Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य मेष – आज कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. नवीन जबाबदाऱ्या सहज पार पाडाल, पण घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. वृषभ – आर्थिक बाजू सुधारण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तीशी गैरसमज होऊ शकतो. मिथुन – आज संवादकौशल्याचा फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचा योग संभवतो, पण आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. कर्क – मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे शांत राहून विचार करा. घरगुती कामात व्यस्त राहाल. आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सिंह – आज तुमचे नेतृत्वगुण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे सामाजिक एकोपा आणि परंपरा जपणाऱ्या सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती लावून नवदांपत्यांसह आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या मंगलमय सोहळ्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ, संगमनेर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य भगवान जोशी, लीनाताई क्षत्रिय, मालपाणी उद्योग समूहाचे रमेश घोलप, माजी सरपंच तानाजी आहेर, किशोर बांगर, मनोज बांगर आणि पत्रकार सुशांत पावसे आदी मान्यवर उपस्थित होते. सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून होणारा खर्चाचा ताळमेळ साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. पारंपरिक वेशभूषा, मंगल वाद्यांचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – प्रत्येक पात्र नागरिकाचा मताधिकार सुरक्षित ठेवणे ही लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी असून, मतदार याद्यांची बारकाईने तपासणी करून चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या नावांचा शोध घ्या आणि संबंधित मतदारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मदत करा. काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मताधिकाराच्या रक्षणासाठी काम करतील, असे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. संगमनेर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी उत्तर व दक्षिण आणि अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठक व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देणाऱ्या अत्याधुनिक कवी अनंत फंदी बंदिस्त नाट्यगृहाचे लोकार्पण सोमवारी (दिनांक २३ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता होणार आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाट्यप्रयोगांनी या नूतनीकरण झालेल्या रंगमंचाची तिसरी घंटा वाजणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली. संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या एक हजार आसन क्षमतेच्या अद्ययावत वास्तूमुळे शहरातील नाट्यरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार डॉ. सुधीर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजकारणात पदे येतात आणि जातात; मात्र पद नसतानाही जनतेकडून मिळणारा सन्मान आणि विश्वास हीच खरी कमाई असते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. अस्तगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि ‘नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल’ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अस्तगावसह पंचक्रोशीतील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अस्तगाव व परिसरातील गावांमध्ये १० कोटी ४१ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीच्या विकासकामांचे लोकार्पण यावेळी झाले. सुरुवातीला वर्गणीतून व्यापारी संकुल उभारण्याचा विचार होता, मात्र पंक्चर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कमी कालावधीत अधिक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणातील फरार आरोपींची ठोस माहिती देणाऱ्या नागरिकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन’ यांच्याकडून पोलीस प्रशासनाच्यावतीने हे बक्षीस जाहीर झाले असून, श्रीरामपूर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत काही ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर शिवार (ता. श्रीरामपूर) येथे ‘ग्रो-इन्हेस्टर’ कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर व परिसरातील नागरिकांकडून मोठ्या परताव्याचे आमिष देऊन रकमा स्वीकारल्या जात होत्या. या माहितीच्या आधारे तक्रारीची वाट न पाहता…

Read More

प्रवीण पुरो – राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील कर्तबगार नेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या मृत्यूला आता वर्ष होईल. या सचोटीच्या नेत्याच्या मृत्यूलाही न्याय न देणारी देशातील बांडगूळं सध्या दादांच्या नावाने गळे काढत आहेत. ही माणसं इतकी स्वार्थी, माणूसघाणी आणि मतलबी आहेत की याची तुलना नाही करता येत. ज्या दादांना यांनी सळो की पळो करून सोडलं तेच आज दादांच्या आरत्या ओवाळू लागले आहेत. दादांच्या कथित अपघाताचं कारण बनलेल्या घटनेची म्हणजे झालेल्या विमान अपघाताची साधी चौकशी न करणारी बांडगूळं आता डोळ्यात नक्राश्रू आणत श्रद्धांजलीचं नाटक करत आहेत. या नाटकाचा एक अंक नुकताच पुण्यात पार पडला. पुणे जिल्हा परिषदेने उभारलेल्या दादांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या…

