Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा प्रकार अकोले तालुक्यात समोर आला आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या गायब झालेल्या मुलींचा शोध घेत आहेत. अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कापड दुकानात काम करणारी अल्पवयीन मुलगी अनपेक्षितरित्या गायब झाली आहे. तर राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावातील मंदिरामध्ये हरिपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसात तालुक्यातून दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याने व त्यांना अज्ञात व्यक्तीने पळविले असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केल्यामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संगमनेरच्या श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. इयत्ता पाचवीमधील चौदा तर इयत्ता आठवीमधील चार विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश असल्याची माहिती विद्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्य व जिल्हा पात्र विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून सर्वच्या सर्व अठरा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नील अमोल गायकवाड यांने ११ वा क्रमांक, नमिता मंगेश सांगळे हिने २६ वा क्रमांक, श्रद्धा योगेश दुर्गुडे हिने ३८ वा क्रमांक, दीपज्योत प्रदीप शेळके याने जिल्ह्यात ४७ वा क्रमांक, संस्कृती संदीप भोर हिने ५८…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. संस्कार सचिन कडाळे (इयत्ता पाचवी), अनिष कैलास नेहे, प्रतीक्षा दत्तात्रेय गुंजाळ, निकिता रावसाहेब नेहे व साहिल राजेंद्र साळुंके (इयत्ता आठवी) अशी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. हे पाचही विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेचा (२०२२) निकाल नुकताच जाहीर झाला असून यात चंदनेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असल्याने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिले जाणारे २०२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारार्थीमध्ये संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांच्या इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकाचा देखील समावेश आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात संगमनेरचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. इलेक्शन बिलेक्शन, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांचा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारात समावेश आहे. पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची घोषणा शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केली. पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने लेखक, कवी यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारीला साजरी होत आहे. या दिवशी नगरमध्ये अहमदनगर प्रेस क्लबच्यावतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध दैनिकांमध्ये कार्यरत असणार्या पत्रकारांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पत्रकारीता क्षेत्रात मोलाची कामगीरी बजावणार्या पत्रकारांना पत्रकारितेतील मान्यवरांच्या नावाने यावर्षीपासून स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार असल्याची माहिती अहमदनगर प्रेस क्बचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली. अहमदनगर प्रेस क्लबच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणार्या प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांबद्दल चर्चा करण्यात आली व…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपसातील जागेचे वाद आणि सलूनचे दुकान तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबीयांमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार वाद झाले. पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या या वादामध्ये दोन्ही कुटुंबीयातील बावीस जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. राजेंद्र यादव सस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गावी गेलेले असताना जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ, भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ, सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शासनाने गौण खनिजा संदर्भात केलेल्या जाचक नियम आणि कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय कोलमडून पडला असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पुरवठादार मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ७ डिसेंबर) या व्यवसायाशी निगडित पुरवठादार मजूर आणि कामगारांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे संपर्क कार्यालय असलेल्या यशोधन इमारतीपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्र हे पायाभूत विकासाचे क्षेत्र आहे. मात्र याबाबत नगर जिल्ह्यात आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून या क्षेत्राशी निगडित असलेले कामगार, मजूर, पुरवठादार यांची गेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छात्र भारती संघटना, परमपूज्य गगनगिरी विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून रॅली देखील काढण्यात आली होती. गावातील शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह महिला, गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी गावातून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या कामामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल वाहतुकीस बंद आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने होणे शक्य नसल्याने जवळच कमी उंचीचा कॉजवे पूल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेत गणपुले यांनी ही मागणी केली आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेला हा पूल तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून मिळविलेल्या निधीतून या पुलाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील दोघा वाळू तस्करांना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (रा. धांदरफळ खुर्द ता. संगमनेर) आणि अरबाज करीम शेख (रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी या दोघा वाळूतस्करांची नावे आहेत. सातत्याने वाळू तस्करी करताना आढळल्याने संगमनेर शहर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षकांमार्फत हे प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले होते. प्रांत अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भातील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही वाळू तस्करांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. राज्याचे महसूल मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्यानंतर जिल्ह्यात वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मन स्वास्थ्यासाठी योग व प्राणायाम अतिशय महत्त्वाचा आहे. योगमित्र डॉ. सुधाकर पेटकर गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने न थकता योगा व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून तरुणांना लाजवतील असे महान कार्य करत असल्याचे गौरवोद्गार नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. संगमनेरमधील भंडारी मंगल कार्यालयात २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था, योगवर्धिनी, आधार फाउंडेश, संगमनेर साहित्य परिषद, रोटरी क्लब, निमा आणि महेश ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या योग व प्राणायाम शिबिराच्या रोप्यमहोत्सवी समारोपावेळी आमदार सुधीर तांबे बोलत होते. यावेळी सेवाभावी क्षेत्रात काम करणारे ऋषिकेश मोंढे, प्रदीपभाई शहा, गणेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये मोठया प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या वाढलेल्या चोऱ्यांसह वाढलेले सायबर क्राईम हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी याबाबत खंबीर भूमिका घेत तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आमदार तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे. याकरता पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस मित्र संघटनेची ही मदत घ्यावी तसेच गावागावातील तरुणांनाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सरपंचाच्या घरी डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ लाख रुपयांची केबल चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यातील निमोण येथे घडला आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. निमोणचे विद्यमान सरपंच संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय संजय जाधव (वय २४ वर्षे रा. बालमटाकळी ता. शेवगाव) याच्यासोबत त्याच्या दोघा साथीदारांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील जाधव याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी मध्यरात्री सफेद रंगाच्या स्कार्पिओमधून (क्रमांक ८०५५ पूर्ण क्रमांक माहिती नाही) आलेल्या आरोपींनी घरासमोर ठेवलेली १४,१७,४१६/-रुपये किमतीचे पंधराशे मीटर लांबीचा एक पंचवीस स्वेअर्स एम.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्त्यांच्या विविध कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी संगमनेर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारकडून थोरात यांनी मोठा निधी उपलब्ध करत तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर विविध विकासाच्या योजना राबविल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२०२३ मधून येथील देखील तालुक्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची व यातून तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. १७१…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : संगमनेर शहरालगत असलेल्या पावबाकी, सुकेवाडी येथे दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघा दरोडेखोरांना पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. असे असले तरी स्थानिक शहर पोलिस मात्र या दरोड्यासह खूनाच्या अन्य एका प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहेत. संगमनेरातील दरोड्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक पोलिसांसह नगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस पथक परिश्रम करत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले असून त्यांनी संगमनेरातील दरोड्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळते. याशिवाय या गुन्हेगारांच्या टोळीने जिल्ह्यात अन्यत्र दरोडे घातल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. नगर एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक अनिल…
रविवार विशेष 🔹प्रवीण पूरो गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या मागे लागलेली इडीची पिडा आता संपायला हरकत नाही. खोट्याचं खरं फारकाळ होत नसतं. आणि सत्ताधार्यांच्या नादी लागून तर अजिबात नाही. लाज, लज्जा त्या विभागाची जात असते. घडवून आणणारा राजकारणी तिथेच असतो. इडीने आजवर केलेल्या कारवायांकडे पाहाता आता तरी इडीचे अधिकारी शहाणे होतील, अशी अपेक्षा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून जबाबदारीवर असलेल्या अनील देशमुख यांना ते मंत्री असताना इडीने ताब्यात घेतलं. त्यांच्यावरील आरोपाचे कोणतेही पुरावे नसल्याने इडीच्या जोखडातून न्यायालयाने त्यांना मोकळं केलं आहे. देशमुख यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने इडीविरोधात नोंदवलेल्या शेर्यांचा विचार करता यापुढे कोणालाही ताब्यात घेताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ग्रामसभा सुरू असताना सार्वजनिक कामाबाबत प्रश्न विचारला म्हणून प्रश्न विचारणाऱ्यास शिवीगाळ आणि लाथाबुक्क्याने मारहाण करत विरोधात बोललास तर कायमचा संपवून टाकेल, अशी धमकी गाव कारभाऱ्यांनी दिली. एवढ्यावरच समाधान न मानता या सामाजिक कार्यकर्त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तोंडात औषध टाकत दोन गाड्यांमधून आलेल्या गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करत जबर मारहाण करण्याचा प्रकार तालुक्यातील पठार भागात घडला. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे यांनी साकूर ग्रामसचिवालयात सुरू येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नाही. म्हणून पाणीपुरवठा का बंद आहे असे विचारणा ग्रामसेवकाला केली असता संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर हनुमंत खेमनर त्याला म्हणाले, तुझा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : गेल्या चार दिवसांपासून संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. दोन स्वतंत्र वयोगट आणि योगासनांच्या पाच प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करत १९ सुवर्ण पदकांसह २७ पदके पटकावित अजिंक्यपदावर मोहर उमटवली. उपविजेतेपद पाच रौप्य व सहा कांस्य पदके मिळवणार्या पश्चिम बंगाल संघाने तर तिसरे स्थान एका सुवर्ण पदकासह चार पदके मिळवणार्या तामीळनाडू संघाने मिळवले. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणार्या खेळाडूंना खेलो इंडिया आणि एशियन गेम्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मंगळवारपासून (ता. २७) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या तक्रार अर्जावरून तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी तसेच सदरचा अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली. प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखावर सेटलमेंट करणाऱ्या या उपनिरीक्षकाला एसीबीने तुरुंगाची हवा दाखविली आहे. रोहित गणेश डोळस (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रार अर्जासंदर्भात डोळस याने तक्रार अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी तसेच एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी दोन…
पालिका, महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी लाभणार? महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : नाशिक, अमरावती या दोन पदवीधर मतदार संघासोबत औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने त्या संबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असली तरी बहुचर्चित ठरलेल्या पालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप आयोगाला मुहूर्त सापडलेला नाही. गेल्या तीन टर्मपासून आमदार डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत सक्षमपणे प्रतिनिधित्व करत आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांची विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली होती. तांबे यांच्यासह अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण…
