Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि लाभदायक राहील. कुटुंबाची साथ लाभेल आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि वादापासून दूर राहा. मिथुन – आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि मनातील दुविधा दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. कर्क – आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी राहील. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. घरगुती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक परंपरा भक्तिभावाने जपली जात आहे. घुलेवाडी येथील साई स्वराज्य ग्रुपच्या वतीने वणी येथील आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी ज्योत आणण्यात आली. या पायी ज्योतीचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना गेट येथे आगमन झाल्यानंतर माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्योतीचे दर्शन घेऊन तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. गुंजाळवाडी व घुलेवाडी येथील युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आणलेल्या या पायी ज्योतीचे पूजन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी नवरात्रोत्सव हा भक्ती, शक्ती आणि चैतन्याचा…

Read More

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि सत्ताधाऱ्यांच्या ओंजळीतून पाणी पिणाऱ्या कोणत्याही संस्थेला जाब विचारणं हा लोकशाहीने या देशातील सामान्यातल्या सामान्य आणि गरिबातल्या गरिबाचा अधिकार आहे. लोकशाहीने त्यांना दिलेल्या या अधिकाराचा वापर केल्याविना लोकशाहीचे खांब टिकून राहणं शक्य नाही. अशा संकटात देशातील तरुण एकवटले असताना त्या तरुणांना दोष देण्याचे उद्योग याच देशातील काही निवृत्त न्यायमूर्तींनी चालवले आहेत. या न्यायमूर्तींच्या मागणीची जशी चौकशी झाली पाहिजे, तशी त्यांच्या या आणि याआधीच्या उचापत्यांची सखोल चिकित्सा होण्याची आवश्यकता आहे. ज्या हेमंत गुप्ता नावाच्या माजी न्यायमूर्तीने इतर चार-पाच माजी न्यायमूर्तींना सोबत घेत ४१ जणांना जमवून जनतेला वेड्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपी रामदास भानुदास गोपाळघरे याला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. श्रीगोंदे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी गुरुवारी या जामीन अर्जावर निर्णय दिला. अहिल्यानगरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदिप परशुराम पवार यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी येथे विनापरवाना ५,२७,५६० रुपये किमतीची स्किम्ड मिल्क पावडर साठवल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी रामदास गोपाळघरे यांच्या वतीने अ‍ॅड. वैभव सुरेश डोंगरे यांनी न्यायालयात…

Read More

आजचे राशी राशिभविष्य – मेष – आजचा दिवस नवीन संधी आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येऊ शकतो. जुन्या मित्रांच्या संपर्कातून महत्त्वाची संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसतील. वृषभ – प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी तिच्या हेतूंचा विचार करा. छोट्या स्वरूपात मिळणारा आर्थिक लाभ भविष्यात मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. कोणikही निर्णय घाईने न घेता शांत राहून योग्य निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन – परदेशात शिक्षण घेण्याची किंवा नोकरी करण्याची तयारी करणाऱ्यांना आनंददायक बातमी मिळू शकते. मुलांच्या प्रगतीमुळे कुटुंबाचा अभिमान वाढेल. आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मोलाचे ठरतील. कर्क – मनातील जुनी इच्छा पूर्ण झाल्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या विशेष पाठपुराव्यातून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणाला मोठा वेग मिळणार असून, स्थानिक नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. देवकवठे ते बोटा असा सुमारे १०० किलोमीटरचा विस्तीर्ण विस्तार असलेल्या संगमनेर तालुक्यात पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव भाग असे तीन प्रमुख भौगोलिक भाग येतात. तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाडी-वस्त्यांवर शाश्वत विकासाच्या योजना राबविण्यावर सातत्याने भर दिला गेला आहे. याच विकास मालिकेचा भाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ५० कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर कडक शब्दांत ताशेरे ओढत, आयोगातील व समाजातील अन्यायरूपी ‘ब्लड कॅन्सर’ मुळापासून बरा करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच या संपूर्ण प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर तातडीने जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. थोरात म्हणाल्या की, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून सुरू असलेला हा लढा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यांनी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील वीज यंत्रणेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. या भेटीदरम्यान त्यांनी संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील मंजूर वीज उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली. तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असून, त्यामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतीच्या कृषी पंपांचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नादुरुस्त होणारे ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) आणि नवीन रोहित्र उपलब्ध न होणे या अडथळ्यांमुळे शेतीच्या कामांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. ही बाब आमदार…