Read More

राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याने पुन्हा एकदा भारतीय राजकारणात महत्त्वाची चर्चा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये कोलंबिया विद्यापीठ आणि शिकागो विद्यापीठातील त्यांच्या संवादांमध्ये विद्यार्थी चळवळी, लोकशाही, रोजगार, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि जागतिक राजकारण यांसारख्या विषयांचा समावेश होता. या दौऱ्याचा अर्थ केवळ विदेशातील भाषणे एवढाच मर्यादित नाही. भारतातील प्रश्नांना जागतिक संदर्भ देणे आणि भारतीय लोकशाहीचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवणे, हीदेखील राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे, जागतिक नेत्यांशी भेटी, विविध देशांशी करार आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील उपस्थिती यांचे महत्त्व नाकारता येणार नाही. मात्र, विदेशातील छायाचित्रे आणि स्वागतसमारंभ यांना देशाच्या यशाचे अंतिम प्रमाण मानता येणार नाही. प्रश्न असा आहे की, या…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष – कामाच्या ठिकाणी उत्साह राहील आणि रखडलेली कामे पुढे सरकतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ – आर्थिक बाजू भक्कम राहील आणि कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल, खर्चावर थोडे लक्ष ठेवा. मिथुन – संवाद साधताना काळजी घ्या, नवीन कल्पना सुचतील आणि मित्रांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कर्क – मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते, घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पण संयमाने परिस्थिती हाताळा. सिंह – आत्मविश्वास वाढलेला राहील आणि मानसन्मान मिळेल, महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कन्या – कामाचे नियोजन नीट करा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अनावश्यक वाद टाळा. तूळ – नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील आणि कला किंवा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मानव-बिबट संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासह आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात शुक्रवार (दि. २०) वनविभागाच्या कामकाजाचा आमदार खताळ यांनी आढावा घेतला. या बैठकीत प्रस्तावित वनभवन इमारतीचे काम तसेच निझर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर येथील वनपर्यटन विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेत वनविभागाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी जिल्हा नियोजन…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी नवे विचार मांडण्यास संकोच करू नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील आणि महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. वृषभ – आर्थिक बाबींमध्ये आज संयम ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. जुन्या ओळखींमधून एखादी चांगली संधी चालून येण्याची शक्यता आहे. मिथुन – संवादातून अनेक प्रलंबित प्रश्न सुटतील. मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबतचे मतभेद मिटवण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. प्रवासाचा योग संभवतो, मात्र आरोग्याची काळजी घ्या. कर्क – भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरण शांत ठेवण्यासाठी सामंजस्याने वागा. कामाचा ताण थोडा जाणवेल, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात (गु.र.नं. १२०२/२०२६) संघटित गुन्हेगारी टोळीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १११ अन्वये वाढीव कलम लावण्याची कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केली आहे. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, टोळीप्रमुखासह पाच जण अद्याप फरार आहेत. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विनीत विक्रांत शिर्के (उपविभागीय अधिकारी, राहुरी) हे आपल्या शासकीय वाहनातून चालकासोबत मालुंजा येथील शासकीय लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून लाख, जातप, बेलापूर मार्गे चिंचोली गावाकडे जात होते. गंगापूर गावच्या शिवारात रस्त्यावर त्यांना विना क्रमांकाचा हायवा डंपर आढळून आला. त्यांनी डंपर थांबवून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करण्यापूर्वी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकासाचा हिशेब द्यावा, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी आमदार अमोल खताळ यांना दिले आहे. संगमनेरचा स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीचा इतिहास-भूगोल उकरण्यापेक्षा तालुक्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटापर्यंतचा राजकीय प्रवास करणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या इतिहासावर भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकांचा इतिहास तपासावा, अस शेलकर यांनी म्हटलं आहे. लोणीच्या मालकांची परंपरा पुढे नेत ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे उचकून’ अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. संगमनेरच्या हक्काची पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे वळवली…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आज कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह वाढलेला राहील आणि नवीन संधी समोर येऊ शकतात. आर्थिक नियोजन नीट करा आणि अनावश्यक खर्च टाळा. वृषभ – कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे, मात्र बोलण्यावर संयम ठेवा. मिथुन – आज नवीन संपर्क निर्माण होतील आणि प्रवासाचा योग संभवतो. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कर्क – भावनिक निर्णय घेताना काळजी घ्या. घरगुती वातावरण आनंदी राहील आणि जुन्या ओळखीमधून एखादा फायदा होऊ शकतो. सिंह – तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण आज उठून दिसतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे, पण अहंकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील एसटी प्रवाशांची ऊन, वारा आणि पावसापासून होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, तालुक्यातील लोहारे, निळवंडे, मांची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द आणि वरवंडी फाटा या सात महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत प्रवासी निवारा थांबे उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयाअंतर्गत संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ७५ प्रवासी मार्ग थांबे उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एसटी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी-साकूर दरा परिसरातील खोल दरीत ४५ वर्षीय विवाहित महिलेचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मनिषा रामनाथ चाचण असे मृत महिलेचे नाव असून, ती बेपत्ता असल्याची नोंद घारगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीच करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मनिषा चाचण आपल्या कुटुंबीयांसह खंडेरायवाडी-साकूर दरा येथे वास्तव्यास होती. गुरुवारी सकाळी काही तरुण या परिसरात गेले असता त्यांना रक्ताचे डाग निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत याची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज गुरुवारी संगमनेरमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी आरोप केला की, राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन पाळला जात असताना शायना एनसी आणि संजय निरुपम यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला आहे. हेच यांचे बेगडी प्रेम आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. या कृत्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘Belonging : Journey of Love’ या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या प्रकाराचा संगमनेरमध्ये निषेध करण्यात आला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने शहरात जाहिर निषेधाचा फलक बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर लावण्यात आला असून, या माध्यमातून संबंधित कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. थेट राहुल गांधी समर्थक संघाने या प्रकाराचा निषेध केला आहे. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडण्याचा प्रकार हा केवळ एका राजकीय नेत्याचा अपमान नसून भारतीय लोकशाही, महिलांचा सन्मान आणि काँग्रेसच्या विचारधारेचा अपमान असल्याची भूमिका या फलकावर मांडण्यात आली आहे. पुस्तकाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळ्याचा संशय आल्याने एक पोलीस शिपाई रकमेसह पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. हरेश्वर यशवंत शेंडे (वय २६, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, व्ही. पी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे, तर धनंजय दिलीप वायसे (व्ही. पी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) हा पसार झालेल्या आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास हरेश्वर शेंडे यांच्याकडे होता.…

Read More