार विशेष लेख उध्दव ठाकरे बोलले काय आणि राज्याचे गृहमंत्री त्यावर उत्तरले काय? भलताच कॉन्फिडन्स गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा आलेला दिसतो आहे. मंत्री म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव कोण्या नेत्याने एका फालतू शब्दाने करून दिली म्हणून थेट काडतूसं घालण्याची भाषा गृहमंत्र्याने वापरावी? महाराष्ट्र इतका खाली आलाय? पोलीस आपल्या हातात असल्याचा असा फायदा कोणाला घेता आला नाही. फडणवीसांनी तो गेल्या काही वर्षांमध्ये घेतला. ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे सार्या देशाने पाहिलं. इतकं करून ते थांबत नाहीत आपल्या कृत्याची उघड भलामणही ते करतात आणि त्या निमित्ताने एखाद्याला खंडणीखोर आणि दुसर्याला देशद्रोहीही संबोधतात. सत्ता बेफाम सत्तेतला गृहमंत्री असा बेदरकार झालेला कोणी कधी…
