Author: Annant Ppangarkar

दैनिक राशीभविष्य: १८ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा असेल. मानसिक शांततेसाठी तुम्ही अध्यात्माकडे वळाल. व्यवसायात गुंतवणुकीचे विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे, परंतु कागदपत्रांची पडताळणी नीट करा. जोडीदारासोबत काही कारणावरून छोटेखानी वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम…

Read More

अहिल्यानगर – जिल्ह्यात सन २०२६ मधील सण व उत्सवांच्या काळात एकूण १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०१७ नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून, श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहील. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या या १५ दिवसांमध्ये १९ फेब्रुवारी रोजीची शासकीय शिवजयंती, १४ एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन व २६ ऑगस्ट रोजीच्या ईद-ए-मिलादचा समावेश आहे.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शिर्डीच्या गोल्डन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या राज्यस्तरीय 50 बॉल क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा संघ चॅम्पियन ठरला. राज्यातून आलेल्या विविध शालेय संघांचा समावेश असलेल्या या अतितटीच्या स्पर्धेत ध्रुवच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना 11 सुवर्ण पदकांसह पाच चषकांची कमाई केली. शाळेच्या तेज जैनला ‘प्लेअर ऑफ द चॅम्पियन’ तर, प्रणव काकडेला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. याशिवाय शाळेच्या खेळाडूंनी अन्य व्यक्तिगत पुरस्कार पटकावताना या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेवर आपला ठसा उमटवला. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पंधरा वर्षांखालील मुलांच्या संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी 50 चेंडूचे सामने खेळवण्यात आले. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ध्रुवच्या संघाने पुणेसंघाचा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून, ४० कलावंतांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य शिवभक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष…

Read More

आजचे राशीभविष्य: १७ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत काही नवीन योजना आखण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. जोडीदारासोबतचा वेळ आनंदाचा जाईल आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूरचे सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याला न्यायालयाने दोषी ठरवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वसुली पथक श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. २, सुभेदार वस्ती भागात थकीत वीज बिल वसुलीसाठी आणि कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते. ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी पथक पोहोचले असता, ग्राहक, त्यांचा मुलगा गणेश गांगुर्डे आणि पत्नी बबीता गांगुर्डे यांनी वीज बिल…

Read More

संगमनेर: प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत आणि व्यापारी केंद्र असलेल्या संगमनेर शहराला आता ‘स्मार्ट’ आणि ‘शिस्तबद्ध’ बनवण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यामुळे संगमनेर करांच्या दैनंदिनी मध्ये एक महत्त्वाचे वळण येणार आहे. ‘संगमनेर २.०: इट्स टाइम टू अपग्रेड’ या विशेष मोहिमेद्वारे शहराचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला असून, येत्या १ मार्च २०२६ पासून शहरात नवीन आणि कडक नियमावली लागू केली जाणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी शहरवासीयांना, व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना शहराच्या सुव्यवस्थेसाठी मनापासून सहकार्य करण्याचे भावूक आवाहन केले आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ (फुटपाथ) मोकळे असणे ही काळाची…

Read More

अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांच्या कार्यालयातील पथकाला अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे आणि राजेंद्र बिरदवडे हे पथक गस्त घालत होते. यावेळी धामणगाव पाट…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याच्या घटनेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी संगमनेर बसस्थानक परिसरात शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. सपकाळ यांनी केलेले विधान हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारे असून, यामुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मालेगावमधील फोटो प्रकरणाने आधीच चीड…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहर आणि परिसराची तहान भागवणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चक्क वीज पोल उभे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर चुकीमुळे हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, राहुल गांधी समर्थक संघ (TEAM RGSS) महाराष्ट्र आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत. यामुळे पाईपलाईनच्या संरक्षक आवरणाला आधीच मोठी इजा झाली असून, भविष्यात पाईपलाईन फुटल्यास मोठी…

Read More

संगमनेर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनानंतर आता शहरात वारंवार समोर येणाऱ्या गोवंश कत्तलीच्या घटनांची गंभीर दखल घेत, प्रशासनाने आज अवैध कत्तलखान्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. आज सकाळपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या (बुलडोझर) साहाय्याने हे अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर वारंवार झालेल्या कारवाईनंतर देखील हे कत्तलखाने सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. या विरोधात आंदोलने करणाऱ्या संघटना देखील गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्नी मूग मिळून होत्या. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये स्थानिक पोलिसांच्या सुरू असलेल्या या कत्तलखान्यांवर अहिल्यानगरच्या एलसीबीने मोठ्या कारवाया केल्या होत्या. या कारवायांमुळे संगमनेर मधील अवैध कत्तलखान्याचे प्रस्थ समोर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील निमगावजाळी येथील माधुरी मनोज अरगडे (वय २८) या विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात पती मनोज भास्कर अरगडे आणि सासू मीराबाई भास्कर अरगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी यांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीचे काही महिने सुखात गेल्यानंतर, पती आणि सासूने किरकोळ घरगुती कारणावरून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. या जाचाला कंटाळून त्या काही काळ आपल्या मुलांसह माहेरी (अंभोरे) राहण्यास गेल्या होत्या. मात्र, नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्या पुन्हा सासरी परतल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी माधुरी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.…

