Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजकुमार गांधी यांची तर उपाध्यक्षपदी आनंद दरडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कांतीलाल गांधी, उपाध्यक्ष प्रितेश पारख यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. यासाठी सोमवारी सहकार अधिकारी ए. एस. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी आणि उपाध्यक्षपदासाठी आनंद दरडा यांनी आपले अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदी राजकुमार गांधी व उपाध्यक्षपदी आनंद दरडा या दोघांच्याही निवडी बिनविरोध पार पडल्या. अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी यांचे नाव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये येत्या शनिवारी २२ एप्रिलला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २५ वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा संगमनेर तालुक्यातील २५ जोडपी विवाहबद्ध होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास दहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली. मालपाणी उद्योग समुहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी १९९७ साली या उपक्रमाची सुरुवात केली. लोकहिताचा हा उपक्रम जनतेच्या उस्त्फुर्त प्रतिसादाने रौप्यमहोत्सवी ठरला आहे. गेल्या अडीच दशकांत या सोहळ्याच्या माध्यमातून बाराशेहून अधिक परिवार एकमेकांशी जोडले गेले. अवघ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज वादळामुळे शेतामध्ये तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने कृषी व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे रविवारी (१६ एप्रिल) सकाळी घडली. विजय साहेबराव पवार (वय ४६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पवार हे रविवारी सकाळी आपल्या शेतामध्ये डाळिंब बागेला औषध मारत होते. शनिवारी झालेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून त्यांच्या शेतात पडलेल्या होत्या. या तारेतून वीज प्रवाह सुरू असल्याने पवार यांचा झालेला धक्का लागला. त्यामुळे जोराचा शॉक बसल्याने ते जागीच कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने संगमनेरमध्ये उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू…
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याच्याजवळ झोपतेस अशी विचारणा करत दोघांनी तिचा ब्लाउज फाडून विनयभंग केला तर फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याला दारातच अडवून बांबू आणि कोयत्याने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी कामानिमित्ताने संगमनेर येथे आलेला होता. त्याचवेळी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी एकत्रित जमवत फिर्यादीच्या घरी जाखुरी येथे जात फिर्यादीकडे कामास असलेल्या महिलेस तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याचे जवळ झोपतेस, असे म्हणत दोघा आरोपींनी तिचा ब्लाउज फाडून…
महाराष्ट्र संवाद | रविवार विशेष गौतम अदानींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, पूर्वी टाटा, बिर्ला यांचीही अशीच नावं घेतली जायची, या प्रकरणाची जेपीसी चौकशीची आवश्यकता नाही, जेसीपीत सत्ताधाऱ्यांचा भरणा असतो, मोदींना त्यांच्या शिक्षणावरील मुद्यावर जाणीवपूर्वक अडवलं जात आहे. ही सारी वक्तव्य बारामतीच्या पवार कुटुंबाकडून उघडपणे येऊ लागली तेव्हाच पाल चुकचुकली. काहीतरी विपरीत घडतं असल्याची चाहूल लागली. देश मोदींच्या नावाने खडे फोडत असताना बारामतीच्या शरद पवारांना आणि त्यांचे पुतणे अजित पवारांना अदानी आणि मोदींचं भरतं आलेलं पाहून सारा देश चकित झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोघं नवा अध्याय तयार करायला निघाले आहेत असा साऱ्यांचा समज होता. त्यांना वाटलं लोक आपल्या…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भारताचे संविधान हे जगातील अतिशय उत्कृष्ट असे संविधान असून मानवतेच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत संगमनेर साहित्य परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभदिनी हॉटेल सत्यशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, सचिव दिलीप उदमले, वाचन मंडळ प्रमुख मनोज साकी, प्रकल्पप्रमुख गिरीश सोमाणी, प्रा. शशांक गंधे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ३० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून संगमनेरच्या न्यायालयात होणाऱ्या या लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाने केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संगमनेर तालुका वकील संघ, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून प्रलंबित दिवानी दावे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, नियमांतर्गत तडजोड होणारी फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, घरगुती हिंसाचार, विद्युत कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे, बँकांकडील वसुली दावे, भू-संपादन, लवाद अर्ज व दरखास्त आदी स्वरूपांच्या प्रकरणांचा निपटारा या लोक अदालतीमध्ये करण्यात येणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज जलजीवन मिशनच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा एका बालिकेच्या जीवावर बेतला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम सुरू आहे. खोदलेल्या चारीतील पाण्यात पडून सात वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. मधुबाला शाम साळुंखे (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. एकीकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शुक्रवारी (ता.१४) दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नारायण जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधुबाला ही नारायण जगन्नाथ पवार यांचे नात असून ते…
शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना एसएमबीटी रुग्णालयातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. रामनवमी उत्सवावेळी शिर्डीमध्ये झालेल्या पाळणा दुर्घटनेमध्ये साळवे आणि साबळे या सर्वसामान्य कुटुंबातील पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या कुटुंबीयांची माजी मंत्री थोरात यांनी भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी तातडीने धामणगाव येथील एसएमबीटी या सेवाभावी रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे.…
शिर्डी, महाराष्ट्र संवाद न्यूज सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहाता पंचायत समितीचे…
राज्यघटनेच्या विरुद्ध विचार मांडत जातीभेद निर्माण करून राजकारण..! माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज विविध भाषा, वेशभूषांच्या या देशांमध्ये संविधानाने सर्वांना एकत्रित ठेवले आहे. संविधानाचे तत्व जपण्याचे प्रत्येकाची जबाबदारी असताना काहीजण मात्र या राज्यघटनेच्याच तत्त्वाच्या विरुद्ध विचार मांडत आहे. आपसात जातीभेद निर्माण करून राजकारण केले जात आहे. एका विशिष्ट समाजाचे राज्य निर्माण करण्यासंदर्भातील विधाने दुर्दैवी असून सर्वांचा विकास आणि समता असलेला राज्यघटनेचा विचार शाश्वत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.…
अहमदनगर – महाराष्ट्र संवाद न्यूज दुबईहून आलेले तीन दहशतवादी मुंबईत घुसले आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, अशी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अहमदनगरमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यासिन सय्यद (वय ४७) असे आरोपीचे नाव असून त्याला महाराष्ट्र एटीएसने अहमदनगर येथे कारवाई करत ताब्यात घेतले. व्यक्तिगत वैमनस्यातून आरोपीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये ७ एप्रिलला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. आरोपी सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईत दहशतवादी घुसल्या संदर्भात माहिती दिली होती. दुबईहून आलेले तिघे दहशतवादी शुक्रवारी सकाळी मुंबईत घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असे…
मुंबई – महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर राजकीय वातावरण तापलेल असतानाच फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक जण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक जण आमच्याकडे भाजपात आले. संपर्काच्या नात्यांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर संगमनेर शहरातील चार मोठ्या बँकांना बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच आता मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात श्री. कुलस्वामीनी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघां…
मुंबई| महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त लाभला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जिल्हा युवा अधिकारीपदी अमित रामकिसन चव्हाण (संगमनेर, अकोले, राहाता) यांची फेरनिवड करण्यात आली. युवा सेनेच्या नव्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकार्यांचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज वरदहस्त आणि आर्थिक हितसंबंधांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या वाळू तस्करीचा विषय गंभीर बनल्याने ती थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसताना मंगळवारी सकाळी प्रवरा नदी काठावर मॉर्निंग वॉक करणारे पर्यावरण प्रेमी अचानक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करताना तस्करांच्या वाळूने भरलेल्या शेकडो गोण्या पुन्हा नदीपात्रात रिकाम्या केल्या. इतिहासात हा प्रकार प्रथमत:च घडल्याने राजरोसपणे नदीपात्रातून सुरू असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. प्रवरा, मुळा, म्हाळुंगी अशा नद्यांचा नदी काठ लाभलेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वाळू तस्करीमध्ये गुंतल्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.अतिवृष्टीने प्रत्येक पीकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष डाळींब…
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी केली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
महाराष्ट्र संवाद न्यूज वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. आमदार थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी येथील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी नुकसानग्रस्त…
शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी महाराष्ट्र संवाद न्यूज | अहमदनगर पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी (९ एप्रिल) वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिले. वनकुटेमधील पडझळ झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना…
महाराष्ट्र संवाद न्यूज लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन ३ किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय ३० वर्ष ते ९२ वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या…
