Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच शंभर टक्के मुक्तता होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आणि मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष केंद्राचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी…
अनंत पांगारकर- कचऱ्याचे साम्राज्य, जागोजागी पडलेले ढीग आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकलेल्या एखाद्या शहराचे रूप पालटून त्याला राज्यातील एक प्रगतशील, स्वच्छ आणि ‘झाडांचे शहर’ बनवणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असते. मात्र, जेव्हा एखादी महिला आपल्या शहराला केवळ एक भौगोलिक क्षेत्र न मानता स्वतःचे मोठे घर मानते, तेव्हा तिथे परिवर्तनाची एक नवी आणि सोनेरी पहाट उजाडते. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नेमका हाच अद्भूत चमत्कार संगमनेर शहरात करून दाखवला आहे. म्हणूनच, ‘कचऱ्यात हरवलेली बाई’ अशी स्वतःची प्रांजळ आणि सार्थ ओळख करून घेत, त्यांनी कचरा निर्मूलनाचा आणि शहर सौंदर्यीकरणाचा जो वसा घेतला, तो आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक…
आजचे राशिभविष्य मेष – या राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले गेल्याने भविष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आज तुमची काही कठीण कामे सुलभ होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ – आज आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उत्तम दिवस असून जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेले प्रकल्प गतीने पुढे सरकतील. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी कानावर आल्याने घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि विठूनामाच्या जयघोषात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसह आगमन झाले. यावेळी वारकरी संप्रदायाचे पाईक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत करून दर्शन व पूजन केले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह अनेक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन रविवारी (दिनांक १२ जुलै) संगमनेर-लोणी रोडवरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स येथे होणार असल्याची माहिती पत्रकार गौतम गायकवाड यांनी दिली. सन २०११ पासून प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी या सामाजिक उपक्रमाचे सातत्याने व विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे. डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आला आहे. यापूर्वी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कालकथित प्रेमानंद रूपवते, कालकथित स्नेहाजाताई रुपवते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे,…
प्रिय डीजी सदानंद दाते साहेब, अत्यंत सचोटीचे पोलीस अधिकारी म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, कठोर अशा असंख्य उपाध्या आपल्या नावामागे आहेत. देशात जबाबदारी पेलताना आपण महाराष्ट्रात आल्यानंतर पोलीस दलात सारं काही अलबेल होईल, आपल्यासारखा प्रामाणिक कारभार करण्याचा प्रयत्न आपल्या हाताखालचे अधिकारी व कर्मचारी करतील, अशी धारणा होती. एखाद्या संस्थेचा कारभार त्या संस्थेच्या प्रमुखाच्या नावाने ओळखला जातो. संस्थेतील यशापयश प्रमुखाच्याच खात्यावर नोंदवले जाते. यामुळे आपल्यासारखा कारभार इतरांनीही करावा, ही अपेक्षा गैर नाही. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सक्षम नेतृत्व असूनही महाराष्ट्राच्या पोलिसांना झालंय काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती माधव जामदार…
आजचे राशिभविष्य मेष – आज सार्वजनिक कार्यक्रमात मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज काही कारणांमुळे मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. खर्चात विनाकारण वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. वृषभ – आजचा दिवस नवीन कामाच्या नियोजनासाठी अत्यंत अनुकूल आहे. मनात आशेचे नवीन किरण निर्माण होतील. आर्थिक बाबतीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. लांबचा प्रवास आज टाळावा. व्यापारात प्रगती होईल आणि नवीन दिशा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. मिथुन – व्यवसायाच्या बाबतीत आज अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने मन थोडे निराश होऊ शकते, परंतु संयम ठेवावा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने परिसरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकूण १२१ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रतिबंधक कारवाईची विशेष मोहीम आणि समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्म्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेअंतर्गत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी हजर होते, यामध्ये सर्वाधिक ३५ आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तर १७ आरोपी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील होते. या सर्व गुन्हेगारांचे प्रथम गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित इंट्रोगेशन फॉर्म भरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर खुर्दमधील प्रसिद्ध ‘हॉटेल रंगीला पंजाब’वर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या हॉटेलचा मद्यविक्रीचा परवाना (एफएल-३ परवाना क्रमांक ११५६) ३० दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले असून, प्रशासनाने हे हॉटेल तातडीने बंद केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर-१ विभागाच्या दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने या हॉटेलची अचानक आणि सविस्तर तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या. यामध्ये प्रामुख्याने विहित नमुन्यातील मद्यविक्रीच्या नोंदवह्या वेळेवर अद्ययावत न ठेवणे, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे अधिकृत नोकरनामे व माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ठाणे: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, विधीमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यांना व्हायरल फिव्हर आणि अतिताणाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने देखरेख ठेवून असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांत राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी आणि सततच्या धावपळीमुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना…
