Author: अनंत पांगारकर

बुधवार, २ ऑक्टोंबर  पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बावधन परिसरात घडलेल्या या घटनेत तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बावधन बुद्रुक मध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली असून या धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या आधीही मुळशीमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडली होती. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता…

Read More

बुधवार, २ ऑक्टोंबर  महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला पैसे द्यावे लागत असल्याने अनुदानांच्या पैशांची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधकांनीही सरकारवर यापूर्वी टीका केली होती. उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असू द्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवले पाहिजे. सरकार हे ‘विषकन्या’ असते. ज्यांच्याबरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरवशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचे आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरवसा नसतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले…

Read More

बुधवार, दि. ०२ ऑक्टोंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. प्रेम जीवन जगणारे लोक खूप रोमँटिक मूडमध्ये असतील आणि त्यांच्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग स्वीकारतील. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक समस्यांपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळेल. तुम्ही तुमच्या आईला तिच्या मातृपक्षातील लोकांना भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकता. वृषभ – आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे आणि व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका, कारण त्यात नंतर अडचणी येण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही चांगले लाभ मिळू…

Read More

राज्यभरातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवार, ०१ आक्टोंबर  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातून संगमनेरच्या डीवायएसपी पदाचा तात्पुरता पदभार घेतलेल्या हरीश दत्तात्रय खेडकर यांची नाशिकला बदली झाली असून त्यांच्या जागेवर कुणाल शंकर सोनवणे यांची शासनाने बदली केली आहे. खेडकर आणि सोनवणे यांच्यासह राज्यातील बारा पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुणाल सोनवणे यांची संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बढतीवर दौंडला बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर संगमनेरचा पदभार हरीश खेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला…

Read More

मंगळवार, ०१ आक्टोंबर  इलेक्ट्रिक स्कुटीच्या डीक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये लांबविण्याचा प्रकार सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वर्दळीच्या लिंक रोड रस्त्यावर घडलेल्या या घटने संदर्भात अधिक माहिती अशी, जेधे कॉलनी येथील आकाश कैलास जेधे या तरुणाने यासंदर्भात मंगळवारी (०१ आक्टोंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या दरम्यान शहरातील नवीन नगर रस्त्यालगतच्या लिंक रोड येथे असलेल्या एचडीएफसी बँकेबाहेर इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले आहे. या संदर्भात संगमनेर…

Read More

मंगळवार, ०१ ऑक्टोबर मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश… मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक…

Read More

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची संकल्पना  मंगळवार, ०१ ऑक्टोंबर  यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आणि युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील नऊ गावांमध्ये अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय होणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता तालुक्यात नऊ गावांमध्ये युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे. येथे होणार अभ्यासिका व ग्रंथालय… कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री…

Read More

मंगळवार, ०१ ऑक्टोंबर कोल्हापूर : जगभरात भारताची होत असलेली प्रगती आणि सांस्कृतिक पुनरुत्थान हे पाहवत नसल्यानं हिंदूविरोधी वातावरण तयार करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोल्हापुरात कणेरी इथं सिद्धगिरी मठात आयोजित संत समावेश या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी आता संतशक्तीनं पाठबळ द्यावं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा फटका बसला असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ पैकी १४ जागांवर व्होट जिहाद झाल्याचं दिसून आलं. ठराविक वर्गातील लोकांनी हिंदुत्ववादी उमेदवाराला पाडण्यासाठी मतदान केलं. धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जवळपास दोन लाखांनी आघाडीवर होता. पण मालेगावमध्ये दुसऱ्या उमेदवाराला १.९४ लाख मते…

Read More

मंगळवार, ०१ ऑक्टोंबर कळस :- अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे. मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेले एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतांमध्ये उभे पिक पाण्यात बुडाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत. स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली…

Read More

मंगळवार, दि. ०१ ऑक्टोंबर मेष – आज तुम्ही शत्रूंपासून सावध राहा आणि कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. कुटुंबाकडून तुमच्याकडून काही अपेक्षा असतील, ज्या पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नशीब तुमच्या सोबत असेल, पण तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो. वृषभ – जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला आज नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चही वाढू शकतात. अडकलेला पैसा परत येऊ शकतो आणि चैनीच्या कामांवर खर्च होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा टाळा. मिथुन – जर तुमचे काही दिवसांपासून एखाद्याशी चांगले संभाषण होत असेल तर ते संभाषण आज थांबू शकते. तुम्ही बोलता त्या व्यक्तीला राग येऊ शकतो, ज्यामुळे संवाद…

Read More