Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर जवळील कासारा दुमाला येथील भोलेनाथ दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्वच मुलांना स्कूल बॅग, वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. या सामाजिक उपक्रमासाठी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेश गुंजाळ यांनी संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. संस्थेच्या स्थापनेला ४४ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे सहा कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संस्थेचे दैनंदिन दूध संकलन सुमारे ४५००…
अकोले: चांगले शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मुख्य पाया असून, शिक्षकांचे समर्पित योगदान आणि त्याला लाभलेली ग्रामस्थांची भक्कम साथ यांमुळेच शिंदेवाडी शाळा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी काढले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे श्री व श्रीमती रामनारायणजी बुब ट्रस्टच्या वतीने शाळेसाठी अत्याधुनिक इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड व ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच अनिकेत बॅटरी हाऊसकडून शाळेला इन्व्हर्टर बॅटरी देणगी म्हणून देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पण व वाटप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अनिल गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच संतोष आंबरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून…
भांडुपचे एकेकाळचे अनभिषिक्त नेते, ज्यांच्या नावावर गिरणी कामगारांच्या असंख्य चळवळी झाल्या; जे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील काही मोजक्या नेत्यांमधील एक होते, अशा दिना बामा पाटील यांची पुण्याई अनेक वर्षे त्यांचे पुत्र खासदार संजय पाटील यांच्या कामी आली. सत्तरीच्या दशकात मुंबईत विशेषत: भांडुप, मुलुंड आणि पूर्व उपनगरात सामान्यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिना बामा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख मोठा होता. या विभागाचे आमदार म्हणून त्यांनी १९८५ मध्ये निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. शिवसेनेसारख्या बालेकिल्ल्यात एक काँग्रेसचा कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, हे तेव्हा दिनांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. इतकी लोकप्रियता या नेत्याची होती. मुंबईची कामगार चळवळ असो की गिरणी कामगारांची…
आजचे राशिभविष्य मेष: व्यावसायिक पातळीवर चढ-उतार पाहायला मिळतील, मात्र त्यामुळे खचून न जाता धैर्याने काम करावे. भविष्याचा विचार करता आज घेतलेले आर्थिक निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यासाठी संबंधितांशी संवाद साधावा लागेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांकडून सुखद वार्ता समजेल. वृषभ: आज एखादा महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जुन्या कष्टांचे योग्य फळ मिळाल्याने समाधान लाभेल. घर किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय कौटुंबिक संमतीने यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने नियोजित परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. या अत्यंत संतापजनक प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आणि कष्टावर पुन्हा एकदा पाणी फिरले असून, यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत घणाघात केला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे तरुणांचे भविष्य पूर्णपणे धोक्यात आले असून, या गैरप्रकाराला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पेपरफुटी ही जणू नित्याचीच बाब बनली असून, कोणतीही भरती प्रक्रिया किंवा पात्रता परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: NEET परीक्षांमधील गोंधळानंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर उद्या होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या तब्बल ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा अन्याय झाला असून, राज्यातील ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश यातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याची घणाघाती टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी ‘परीक्षा पद्धत’ झाली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत आमदार तांबे यांनी सरकारवर निशाणा साधला. सातत्याने होणाऱ्या अशा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर ‘दुहेरी निष्ठा’ दाखवल्याचा आरोप करत, त्यांना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदू संमेलनात उपस्थित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यांच्या संस्थापकांची स्तुती करणाऱ्या नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ आणि केवळ पोलीस दलाच्या कर्तव्याशी आणि निष्पक्षतेशीच असायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यात भरवली जाणारी हिंदू संमेलने ही वरकरणी अराजकीय दाखवली जात असली तरी त्यामागे निश्चितपणे राजकीय हेतू…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कोणत्याही नवीन योजनांवर विचार करताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील, मात्र मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नवीन गुंतवणूक करताना घाई गडबड करू नका. वृषभ: व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय लाभदायी ठरेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि पूर्वी घेतलेले कष्ट आता सार्थकी लागतील. प्रगतीचा वेग वाढल्यामुळे काही प्रमाणात अतिरिक्त भांडवलाची गरज भासू शकते. नोकरदार वर्गाला नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मिथुन: तुमच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या आणि अवैध गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या गुन्ह्याची व्याप्ती आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या अत्यंत बारकाईने तपासादरम्यान काल या प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली. डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय ५४, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो बीएएमएस असून या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असून, आज आरोपीला राहता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने तंत्रज्ञानाची कास धरत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारखान्याच्या नूतन व अद्यावत अशा भव्य प्रशासकीय इमारतीच्या छतावर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, याचे भव्य लोकार्पण नुकतेच झाले. विजेची वाढती मागणी आणि निर्माण होणारा तुटवडा पाहता, भविष्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज बनली असून थोरात कारखान्याचा हा प्रकल्प इतर कारखान्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. या विशेष लोकार्पण सोहळ्याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक, कार्यकारी संचालक…