Read More

आजचे राशीभविष्य:  मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र बोलताना संयम ठेवावा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. व्यावसायिकांना नवीन कंत्राट मिळण्याची चिन्हे आहेत. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. मिथुन: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून राजकारण तापले असून, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्र्यांच्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला आणि कोणता नकाशा दाखविला, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकल्पातील संदिग्धतेवर प्रहार केला. थोरात म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा या भागाच्या विकासासाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० मध्ये या प्रकल्पाला मोठी गती देण्यात आली होती. सेंट्रल रेल्वेने डीपीआर मंजूर केल्यानंतर नाशिक-सिन्नर-संगमनेर-साकूर-आळेफाटा-राजगुरुनगर-चाकण-हडपसर-पुणे असा सरळ मार्ग निश्चित झाला होता. मंत्रिमंडळाची मान्यता मिळून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  तालुक्यातील सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्याप्रमाणे तळेगाव निमोण आणि साकुर पठार भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जात आहे, त्याच धर्तीवर या गावांचा प्रश्नही उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून सोडवला जाईल. तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून तो शब्द आम्ही नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. सावरगाव तळ येथे आयोजित ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार खताळ बोलत होते. या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन ग्रामपंचायत इमारत, सभामंडप, व्यायामशाळा साहित्य, म्हसोबा महाराज मंदिर रस्ता…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत महायुतीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची आणि नगराध्यक्षांचे पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्षम करण्यासाठी शासनाने ५० टक्के आरक्षण दिले असून, महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी विशेष शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या नियमानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला किंवा नातेवाईकांना संबंधित संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे. मात्र, संगमनेर नगरपालिकेत या नियमांचे सर्रास उल्लंघन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  प्रभाग क्रमांक १४ मध्ये विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नगरसेवकाचा एक वेगळाच अंदाज रहिवाशांना पाहायला मिळाला. कामाच्या व्यापातून वेळ काढत नगरसेवक योगेश जाजू यांनी चक्क लहान मुलांसोबत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. त्यांच्या या ‘इनिंग’ची सध्या संगमनेरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये नागरिकांचे प्रश्न मांडत असताना नगरसेवक योगेश जाजू हे आपल्या प्रभागातील दैनंदिन विकासकामांची पाहणी करत होते. प्रभागातील या पाहणी दरम्यान काही मुले तेथे रस्त्यालगत क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता अचानक चेंडू त्यांच्या पायापाशी आला. मुलांनीही मोठ्या उत्साहाने त्यांना खेळण्याचा आग्रह केला. हा आग्रह मोडता न आल्याने, जाजू यांनी हातात बॅट धरली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.…

Read More

आजचे राशीभविष्य:  मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल, तर व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. वृषभ : आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यातील चिंता कमी होतील. कौटुंबिक वादात पडणे टाळावे, अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. संयम बाळगल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने झुकेल. सायंकाळचा वेळ मित्र-परिवारासोबत व्यतीत केल्यास प्रसन्न वाटेल. मिथुन : तुमच्या कल्पकता आणि कार्यक्षमतेमुळे आज तुम्ही कठीण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काही ठिकाणी एजंटांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, बांधकाम कामगारांनी कोणत्याही मध्यस्थाला पैसे न देता थेट महायुती जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. फसवणूक करणाऱ्या एजंटांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शनिवारी (१४ फेब्रुवारी) संगमनेर येथील मातोश्री लॉन्स येथे आमदार खताळ यांच्या हस्ते २ हजार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे (भांडी) वाटप करण्यात आले. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पुन्हा एकदा इशारा: काही ठिकाणी योजनेचे फॉर्म…

Read More

संगमनेर: नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा मूळ प्रस्तावित संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी आता संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या लढ्यात सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या हक्काच्या रेल्वे मार्गासाठी आवाज उठवला आहे. यामुळे या मागणीला आता खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले असून, तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग संगमनेर, नारायणगाव आणि खेड असा व्हावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातूनच हा मार्ग मंजूर झाला होता आणि तालुक्यातील…

Read More