Read More

आजचे राशिभविष्य- मेष – कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कामांचे नियोजन व्यवस्थित करावे लागेल, तरच प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. लाभाचे योग जुळून येत असून उत्साह वाढेल. वृषभ – दैनंदिन कामे मार्गी लागतील आणि आर्थिक लाभ होतील. विरोधकांपासून सावध राहा. वादविवादापासून दूर राहून संयमाने वागावे. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. मिथुन – प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील आणि व्यवसायात उत्तम प्रगती होईल. कर्जाचा भार कमी झाल्यामुळे मन हलके राहील. जोडीदाराची प्रत्येक कामात मोलाची साथ लाभेल. कर्क – नातेवाईकांचे सहकार्य लाभेल आणि काहींना कामानिमित्त प्रवास घडतील. थांबलेले पैशांचे व्यवहार किंवा लाभाचे योग जुळून येतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या काशिफ असद कुरेशी या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  आरोपीकडून कथितरीत्या जप्त करण्यात आलेले ३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज हे व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी म्हणजेच मध्यम स्वरूपाचे असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी ६० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एका सक्षम जामीनदाराच्या हमीवर आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या (NDPS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ सप्टेंबर २०२६…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, संगमनेर न्यायालयाने आरोपींना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या कोठडीत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ७६ लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचा १५२.६१ किलो वाळलेला सुट्टा गांजा आणि वाहनासह तब्बल ८८ लाख १८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर येथील सत्र न्यायालयाने आरोपी रुपेश उर्फ अनिल बुधा सोनवणे (रा. मुरशेत, ता. अकोले) याला दोषी ठरवत ३ वर्षांच्या सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणाती दुसरा आरोपी पंढरी प्रभाकर पगारे (रा. आधारवाडी, ता. इगतपुरी) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी आरोपी रुपेश सोनवणे याने पीडित मुलीला झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसवून शिंगणवाडी शिवारातील जंगलात नेले. तेथे तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडितेने राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा…

Read More

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय सक्षमतेने पार पाडाल. आर्थिक व्यवहारात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. संध्याकाळी एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते. वृषभ- आजचा दिवस शांततेने आणि संयमाने व्यतीत करण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही त्यावर मात कराल. धनलाभाचे योग बनत आहेत. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नातेवाइकांशी संवाद साधताना भाषेवर संयम ठेवा. मिथुन- आज तुम्हाला बौद्धिक आणि सर्जनशील कामांमध्ये मोठे यश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात गुरुवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव इर्टिका कारचा ताबा सुटल्याने कार थेट रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन धडकली. या अपघातात कर्नाटकातील एका २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील होन्नाली आणि नाईक कुटुंब हे इर्टिका कारने (क्र. KA 29 B 8777) पुण्याहून नाशिकच्या दिशेने प्रवास करत होते. गुरुवारी दुपारी चंदनापुरी घाट सुरू होताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्ता दुभाजकाला जाऊन वेगाने धडकली. धडक इतकी प्रचंड होती की…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून संगमनेर आगारासाठी एकूण २५ ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या बसेसचे आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले. या नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसमुळे संगमनेरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक व पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार खताळ यांनी स्वतः महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक रोडच्या दिशेने बसमधून फेरफटका मारला. यावेळी त्यांनी बसमधील नवीन आसन व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा व इतर सोयी-सुविधांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना महावितरणकडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे. शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार केला. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अशा परिस्थितीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नागरिकांवर दबाव आणणे योग्य नाही. तसेच थकीत बिलांच्या कारणास्तव दुष्काळग्रस्तांची वीज जोडणी तोडण्याची कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सातत्याने संघर्ष करत असून, दुष्काळग्रस्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्र शासनाने गंभीर दखल घेतली असून, वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. पावसाच्या अभावामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न या पार्श्वभूमीवर हे पथक स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर पाहणी करणार आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान पथकातील सदस्य टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठा नियोजन, टँकरची स्थिती आणि उपलब्ध जलस्रोतांची पाहणी करतील. तसेच पावसाअभावी सुकलेली पिके, नुकसानीचे पंचनामे आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत शेतकरी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या दौऱ्याची पूर्वतयारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर नानांना संगमनेर मधून राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नानांच्या निधनाबद्दल दुःख दुःख व्यक्त केले असून ते म्हणाले, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सशक्त अभिनयाची अमीट छाप उमटविणारे, दमदार संवादफेक आणि रोखठोक स्वभावामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या अभिनयातील ताकद, भारदस्त आवाज, परखड विचार आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या (कार्डियाक अरेस्ट) तीव्र झटक्याने निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले होते, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांनी आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. ‘गमन’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’, ‘अग्नी साक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि २०१३ च्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित नाना यांनी ‘प्रहार’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. अभिनयासोबतच त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून…

Read More

आजचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने पार पाडाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबींमध्ये घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम शेवटी पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळा संवाद साधल्याने अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात…

Read More